आनंदी वातावरणात करा काम

साधारणपणे व्यक्ती दोन प्रकारचे कार्य करते. बैठ्या स्वरुपाची आणि बौद्धीक स्वरुपाची काही कामे फारशी शारीरिक ताण न पडता व्यक्तीला करावी लागतात. नोकरी करत असतांना मानसिक समाधान असणे अत्यंत गरजेचे आहे. मानसिक स्थिती व कामावरील वातावरण याचा देखील आरोग्यावर परिणाम होत असतो. म्हणून आनंदी वातावरणात काम केल्याने उत्साह वाढतो व कार्यक्षमता सुद्धा वाढण्यास मदत होते.

गूढ मंगळवारच्या ‘पुस्तकाचे’

मंगळभूमीवरील अनेक छायाचित्रे लोकांना भ्रमित करीत असतात. तेथील भूरचना किंवा खडकांमध्ये अनेकांना अनेक गोष्टींचा आभास होत असतो. आताही तेथील एका खडकामध्ये पुस्तकाचा भास होत आहे. उघडलेल्या आणि पाने असलेल्या एखाद्या पुस्तकासारखीच या खडकाची रचना आहे. या छोट्याशा खडकाचे ‘नासा’च्या ‘न्युरिऑसिटी’या रोव्हरने छायाचित्र टिपले आहेे. एखादे जीवाश्मभूत पुस्तक असावे असे एकंदरीत त्याचे रूपडे आहे! क्युरिऑसिटी रोव्हरने या खडकाचे छायाचित्र टिपले होते. त्याच्या मोहिमेतील हा 3800 वा मंगळ दिवस. आपल्या ‘मार्स हँड लेन्स इमेजर’च्या सहाय्याने त्याने हे छायाचित्र टिपले. हा कॅमेरा त्याच्या रोबोटिक भुजेच्या टोकावर बसवलेला आहे. हा खडक असा आहे की त्याला पाहिल्यावर वाटावे एखादे जाडजूड पुस्तक उघडून उपडे ठेवलेले आहे. त्यामधील एक पान अभे आहे असेही वाटावे. मात्र, छायाचित्रात हा खडक जितका मोठा वाटतो तितका तो नाही. तो अवघा 1 इंचाचा आहे. वेगळ्या आकाराचे खडक मंगळावर अनेकवेळा दिसून येत असतात असे ‘नासा’ने म्हटले आहे. मंगळावर एकेकाळी वाहते, द्रवरूप पाणी होते. त्यामधून मागे राहिलेल्या खनिजांपासून असे खडक बनतात. अशी खजिने एके काळी नदीच्या मऊ गाळाखाली दबलेली होती. फेबु्रवारी 2022 मध्ये अशाच एका खडकात फुलाची रचना आढळून आली होती. हा खडक अवघ्या एकासेंटीमीटर रूंदीचा होता.

बीअरवर चालणारी बाईक !

