सुदैवाने मोठा अनर्थ टळला, महावितरणच्या कार्यालयाकडे पत्रव्यवहार करुनही दखल नाही, पालक शिक्षकांनी केली तारा हटवण्याची मागणी
नगर – केडगाव अयोध्यानगर मनपाची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाळेच्या मैदाना वरती विद्युत विभागाची ’हाय ल्टेज’ च्या तारा गेल्या असून सकाळी शाळा भरण्याच्या आधी तारा तुटून मैदानावरती पडल्या होत्या. शिक्षक शाळेत आले असता निदर्शनात आल्यानंतर विद्युत विभागाच्या कर्मचार्यांशी संपर्क साधला आणि कर्मचारी आल्यानंतर विद्युत पुरवठा बंद केला. जर शाळा सुरू असताना किंवा विद्यार्थी मैदानावर खेळत असताना ’हाय व्होल्टेजच्या’ तारा पडल्या
असत्या तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही विद्युत विभागाने तारा तुटण्याच्या अगोदर उपायोजना करणे गरजेचे होते, आता तरी विद्युत विभागाच्या अधिकार्याने तातडीने लक्ष घालून
शाळेच्या आवारातील विद्युत तारा हटवाव्यात अशी मागणी पालक शिक्षकांनी केली. शाळेच्या मैदानावरील ’हाय व्होल्टेजच्या’ तारा हटवण्याची मागणी नगर व केडगाव विद्युत विभागाच्या कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता.
मात्र त्यांनी दखल न घेता आम्हालाच उडवा उडवी ची उत्तरे दिली. ते म्हणाले होते की शाळा आधी कि विद्युत तारा, त्यांच्या हलगर्जी पणामुळे तारा तुटून शाळेच्या मैदानावरती पडल्या, आता तरी तारा हटवण्यात याव्यात अशी मागणी पालक व शिक्षकांनी केली.





