मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज- माणसाला किती दात असतात

प्रौढ माणसाला एकूण 32 दात असतात. वरील जबड्यात सोळा व खालच्या जबड्यात सोळा. यात निम्मे दात डाव्या बाजूला व निम्मे उजव्या बाजूला असतात. वरच्या व खालच्या जबड्यातील प्रत्येकी सोळा दातांमध्ये पटाशीचे चार दात, दोन सुळे, चार उपदाढा व सहा दाढा असे दात असतात. माणसाच्या बाबतीत खायचे व दाखवायचे दात वेगळे नसतात. मग भले एखाद्याला कोणी काहीही म्हणो! उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये माणसाच्या जबड्याचे हाड लहान होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेवटी येणार्‍या दाढांसाठी (अक्कल दाढांसाठी) जबड्यात जागाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे कधी कधी ह्या दाढा उगवतच नाहीत. कधी वेड्यावाकड्या येतात. त्या जर गालाच्या दिशेने उगवू लागल्या तर खूप त्रास होतो व त्या काढून टाकाव्या लागतात. कालांतराने सर्व मानवांना 28 दात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडक्यात म्हणजे आधुनिक मानवाला अक्कलदाढांची गरज नाही. हे निसर्गाच्या ध्यानात आले असावे. अक्कलदाढा व अक्कल यांचा तसा अर्थाअर्थी काहीच संबंध नसल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही!

हसा आणि शतायुषी व्हा!

इंग्रजी माध्यमात पदवीधर झालेल्या सुनेने सासुला विचारलं:

’तडफड’ म्हणजे नेमके काय असतं ?

सासु शांतपणे उठली, आणि वायफायचा स्विच बंद केला.

म्हणाली… ‘घे अनुभव’.

सौंदर्य

दही आणि स्ट्रॉबेरी हे दोन्ही घटक त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. हे मिक्स करून चेहर्‍यावर लावल्याने त्वचा टवटवीत राहते आणि ती जास्त काळ हायड्रेटही राहते.

सल्ला

स्वयंपाकघराच्या भिंतींना कधीही काळा रंग देऊ नये.

कधीही स्वयंपाकघरात मध्यावर गॅस ठेऊ नये

बेडरूमध्ये आवाज होणार्‍या वस्तू ठेवू नका

तुमच्या बेडरूममध्ये अशी कोणतीही वस्तू नसावी ज्यामुळे आवाज होईल. जसं रेडिओ, टीव्ही किंवा कोणतेही वाद्य यंत्र. यामुळे आर्थिक समस्या, मानसिक तणाव, आजारपण इत्यादी समस्या निर्माण होतात. आपल्या बेडरूममध्ये अशा ठिकाणी विंडचाइम लावावे जिथून हवा येत असेल. विंडचाईमचा मधूर आवाज कानावर पडल्याने तुम्हाला एक आनंद मिळतो आणि तणाव कमी होतो.

लाल भोपळ्याचे सुप

साहित्य – लाल भोपळा पाव किलो, 1 छोटा कांदा, 1 मोठा टोमॅटो, 1 मध्यम आकाराचे गाजर, 2 मोठ्या लसुण पाकळ्या, 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा धणे, 4 मिरे, साखर, मिठ (चवीप्रमाणे), 2 चमचे तुप / बटर, 5-6 कडीपत्त्याची पाने, 1 हिरवी मीरची, 4 कोथिंबीरीच्या काड्या (मुळं आणि पान काढुन, फक्त काड्या)

कृती – भोपळ्याची साले काढून घ्यावीत. भोपळा, टोमॅटो, गाजर, कांदा सगळ्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करुन घ्याव्या. लसुण सोलुन घ्यावा. एका खोलगट भांड्यात तुप घेउन तुप तापल्यावर त्यात कडिपत्ता आणि हिरवी मिरची टाकावी. नंतर कांदा आणि लसुण थोडा परतून घ्यावा. कच्चटपणा जाईल इतपतच. आता त्यात गाजर, टोमॅटो, लाल भोपळ्याच्या फोडी, कोथिंबीरीच्या काड्या, जिरे, धणे, मिरे, साखर, मिठ घालावे. हे सगळे बुडेल इतके पाणी घालावे. पाण्याला चांगली उकळी आली की गाजराच्या फोडिला टोचुन बघावे (गाजर जास्त कडक असल्याने). मऊ झाले असेल तर पाणी गाळून घेऊन बाकी सगळे मिश्रण मिक्सरमधून एकजीव करुन घ्यावे. बाजुला काढलेले पाणी व हे एकजीव केलेले मिश्रण एकत्र करुन एक उकळी आणावी. घट्ट वाटल्यास थोडे अजुन पाणी घालावे.