आजवर एकापेक्षा एक सरस शोध लावणार्‍या अमेरिकेतील के. मशेल्सन या अवलियाने आता चक्क बीअरवर चालणार्‍या बाईकची निर्मिती करत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. मशेल्सनेने यापूर्वी रॉकेटवर आधारित वॉशरूम आणि जेट संचलित कॉफी पॉटचा शोध लावला आहे. एरवी, सोशल मीडियावर नवनवे आविष्कार पाहायला मिळत असतात. पण, ही भन्नाट कल्पना प्रथमच प्रत्यक्षात साकारली गेली असू शकते. के. मशेल्सन यांनी या नव्या आविष्कारात गॅस संचलित इंजिनऐवजी हिटिंग कॉईलसह 14 गॅलन केग वापरला असून कॉईल बीअर 3000 डिग्रीपर्यंत गरम करत ही बाईक चालवता येते, हे दाखवून दिले आहे. कॉईल बीअर 300 डिग्रीपर्यंत गरम केल्यानंतर नोजलमध्ये सुपर-हिट स्टीम होते आणि यामुळे बाईक सुरू होते. ही मोटरबाईक निश्‍चितपणाने अनोखी असून अशी निर्मिती यापूर्वी कोणीच केली नसल्याने याचा आनंद काही वेगळाच आहे, असे मशेल्सन यांनी म्हटले आहे. गॅसच्या किमती वाढत आहेत आणि मी स्वत: ड्रिंक्स घेत नाही. त्यामुळे मी बीअरचा इथे इंधन म्हणून वापर केला, असे ते गंमतीने म्हणाले. मशेल्सन यांना रॉकेटमन म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी तयार केलेली ही बाईक अनोखीच आहे. अद्याप ही बाईक रस्त्यावर उतरवलेली नाही. मात्र, काही प्रदर्शनात या बाईकला अव्वल पसंती मिळत राहिली आहेे. ही बाईक240 कि. मी. वेगाने धावू शकते, असा दावा मशेल्सन यांनी केला असून याचे परिक्षण लवकरच ड्रॅग स्ट्रीपवर केले जाणार आहे. त्यानंतर काही ठिकाणी प्रदर्शन केले गेल्यानंतर मशेल्सन यांच्या घरातील संग्रहालयात त्याचा समावेश होईल.

प्राचीन कात्रीचा शोध

जर्मनीतील एका सेल्टिक थडग्यामध्ये 2300 वर्षांपूर्वीची कात्री तसेच वाकवलेल्या तलवारीचा शोध घेण्यात आला आहे. या थडग्यात पुरातत्त्व संशोधकांना इतरही अनेक वस्तू सापडल्या आहेत. त्यामध्ये चिखलाचा एक भाग, पाते, कमरपट्टा आदींचा समावेश आहे. या थडग्यामध्ये एक पुरूष आणि एका स्त्रीला दफन करण्यात आले होते असे संशोधकांनी म्हटले आहे. युरोपच्या मुख्य भूमित इसवी सनपूर्व तिसर्‍या ते इसवी सनपूर्व दुसर्‍या शतकात सेल्ट लोक राहत होते. हे लोक मृतदेहांचे दहन करून अस्थींचे दफन करीत असत. अशा अस्थींच्या शेजारी त्यांच्या अनेक वस्तू ठेवल्या जात असत. अशाच एका थडग्याचा जर्मनीत शोध घेण्यात आला आहे. त्यामध्ये चांगल्या प्रकारे सुरक्षित राहिलेल्या दोन कात्र्यांचाही समावेश आहे. म्युनिचमधील बेवेरियन स्टेट ऑफिसच्या मार्टिना पॉल या पुरातत्त्व संशोधिकेने याबाबतची माहिती दिली. सध्या जसे अनेक वस्तू कापण्यासाठी कात्री वापरली जाते तशाच या दोन्ही कात्र्या आहेत. याठिकाणी ज्या व्यक्तींचे अवशेष दफन केले आहेत त्या समाजातील संपन्न कुटुंबातील व्यक्ती असाव्यात हे उघडच दिसते. याचे कारण म्हणजे त्यांच्या वापरामध्ये धातूच्या अनेक वस्तूंचा समावेश आहे.

अनोखी ‘स्वीट डिश’!

