पोळी खाण्याऐवजी तेल न लावलेला फुलका खावा. पालेभाज्या, फळभाज्या, मोड आलेली कडधान्ये खावीत. रोज नियमित नाश्ता करावा. कारण, नाश्ता केल्याने दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते. नाश्त्यामध्ये फळ, दूध तसेच मोड आलेली कडधान्ये यांच्यापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करावा. दुपारचे जेवण भरपूर करावे. परंतु रात्रीचे जेवण हलके व लवकर करावे. जेवण व झोप यांमध्ये तीन तासांचे अंतर ठेवावे. म्हणजेच साधारणतः संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत जेवण करावे. व्हिटॅमिनयुक्त आहार : शरीरामध्ये झालेली झीज भरून काढण्यासाठी व्हिटॅमिन्सयुक्त आहार हवा. कारण त्यातील ’ऍन्टिऑक्सिडंट्स’ शरीराची झीज भरून काढतात.
व्हिटॅमिन ए – ए व्हिटॅमिन संतुलित राहण्यासाठी गाजर, लाल भोपळा, टोमॅटो, बीट, आंबा यांमधील एखादा पदार्थ रोज खायला हवा. व्हिटॅमिन ए चे औषध घेण्याची गरज नसते. त्यासाठी वरील पदार्थ खावेत.
व्हिटॅमिन बी – शरीराच्या संपूर्ण आरोग्यासाठी हे महत्वाचे असते. त्यासाठी पालक, मेथी, शेपू, हिरवी कांद्याची पात, तांदूळजा, राजगिरा, माठ, चाकवत या भाज्यांचे सेवन आठवडयातून तीनदा करावे.
व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सीमुळे रक्तवाहिन्या लवचीक व मोकळ्या राहतात. रक्तात गुठळी होण्याची शक्यता कमी होते. हे एक अत्यंत प्रभावी ’ऍन्टिऑक्सिडंट’ आहे. त्यामुळे पेशींची झीज भरून काढण्याचे काम व्हिटॅमिन सी करते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून रोज अर्धे लिंबू आहारामधून घ्यावे किंवा रोज एक मोरावळा, आवळा केंडी किंवा सुपारी, संत्री व मोसंबी ही फळे खावी
व्हिटॅमिन डी शरीरामध्ये कॅल्शिअमच्या पचनासाठी, हाडांच्या मजबुतीसाठी व रोगप्रतिकारक शक्तीसाठी व्हिटॅमिन डीची गरज असते. यासाठी रोज सकाळी कोवळ्या उन्हामध्ये बसावे. हात, पाय, पाठ यांवर 10 ते 15 मिनिटे सूर्यप्रकाश घ्यावा.
व्हिटॅमिन ई – व्हिटॅमिन ई हे अत्यंत प्रभावी ऍन्टिऑक्सिडंट आहे. याकरिता गव्हाच्या तृणांचा रस आठवड्यातून तीनदा घ्यावा. इडली, डोसा, ढोकळा आठवड्यातून दोन वेळा खावे. प्रोटीन्ससाठी गव्हाच्या पिठात थोडे मेथीचे दाणे टाकून ठेवावेत. राजगिरा, शेंगदाणे, तीळ यांचे लाडू साखर न घालता गूळ घालून खावे. सर्व प्रकारची मोड आलेली कडधान्ये आठवड्यातून तीनदा खावीत. दिवसभरात उकळलेले 10-12 ग्लास पाणी प्यावे. तारुण्यामध्ये चटकदार मसालेदार मांसाहार, तेलकट, गोड पदार्थ खाल्ले तरी शरीराला त्रास जाणवत नाही.
डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे
दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर
अहमदनगर मोबाईल नं- 8793400400