हृदयाच्या आरोग्यासाठी

सक्रिय राहणे तुमच्या हृदयविकाराचा धोका कमी करू शकते. व्यायाम हा एक उत्तम मूड बूस्टर आणि स्ट्रेस बस्टर आहे. दर आठवड्याला 150 मिनिटे मध्यम-तीव्रता एरोबिक व्यायाम करा. हे लक्ष्य साध्य करण्याचा एक मार्ग म्हणजे आठवड्यातून 5 दिवस 30 मिनिटे व्यायाम करणे.

आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र चाळीशीनंतरही टिकवा तारुण्य

पोळी खाण्याऐवजी तेल न लावलेला फुलका खावा. पालेभाज्या, फळभाज्या, मोड आलेली कडधान्ये खावीत. रोज नियमित नाश्ता करावा. कारण, नाश्ता केल्याने दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते. नाश्त्यामध्ये फळ, दूध तसेच मोड आलेली कडधान्ये यांच्यापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करावा. दुपारचे जेवण भरपूर करावे. परंतु रात्रीचे जेवण हलके व लवकर करावे. जेवण व झोप यांमध्ये तीन तासांचे अंतर ठेवावे. म्हणजेच साधारणतः संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत जेवण करावे.

व्हिटॅमिनयुक्त आहार – शरीरामध्ये झालेली झीज भरून काढण्यासाठी व्हिटॅमिन्सयुक्त आहार हवा. कारण त्यातील ’ऍन्टिऑक्सिडंट्स’ शरीराची झीज भरून काढतात.

व्हिटॅमिन ए : ए व्हिटॅमिन संतुलित राहण्यासाठी गाजर, लाल भोपळा, टोमॅटो, बीट, आंबा यांमधील एखादा पदार्थ रोज खायला हवा. व्हिटॅमिन ए चे औषध घेण्याची गरज नसते. त्यासाठी वरील पदार्थ खावेत.

व्हिटॅमिन बी : शरीराच्या संपूर्ण आरोग्यासाठी हे महत्वाचे असते. त्यासाठी पालक, मेथी, शेपू, हिरवी कांद्याची पात, तांदूळजा, राजगिरा, माठ, चाकवत या भाज्यांचे सेवन आठवडयातून तीनदा करावे.

व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सीमुळे रक्तवाहिन्या लवचीक व मोकळ्या राहतात. रक्तात गुठळी होण्याची शक्यता कमी होते. हे एक अत्यंत प्रभावी ’ऍन्टिऑक्सिडंट’ आहे. त्यामुळे पेशींची झीज भरून काढण्याचे काम व्हिटॅमिन सी करते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून रोज अर्धे लिंबू आहारामधून घ्यावे किंवा रोज एक मोरावळा, आवळा केंडी किंवा सुपारी, संत्री व मोसंबी ही फळे खावी

व्हिटॅमिन डी शरीरामध्ये कॅल्शिअमच्या पचनासाठी, हाडांच्या मजबुतीसाठी व रोगप्रतिकारक शक्तीसाठी व्हिटॅमिन डीची गरज असते. यासाठी रोज सकाळी कोवळ्या उन्हामध्ये बसावे. हात, पाय, पाठ यांवर 10 ते 15 मिनिटे सूर्यप्रकाश घ्यावा.