तुम्ही आतापर्यंत सर्वात विचित्र किंवा कल्पनाही करता येणार नाही. असा एखादा पदार्थ कधी खाल्लाय का? असा प्रश्‍न केल्यास तुम्ही किमान एखाद्या पदार्थाचे तरी नाव घ्याल. मात्र, एखादा पेसच वाटावा असा गोड पदार्थ तुम्ही कधी खाल्ला नसेल! तसा पदार्थ स्पेनमध्ये मिळतो. ही ‘स्वीट डिश’अनेकांना थक्क करते. खाण्याच्या आवडी-निवडी काळानुरूप बदलल्या. पदार्थ बनवण्याची प्रक्रियाही पूर्णपणे बदलली. यापला जोड मिळाली ती म्हणजे विज्ञानाची कशी? सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही फोटो आणि व्हिडीओ हे जास्तच स्पष्टपणे सांगताना दिसत आहेत. जु उदाहरणच घ्यायचं झालं, तर हा एक पदार्थ, हा आहे ‘फ्लोटिंग फोम डेझर्ट’ नावावरून यात फेस आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. हा एक गोडाचा पदार्थ आहे हे सुद्धा तुमच्या लक्षता येईल. पण आता या फेसाचे काम काय? विचारात पडलात ना? स्पेनमधील एका प्रतिष्ठित रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ मिळतो. सोप्या भाषेत सांगावं तर या गोडाच्या पदार्थांवर तरंगणारा फेस त्याच पदार्थाचा एक भाग आहे. हेलियम आणि मातीच्या ‘डिस्टिलेशन’ प्रक्रियेतून तयार झालेल्या पाण्याचा हा फेस आहे. पदार्थावर जणू काही एक सुगंधी पाऊस पडतोय हे भासवण्यासाठी हा फेसरूपी ढग शेफ मोठ्या मेहनतीने तयार करतात.

हास्यविनोद आणि प्रतिकारक्षमता

आपल्याकडे एकेकाळी काही लोकांच्या दृष्टीने हसणे किंवा विनोद ही थिल्लर बाब समजली जात असे. मात्र, हास्यविनोद, हसणे या गोष्टीही आरोग्यासाठी लाभदायकच आहेत. यामुळे होणार्‍या प्रमुख परिणामांमध्ये तणाव घटणे हा आहे. हास्यविनोदामुळे रोगप्रतिकारक क्षमतेतही वाढ होते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मनोचिकित्सक आणि स्टँडअप कॉमेडियन केट निकोल्स म्हणाल्या, तुमला कोणत्या गोष्टींमुळे जास्त हसू येते हे शोधून काढा. लाफ्टर शोमध्ये जा, हसवणार्‍या लोकांच्या सहवासात जा किंवा पसंतीचा कॉमेडी शो पाहा. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरील हास्याच्या मिम्स आणि व्डिडीओला सेव्ह करा आणि गरज भासेल तेव्हा तो पाहा. पेपरडाईन युनिव्हर्सिटीमध्ये क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. स्टीव्हन सल्टेनॉफ 40 वर्षांपासून ह्यूमर पॉवरच्या सहाय्याने लोकांना मदत करत आहेत. त्यांनी सांगितले, गिराश असताना डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवणार्‍या क्षणांना पुन्हा आठवा. हसवणार्‍या क्षणांची कल्पना मेडिटेशनसारखी असते. यातून तुमच मूड चांगला होतो. ‘द हिलिंग पॉवर ऑफ ह्यूमर’चे लेखक ऍलन क्लेन म्हणाले, चेहर्‍यांवर हास्य खुलवणारी एक गोष्ट दिवसभरात जरूर करायची आहे. असे दररोज सकाळी ठरवा. यातून अनपेक्षित ठिकाणांहून हास्य नक्की मिळेल. तुम्ही जास्त हसू लागल. कॉमेडी क्लास लावणेही फायद्याचे ठरू शकते. कॉमेडियन निकोल म्हणाल्या, भलेही तुम्ही स्वत:ला विनोदी मानत नसले तरी बदलाच्या दिशेने पाऊल पडू शकते. निकोलने महाविद्यालयीन जीवनात कंटाळवाणेपणा दूर करण्यासाठी क्लास सुल केला होता. आज जगभरात त्यांचे कार्यक्रम होतात.

आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र चाळीशीनंतरही टिकवा तारुण्य

पोळी खाण्याऐवजी तेल न लावलेला फुलका खावा. पालेभाज्या, फळभाज्या, मोड आलेली कडधान्ये खावीत. रोज नियमित नाश्ता करावा. कारण, नाश्ता केल्याने दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते. नाश्त्यामध्ये फळ, दूध तसेच मोड आलेली कडधान्ये यांच्यापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करावा. दुपारचे जेवण भरपूर करावे. परंतु रात्रीचे जेवण हलके व लवकर करावे. जेवण व झोप यांमध्ये तीन तासांचे अंतर ठेवावे. म्हणजेच साधारणतः संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत जेवण करावे. व्हिटॅमिनयुक्त आहार : शरीरामध्ये झालेली झीज भरून काढण्यासाठी व्हिटॅमिन्सयुक्त आहार हवा. कारण त्यातील ’ऍन्टिऑक्सिडंट्स’ शरीराची झीज भरून काढतात.

