…या दिवशी येतो हृदयविकाराचा झटका!

0
56

हल्लीचे धावपळीचे जीवन आणि राहणीमान यामुळे कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा हृदयविकाराचा झटका आल्यावर ‘गोल्डन अवर’मध्ये म्हणजेच पहिल्या तासाभरात उपचार न मिळाल्याने माणसाचा मृत्यू होतो. आठवड्यामधील एखाद्या दिवशी हार्ट ऍटॅकचा धक्का तीव्र असू शकतो का, याविषयी नुकतेच एक संशोधन समोर आले आहे. हृदयविकारामुळे ऐन तारुण्यात अनेकांचे बळी जात आहेत. ‘आम्ही आठवड्यातील काही दिवसांचा अभ्यास केला. कोणत्या दिवशी तीव्र हार्ट अटॅक येण्याचा धोका सर्वाधिक असतो याची तुलना केली. या संशोधनाद्वारे डॉक्टरांना या गंभीर परिस्थितीचा अभ्यास करणे सोपे होईल’, असे ’ब्रिटिश हार्ट फाऊंडेशन’चे वैद्यकीय प्रोफेसर नीलेश समानी यांनी सांगितले. ‘एसटीईएमआय’ हा हार्ट ऍटॅकचा सर्वात धोकादायक प्रकार आहे. हा ऍटॅक आठवड्यामधील अन्य वारांपेक्षा सोमवारी येण्याचा धोका अधिक असतो. आठवड्याची सुरुवातच सोमवारी हो- ते. पर्यायाने ताणतणावाची सुरुवातही सोमवारीच होते. विशेष तज्ज्ञांच्या मते हृदयविकाराचा झटाका येण्याचा धोका वाढण्याचा संबंध हार्मोन्सशी आहे. ‘ही परिस्थिती कामाला परतण्याच्या ताणातूनही निर्माण होऊ शकते‘ असे ‘बेलफास्ट हेल्थ अँण्ड सोशल केअर ट्रस्ट‘चे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जॅक लाफन यांनी सांगितले. तणाव वाढल्याने हॉर्मोन कोर्टिसोलचा स्तर वाढतो. त्यामुळे हार्ट ऍटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून तणाव टाळावा असेही लाफन यांनी सांगितले.