व्हिटॅमिन ई : व्हिटॅमिन ई हे अत्यंत प्रभावी ऍन्टिऑक्सिडंट आहे. याकरिता गव्हाच्या तृणांचा रस आठवड्यातून तीनदा घ्यावा. इडली, डोसा, ढोकळा आठवड्यातून दोन वेळा खावे. प्रोटीन्ससाठी गव्हाच्या पिठात थोडे मेथीचे दाणे टाकून ठेवावेत. राजगिरा, शेंगदाणे, तीळ यांचे लाडू साखर न घालता गूळ घालून खावे. सर्व प्रकारची मोड आलेली कडधान्ये आठवड्यातून तीनदा खावीत. दिवसभरात उकळलेले 10-12 ग्लास पाणी प्यावे. तारुण्यामध्ये चटकदार मसालेदार मांसाहार, तेलकट, गोड पदार्थ खाल्ले तरी शरीराला त्रास जाणवत नाही.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

आंतरिक बल (भाग – 1)-मनचाही प्राप्ति और कुदरती नियम

प्रत्येक व्यक्ति कोई-न-कोई रोग से पीड़ित है। हमें रोगों का डॉक्टर से मिलकर उपचार करना है। ध्यान साधना व राजयोग अर्थात् परमात्मा की याद से भी रोग ठीक होते हैं परंतु सारी दुनिया ध्यान साधना नहीं करती और न ही भगवान में विश्वास करती और जो लोग साधना करते हैं उनका भी गहरा योग नहीं लगता। प्रायः माने हुये योगी भी बीम ार रहते हैं। बीमारी से मुक्ति पाना सभी का अधिकार है, वह चाहे भगवान को माने चाहे न माने। रोग मुक्त सभी होना चाहते हैं। बीमारी को ठीक करना है तो कुदरत के नियमों को समझना होगा। कुदरती नियम कहता है कि जो कुछ आप प्राप्त करना चाहते हैं या बनना चाहते हैं उसे हर रोज थोड़ी देर दोहराते रहो और कुछ नया ज्ञान पढ़ो। शरीर में कोई भी रोग हो उसकी दवाई तो डॉक्टर से लेते रहो। मन ही मन दोहराते रहो मैं ठीक हो रहा हूँ ठीक हो रहा हूँ। जब भी रोग से तकलीफ हो उस समय कहते रहो मैं ठीक हो रहा हूँ। तब आप सचमुच में ठीक हो जायेंगे। पता नहीं ठीक होऊँगा की नहीं। यह भयानक रोग है। इस बीमारी से फलाना-फलाना व्यक्ति मर गया था। अगर ऐसा सोचेंगे तो रोग ठीक नहीं होगा। दबाई असर नहीं करेगी। कोई पूछे कैसे हो तो कहो पहले से ठीक हूँ। चाहे कितनी तकलीफ हो, कोई भी पूछे उसे यही कहना है पहले से ठीक हूँ। सिर्फ डॉक्टर को बताये कि क्या और कितना कष्ट है। दूसरा व्यक्ति कोई रोग थोड़ा ही ठीक करेगा। उल्टा कोई-न-कोई कमजोर शब्द बोलेगा। अगर हर समय बीमारी का दुखड़ा रोते रहेंगे तो लोग आपसे कन्नी काटने लगेंगे। वह सोचेंगे कि कहीं इसका रोग मुझे न हो जाये। हमारे अंदर एक केन्द्र है जो शरीर की मुरम्मत करता है। एक बार रोज दोहराते रहो मेरे मन वहॉं चल जिस केन्द्र में शरीर को मुरम्मत करने की शक्ति है। वह केन्द्र मेरा रोग ठीक कर रहा है। हे मन उस तापमान में चल जो मॉं के पेट में होता है जहॉं शरीर का पुनर्निर्माण होता है। मैं उसी वातावरण में हूँ। मेरा अमुक अंग का पुनर्निर्माण हो रहा है। यह वाक्य दिन में 10 बार कम-से-कम जरूर दोहराना है । इससे आप में मनोबल बढ़ जायेगा और आप ठीक हो जायेंगे। एक नोट बुक बना लो और उसमें लिखते रहो आप क्या चाहते हैं। इन वाक्यों को एक बार जरूर दोहराना है। पहला नियम मैं स्वस्थ हूँ। इसे दोहराते रहो। आप जो कुछ चाहते हैं उसके लिए कुदरत का नियम यह है कि वह लक्ष्य या इच्छा लिख लो। उसे रोज पढ़ो पढ़ने के बाद एक नया पॉइंट और लिख लो जो आपके लक्ष्य के लिये जरूरी है। आप चाहते हैं मैं इंग्लिश में मास्टरी हासिल करूँ मेरी शब्दावली भरपूर हो जाये। पहले दिन कोई एक नया शब्द लिखे उसका अर्थ लिख लें। अगले दिन उस शब्द को पढ़ो तथा एक नया शब्द और उसका अर्थ लिखे। तीसरे दिन पहले दो दिनों के शब्द पढ़ने हैं। तीसरे दिन नया शब्द लिखना है। ऐसे ही चौथे, पॉंचवें, छठे तथा 365 दिन तक पिछले शब्द दोहराने और एक-एक शब्द बढ़ाते चले जाना है। ये अभ्यास अगर आप 10 वर्ष तक करते रहे तो आपके पास भरपूर इंग्लिश की शब्दावली होगी ऐसे ही अगर आप चाहते हैं कि आपकी सेहत अच्छी