व्हिटॅमिन ए – ए व्हिटॅमिन संतुलित राहण्यासाठी गाजर, लाल भोपळा, टोमॅटो, बीट, आंबा यांमधील एखादा पदार्थ रोज खायला हवा. व्हिटॅमिन ए चे औषध घेण्याची गरज नसते. त्यासाठी वरील पदार्थ खावेत.

व्हिटॅमिन बी – शरीराच्या संपूर्ण आरोग्यासाठी हे महत्वाचे असते. त्यासाठी पालक, मेथी, शेपू, हिरवी कांद्याची पात, तांदूळजा, राजगिरा, माठ, चाकवत या भाज्यांचे सेवन आठवडयातून तीनदा करावे.

व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सीमुळे रक्तवाहिन्या लवचीक व मोकळ्या राहतात. रक्तात गुठळी होण्याची शक्यता कमी होते. हे एक अत्यंत प्रभावी ’ऍन्टिऑक्सिडंट’ आहे. त्यामुळे पेशींची झीज भरून काढण्याचे काम व्हिटॅमिन सी करते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून रोज अर्धे लिंबू आहारामधून घ्यावे किंवा रोज एक मोरावळा, आवळा केंडी किंवा सुपारी, संत्री व मोसंबी ही फळे खावी

व्हिटॅमिन डी शरीरामध्ये कॅल्शिअमच्या पचनासाठी, हाडांच्या मजबुतीसाठी व रोगप्रतिकारक शक्तीसाठी व्हिटॅमिन डीची गरज असते. यासाठी रोज सकाळी कोवळ्या उन्हामध्ये बसावे. हात, पाय, पाठ यांवर 10 ते 15 मिनिटे सूर्यप्रकाश घ्यावा.

व्हिटॅमिन ई – व्हिटॅमिन ई हे अत्यंत प्रभावी ऍन्टिऑक्सिडंट आहे. याकरिता गव्हाच्या तृणांचा रस आठवड्यातून तीनदा घ्यावा. इडली, डोसा, ढोकळा आठवड्यातून दोन वेळा खावे. प्रोटीन्ससाठी गव्हाच्या पिठात थोडे मेथीचे दाणे टाकून ठेवावेत. राजगिरा, शेंगदाणे, तीळ यांचे लाडू साखर न घालता गूळ घालून खावे. सर्व प्रकारची मोड आलेली कडधान्ये आठवड्यातून तीनदा खावीत. दिवसभरात उकळलेले 10-12 ग्लास पाणी प्यावे. तारुण्यामध्ये चटकदार मसालेदार मांसाहार, तेलकट, गोड पदार्थ खाल्ले तरी शरीराला त्रास जाणवत नाही.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

