निदान होईल झटपट!

0
62

एखाद्या विकाराचं निदान लवकर होणं गरजेचं असतं. निदानास विलंब लागल्यास उपचारांअभावी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. पण आता शास्त्रज्ञांनी एका चाचणीचा शोध लावला आहे. या चाचणीमुळे सुरूवातीच्या टप्प्यांमध्येच विकाराचं निदान करता येणं शक्य होणार आहे. पर्ड्यू विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन केलं आहे. त्यांनी मायक्रो इलेक्ट्रोमॅकेनिकल रेसोनेटर्सची निर्मिती केली आहे. हे रेसोनेटर्स रक्तातल्या बायोलॉजिकल मार्कर्सची ओळख पटवू शकतात. यामुळे गंभीर विकार, जंतूसंसर्ग किंवा इतर वैद्यकीय स्थितीचं निदान सुरूवातीच्या टप्प्यांमध्ये करता येईल. ही चाचणी फारशी खर्चिकही नसेल. या चाचणीद्वारे आजारास कारणीभूत ठरणार्‍या विशिष्ट प्र्रथिनाचा शोध घेतला जातो. ही पद्धत वापरून विविध विकाराचं निदान करता येईल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. शस्त्रक्रियेशिवाय विकार बरा करण्याचं उद्दिष्ट समोर ठेऊ न हे संशोधन केलं असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.