बर्ड फ्लूचा मानवाला धोका

0
120

जगभरात एव्हीयन फ्लू म्हणजेच बर्ड फ्लूचा धोका वाढताना दिसत आहे. धोकादायक म्हणजे बर्ड फ्लू (एच1 एनआय) माणसांनाही संक्रमित करु शकतो. त्यामुळे बर्ड फ्लू संसर्गाचा वाढता धोका पाहता संयुक्त राष्ट्राच्या तीन एजन्सींनी या विषाणूच्या प्रसाराबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. बर्ड फ्लू म ानवांना अधिक सहज संक्रमित करू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर हा चिंतेचा विषय बनला आहे. पावसाळ्यात एकीकडे आजार आणि विविध संसर्गाचे प्रमाण वाढत असताना आता बर्ड फ्लूने चिंता वाढवली आहे. एच 5 एन 1एव्हीयन इन्फ्लूएंझा हा बर्ड फ्लूचा नवा धोकादायक स्ट्रेन जास्त धोकादायक आहे. तो अत्यंत संसर्गजन्य आहे. हा विषाणू माणसांनाही संक्रमित करू शकतो. या नव्या व्हायरसमुळे मानवांमध्ये नवीन साथीच्या रोगाची भीती वाढली आहे. संयुक्त राष्ट्राची अन्न आणि कृषी संघटना आणि ‘वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ऍनिमल हेल्थ’ तसेच जागतिक आरोग्य संघटनेने प्राण्यांना वाचवण्यासाठी आणि लोकांचे संरक्षण करण्यासाठी सर्व देशांना एकत्र काम करण्याचे आवाहन केले आहे.

जागतिक स्तरावर एव्हीयन इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढत आहे. संयुक्त राष्ट्राच्या एजन्सींनी दिलेल्या इशार्‍यानुसार, बर्ड फ्लू मानवांना अधिक सहज संक्रमित करू शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर चिंता वाढली आहे. यूएन एजन्सींनी सर्व देशांना रोगाचे निरीक्षण अधिक बारकाईने करण्यास सांगितले आहे. याशिवाय पोल्ट्री फार्ममध्ये स्वच्छता बाळगण्याचे आणि विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की बर्ड फ्लूची लागण माणसांना झाली आहे. सध्या अशी फक्त सहा प्रकरणे आहेत, ज्यात लोक विषाणू-संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात होते. त्यांना सौम्य लक्षणे होती. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, बर्ड फ्लू संक्रमित पक्ष्यांना स्पर्श केल्यास, संक्रमित प्राण्यांच्या विष्ठेला किंवा राहण्याच्या जागेच्या संपर्कात आल्यास आणि संक्रमित प्राणी आणि पक्षी खाल्ल्यास याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जगभरात चार जणांना एव्हियन फ्लूची लागण झाली होती, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.