आंतरिक बल (भाग – 1)-मनचाही प्राप्ति और कुदरती नियम

प्रत्येक व्यक्ति कोई-न-कोई रोग से पीड़ित है। हमें रोगों का डॉक्टर से मिलकर उपचार करना है। ध्यान साधना व राजयोग अर्थात् परमात्मा की याद से भी रोग ठीक होते हैं परंतु सारी दुनिया ध्यान साधना नहीं करती और न ही भगवान में विश्वास करती और जो लोग साधना करते हैं उनका भी गहरा योग नहीं लगता। प्रायः माने हुये योगी भी बीम ार रहते हैं। बीमारी से मुक्ति पाना सभी का अधिकार है, वह चाहे भगवान को माने चाहे न माने। रोग मुक्त सभी होना चाहते हैं। बीमारी को ठीक करना है तो कुदरत के नियमों को समझना होगा। कुदरती नियम कहता है कि जो कुछ आप प्राप्त करना चाहते हैं या बनना चाहते हैं उसे हर रोज थोड़ी देर दोहराते रहो और कुछ नया ज्ञान पढ़ो। शरीर में कोई भी रोग हो उसकी दवाई तो डॉक्टर से लेते रहो। मन ही मन दोहराते रहो मैं ठीक हो रहा हूँ ठीक हो रहा हूँ। जब भी रोग से तकलीफ हो उस समय कहते रहो मैं ठीक हो रहा हूँ। तब आप सचमुच में ठीक हो जायेंगे। पता नहीं ठीक होऊँगा की नहीं। यह भयानक रोग है। इस बीमारी से फलाना-फलाना व्यक्ति मर गया था। अगर ऐसा सोचेंगे तो रोग ठीक नहीं होगा। दबाई असर नहीं करेगी। कोई पूछे कैसे हो तो कहो पहले से ठीक हूँ। चाहे कितनी तकलीफ हो, कोई भी पूछे उसे यही कहना है पहले से ठीक हूँ। सिर्फ डॉक्टर को बताये कि क्या और कितना कष्ट है। दूसरा व्यक्ति कोई रोग थोड़ा ही ठीक करेगा। उल्टा कोई-न-कोई कमजोर शब्द बोलेगा। अगर हर समय बीमारी का दुखड़ा रोते रहेंगे तो लोग आपसे कन्नी काटने लगेंगे। वह सोचेंगे कि कहीं इसका रोग मुझे न हो जाये। हमारे अंदर एक केन्द्र है जो शरीर की मुरम्मत करता है। एक बार रोज दोहराते रहो मेरे मन वहॉं चल जिस केन्द्र में शरीर को मुरम्मत करने की शक्ति है। वह केन्द्र मेरा रोग ठीक कर रहा है। हे मन उस तापमान में चल जो मॉं के पेट में होता है जहॉं शरीर का पुनर्निर्माण होता है। मैं उसी वातावरण में हूँ। मेरा अमुक अंग का पुनर्निर्माण हो रहा है। यह वाक्य दिन में 10 बार कम-से-कम जरूर दोहराना है । इससे आप में मनोबल बढ़ जायेगा और आप ठीक हो जायेंगे। एक नोट बुक बना लो और उसमें लिखते रहो आप क्या चाहते हैं। इन वाक्यों को एक बार जरूर दोहराना है। पहला नियम मैं स्वस्थ हूँ। इसे दोहराते रहो। आप जो कुछ चाहते हैं उसके लिए कुदरत का नियम यह है कि वह लक्ष्य या इच्छा लिख लो। उसे रोज पढ़ो पढ़ने के बाद एक नया पॉइंट और लिख लो जो आपके लक्ष्य के लिये जरूरी है। आप चाहते हैं मैं इंग्लिश में मास्टरी हासिल करूँ मेरी शब्दावली भरपूर हो जाये। पहले दिन कोई एक नया शब्द लिखे उसका अर्थ लिख लें। अगले दिन उस शब्द को पढ़ो तथा एक नया शब्द और उसका अर्थ लिखे। तीसरे दिन पहले दो दिनों के शब्द पढ़ने हैं। तीसरे दिन नया शब्द लिखना है। ऐसे ही चौथे, पॉंचवें, छठे तथा 365 दिन तक पिछले शब्द दोहराने और एक-एक शब्द बढ़ाते चले जाना है। ये अभ्यास अगर आप 10 वर्ष तक करते रहे तो आपके पास भरपूर इंग्लिश की शब्दावली होगी ऐसे ही अगर आप चाहते हैं कि आपकी सेहत अच्छी

(प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय)

