फुटाण्याच्या डाळ्याची चटणी

0
76

साहित्य – फुटाण्याची डाळ पाव किलो, सुक्के खोबरे 150 ग्रॅम, मिरी 15 मिरीचे दाणे, तिखट 4 चमच, हिंग 2 चमचे, तुप पाव वाटी, गुळ 1 छोट्या लिंबाच्या आकाराचा खडा, मिठ चवी प्रमाणे साधारण 1 चमचा

कृती – प्रथम फुटाण्याची डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटुन पुड करुन घ्यावी. 2 चमचे तुप तव्यावर घेऊन त्या वर मिरी भाजावी. नंतर मिरी काढून तुपावर सुक्या खोबर्‍याच्या कातळ्या करुन खरपूस सोनेरी रंग येई पर्यंत भाजाव्यात. गॅस बंद करुन त्याच तापलेल्या तुपा वर हिंग भाजावा मग थोडा तवा गार झाल्यावर त्यावरच मीठ-तिखट टाकावे आणि परतावे. त्यानंतर खोबरे, मिरी, हिंग, तिखट, गुळ चिंच, मिठ मिक्सरला वाटुन घ्यावे व हे मिश्रण डाळीच्या पुडीमध्ये टाकावे. नंतर हे दोन्ही एकत्र करुन परत एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यावे. त्यानंतर हे सगळे एका भांड्यात काढून त्यामध्ये उरलेले तुप हाताने मिक्स करावे.