(प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय)

राजाचे डोळे उघडले

त्या देशाचा राजा भयंकर अत्याचारी आणि जुलमी स्वभावाचा होता. श्रीमंतांना जबरदस्ती करून तो लुटीत असे, गरिबांना जिणे नकोसे करून सोडी, त्यामुळे राज्यातील जनता अगदी वैतागून गेली होती. ‘देवा, राजाच्या जाचातून सोडव,’ अशी ती परमेश्‍वराची प्रार्थना करीत असे. मात्र एके दिवशी चमत्कार व्हावा, तसे झाले. राजा शिकारीहून राजवाड्यात परतला, तसे त्याने दवंडी पिटून सर्व प्रजेला राजवाड्यात बोलवून सांगितले, ‘‘प्रजाजनहो, आजपर्यंत मी तुम्हाला फार छळले. तुमच्यावर जुलूम-जबरदस्ती करून भंडावून सोडले. मी तुमच्याशी फार अन्यायाने वागलो. ही माझी चूक झाली. परंतू आजपासून मी तुमच्यावर कसलाही अत्याचार करणार नाही. तुम्हाला सुखासमाधानात आनंदी ठेवीन.’’ राजाचे हे बोलणे ऐकून प्रजेला फारच आनंद झाला. राजा इतका बदलला की, लोक त्याला न्यायी, प्रजाहितदक्ष, वैभवशाली राजा मानू लागले. एकदा राजा खुषीत येऊन गप्पा मारीत असता प्रधान म्हणाला, ‘‘महाराज, आपण एकाएकी एवढे कसे बदललात?‘’ तेव्हा राजा म्हणाला, ‘‘प्रधानजी, तुम्हाला आठवत असेल, त्या दिवशी मी कोणाला न सांगता शिकारीला गेलो होतो. मी एका कोल्ह्याच्या मागावर असता एका कुत्र्याने कोल्ह्याचा लचका तोडला, पण तेवढ्यात कोल्हा बिळात शिरला असे मला दिसले. तो कुत्रा मग तसाच पुढे निघाला असता समोरून येणार्‍या लांडग्याने त्याचे नरडे फोडून त्याला ओढीत चालवले. तोच समोरून एक भरधाव घोडा आला आणि त्याने लांडग्याला एक सणसणीत लाथ हाणताच लांडगा जागेवरच मरुन पडला. घोडा तसाच पुढे निघाला असता समोरून आलेल्या सिंहाने त्याच्या डोक्यावर हल्ला करून त्याला ठार मारले. सिंह त्याच्यावर ताव मारीत असता कुठून तरी एक बाण सूं सूं करत आला आणि गचकन सिंहाच्या मानेत रुतला. या सर्व घटना पाहून माझे डोळे उघडले. मनाशी विचार केला, वाईट कृत्यांची फळं वाईटच मिळतात, हेच खरं. मग मी पुढे गेलोच नाही. तसाच माघारी फिरलो आणि मनाशी निश्‍चय केला की आजपासून कोणावरही अन्याय करायचा नाही. प्रजेचे जेवढे भले करता येईल, तेवढे करण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा.’’

तात्पर्य – आपले वर्तन जर चांगले असेल तर लोकही आपल्याशी चांगले वागतात.