जीवन चक्र-कर्म चक्र

चमत्कार करत नाहीत किंवा ते त्यांच्या शिष्यांना असे अहंकारी व दिखावटी कार्य करण्यास परवानगी देत नाही. संत जेव्हा आजारी पडतात तेव्हा ते डॉक्टरांनी दिलेली औषधे घेतात, परंतु प्रत्यक्षात त्यांना कोणत्याही उपचारांची आवश्यकता नसते. हे केवळ ऐहिक नियम टिकवून ठेवण्यासाठी करतात. ते संसारीक कामे प्रामाणिकपणे करीत असतांना आवश्यकतेनुसार त्याने योग्य उपचार घ्यावेत असा आदर्श ते मनुष्यासमोर घालून देतात. परंतु शिष्याकडून अशी अपेक्षा केली जाते की त्यांनी केवळ असेच औषध घ्यावे ज्याला बनवितांना देहधारी जीवांची हत्या झालेली नसेल. परंतु काही शिष्य ज्यांना गुरूंच्या सामर्थ्यावर पुर्ण व अतुट विश्वास आहे ते बहुतेक वेळा आपल्या रोगाच्या इलाजापासून वाचतात व प्रकृतीला आपले कार्य करू देतात कारण मानव शरीरामध्ये स्वतःला ठिक करण्याची शक्ती पहिल्यापासुनच आहे.

शारीरिक रोग आनंदाने स्विकारून सहन केले पाहिजे. कारण सामान्यतः खाण्या पिण्याच्या चुकांमुळे ते उद्भवतात आणि योग्य आहार व आरोग्याच्या नियमांचे पालन करून त्यावर मात केली जाऊ शकते. आधुनिक वैद्यकिय विज्ञानाचे जनक हिप्पोक्रेटस् यांनी म्हटले आहे की अन्न हे औषध म्हणून घेतले पाहिजे. कर्माच्या परिणामामुळे उद्भवणारे जटिल रोग देखिल तक्रार न करता धैयपुर्वक सहन केले पाहिजेत, कारण कर्माचा हिशोब संपविण्यासाठी त्याचा त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच राहिलेले कर्मफळ नंतर न भोगता लगेच भोगणे चांगले आहे. महान सुफी संत हजरत मियॉं मीर यांचे शिष्य अब्दुल्ला यांच्या बद्दल असे म्हटले जाते की, त्यांच्या आजारपणाच्या स्थितीत त्यांनी आपल्या आत्म्याच्या धारेला आपल्या डोळ्यांच्या मध्ये भ्रमध्यावर एकवटले व स्वतःला पुर्णपणे शांत केले व स्वतःचे संरक्षण केले. हे सर्व पाहून हजरत मियॉं मीर यांनी त्यांना पुन्हा त्यांच्या शरीरात आणले व आपल्या कर्माचे भुगतान करावयास सांगितले. त्यांनी त्याला सांगितले की अशा युक्ती वापरून तो कर्माच्या प्रभावापासून मुक्त होणार नाही. संत आपल्या शरीराची काळजी व गरजांसाठी जास्त वेळ घालवत नाही.

जितका की आपल्यापैकी बहुतेक लोक देतात. त्यांच्यासाठी हे शरीर कपड्यांसारखे आहे जे एक दिवस उतरावेच लागतील. ते आराम न करता, रात्र रात्र जागून शारीरिक व मानसिकरित्या कठोर परिश्रम करत असतात. असे अद्भुत कार्य विज्ञानासाठी रहस्य आहे परंतु संतांसाठी ही एक सामान्य बाब आहे. ते प्रकृतीच्या त्या नियमांच्या मदतीने कार्य करतात ज्याबाबत आम्हाला पुर्णपणे माहिती नाही. कर्माचे दोन भाग केले जाऊ शकतात. व्यक्तीगत कर्म व सामुहीक कर्म. सामुहिक कर्म ही अशी कर्म असतात जे एकत्रितपणे समाज किंवा देशाद्वारे केली जातात व त्यांना ’धर्म’ असे म्हणतात. ज्या प्रकारे एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ मिळते त्याचप्रमाणे समाजालाही चुकींच्या नितींचा परिणाम भोगावा लागतो. याचा परिणाम असा होतो की, निष्पाप लोकसुद्धा आपल्या धर्माच्या चुकीच्या कार्याचे फळे भोगतात. जेव्हा नादीर शाहने भारतावर आक्रमण केले तेव्हा त्याने दिल्लीत सामुहिक हत्या करण्याचा वटहुकूम दिला. ही भयानक दहशत पाहुन लोकांमध्ये सर्वसाधारण ही धारणा झाली होती की देशवासियांचे वाईट कर्मच नादिरशाहच्या रूपात प्रकट झाले होते. केलेल्या पापकर्माचा मग ते पाप निषिध्द कर्मासाठी केलेले असो किंवा उचित कर्मासाठी केलेले असो त्यासाठी योग्य शिक्षा देणे हा प्रकृतीचा मुळ आधार आहे. आपण यास संकट, प्रकोप किंवा उन्माद असे काहीही म्हणू शकतो.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)

