समुपदेशन-सुखातही वेदना?

0
60

तिच्या मुख्य तक्रारी तीन होत्या

1) न्यूनगंड – सासरच्या श्रीमंती वातावरणात तिला न्यूनगंड वाटत होता. शिवाय नोकर चाकर, वागण्याच्या पद्धती, मॅनर्स, याचं दडपण होतं. त्याबद्दल तिला म्हटलं श्रीमंती असून त्यांनी तुला मागणी घातली ना? म्हणजे त्यांनी तुला स्वीकारले आहे म्हटल्यावर न्यूनगंड वाटण्याचे कारण नाही.

2) अपराधीपणा – आजारी आईला सोडून गेले. माहेरी सगळे गरिबीत असताना आपण ऐशारामात राहतो. यावर तिला म्हटले, उलट तुझे लग्न चांगल्या घरी आणि विनासायास पार पडल्यामुळे त्यांचे मोठे दडपण कमी झाले. मोठी जबाबदारी सहज पार पडली. त्यांची आज जरी गरिबी असली तरी भावाचे शिक्षण झाले की परिस्थिती बदलेल. कोणतीच परिस्थिती कायम राहत नाही. यावर तिचा पती स्वतःहून म्हणाला, आपण तुझ्या माहेरी मदत करू शकतो, भावाच्या शिक्षणालाही मदत करू. हे ऐकल्यावर तिच्या डोळ्यात कृतकृत्यता आणि कृतज्ञता ओतप्रोत जाणवली.

3) पोकळी – सासरी कोणतेच काम नसल्यामुळे पोकळी जाणवत होती आणि विचारांचा त्रास होत होता.

तिला विचारलं तुला कॉलेजमध्ये जायला आवडेल का? तिच्या डोळ्यात चमक दिसली. पण ती म्हणाली आता कसे शक्य आहे? का नाही? तिच्या पतीने लगेच विचारले. जूनपासून लगेच सुरू कर. बीए, बीकॉम, बीएससी, तुला हवे ते. हे ऐकल्यावर सारे प्रश्न सुटल्याचे समाधान तिच्या चेहर्‍यावर दिसले. बहुधा तसेच झाले असावे म्हणून तिने फोन केला होता. मॅडम.. गुड न्यूज आहे माझे एसवायबीकॉम पूर्ण झाले पण टीवाय जमेल असे वाटत नाही. का गं? अहो मुलगा झाला आहे मला त्यामुळे जमणार नाही. अरे वा अभिनंदन! आता तू एमए तर झालीस ना? टीवाय बीए नंतरही करू शकशील सध्या तो विचारच नको. मोकळेपणाने बोलल्यावर सारेच प्रश्न सहज सुटले अर्थात यात तिच्या पतीचा मोठेपणा खूपच होता. पण समुपदेशनामुळे हे सहज शक्य झाले. यासाठी तीन सेशन लागले.

शांभवी मंगेश जोशी

9673268040 इन साईट कौन्सिलिंग सेंटर