राजाचे डोळे उघडले

त्या देशाचा राजा भयंकर अत्याचारी आणि जुलमी स्वभावाचा होता. श्रीमंतांना जबरदस्ती करून तो लुटीत असे, गरिबांना जिणे नकोसे करून सोडी, त्यामुळे राज्यातील जनता अगदी वैतागून गेली होती. ‘देवा, राजाच्या जाचातून सोडव,’ अशी ती परमेश्‍वराची प्रार्थना करीत असे. मात्र एके दिवशी चमत्कार व्हावा, तसे झाले. राजा शिकारीहून राजवाड्यात परतला, तसे त्याने दवंडी पिटून सर्व प्रजेला राजवाड्यात बोलवून सांगितले, ‘‘प्रजाजनहो, आजपर्यंत मी तुम्हाला फार छळले. तुमच्यावर जुलूम-जबरदस्ती करून भंडावून सोडले. मी तुमच्याशी फार अन्यायाने वागलो. ही माझी चूक झाली. परंतू आजपासून मी तुमच्यावर कसलाही अत्याचार करणार नाही. तुम्हाला सुखासमाधानात आनंदी ठेवीन.’’ राजाचे हे बोलणे ऐकून प्रजेला फारच आनंद झाला. राजा इतका बदलला की, लोक त्याला न्यायी, प्रजाहितदक्ष, वैभवशाली राजा मानू लागले.

एकदा राजा खुषीत येऊन गप्पा मारीत असता प्रधान म्हणाला, ‘‘महाराज, आपण एकाएकी एवढे कसे बदललात?‘’ तेव्हा राजा म्हणाला, ‘‘प्रधानजी, तुम्हाला आठवत असेल, त्या दिवशी मी कोणाला न सांगता शिकारीला गेलो होतो. मी एका कोल्ह्याच्या मागावर असता एका कुत्र्याने कोल्ह्याचा लचका तोडला, पण तेवढ्यात कोल्हा बिळात शिरला असे मला दिसले. तो कुत्रा मग तसाच पुढे निघाला असता समोरून येणार्‍या लांडग्याने त्याचे नरडे फोडून त्याला ओढीत चालवले. तोच समोरून एक भरधाव घोडा आला आणि त्याने लांडग्याला एक सणसणीत लाथ हाणताच लांडगा जागेवरच मरुन पडला. घोडा तसाच पुढे निघाला असता समोरून आलेल्या सिंहाने त्याच्या डोक्यावर हल्ला करून त्याला ठार मारले. सिंह त्याच्यावर ताव मारीत असता कुठून तरी एक बाण सूं सूं करत आला आणि गचकन सिंहाच्या मानेत रुतला. या सर्व घटना पाहून माझे डोळे उघडले. मनाशी विचार केला, वाईट कृत्यांची फळं वाईटच मिळतात, हेच खरं. मग मी पुढे गेलोच नाही. तसाच माघारी फिरलो आणि मनाशी निश्‍चय केला की आजपासून कोणावरही अन्याय करायचा नाही. प्रजेचे जेवढे भले करता येईल, तेवढे करण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा.’’

तात्पर्य – आपले वर्तन जर चांगले असेल तर लोकही आपल्याशी चांगले वागतात.