माकडाने पळवली एक लाखांची बॅग

0
111

अन्नाच्या शोधात फिरत असताना माकडाची नजर एका बॅगेवर पडली. बॅगेत आपल्याला खाण्यासाठी काही तरी मि ळेल, या आशेने माकडाने धाव घेतली. यानंतर ती बॅग घेऊन ते जाऊन झाडावर बसले; पण माकडाने बॅग नेताच खाली एकच गदारोळ सुरू झाला. कारण या बॅगेत तब्बल एक लाख रुपये होते. त्यामुळे लखपती झालेल्या या माकडाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उत्तर प्रदेशच्या रामपूर येथे घडलेल्या या घटनेची संपूर्ण शहरात जोरदार चर्चा रंगली. शहाबाद येथे विक्री करारासाठी नोंदणी कार्यालयात एक व्यक्ती आली होती. त्याने स्वतःसोबत एक लाखांची रोख रक्कम आणली होती. रक्कम असलेली बॅग त्याने गाडीलाच लावून ठेवली होती. माकडाने बॅग चोरली, तेव्हा सगळा प्रकार कॅमेर्‍यात कैद झाला. यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. शराफत हुसेन हे दिल्लीत वास्तव्याला आहेत. आपली दुचाकी पार्क केल्यानंतर ते एका बाकड्यावर बसून आपली कागदपत्रे तपासत होते. शराफत हुसेन आपल्या कामात व्यग्र असतानाच माकड तिथे आले. तिथे पार्क करण्यात आलेल्या बँगांमध्ये काही सापडते का, हे ते पहात होते. या वेळी हुसेन यांची बॅग त्याच्या हाती लागली. ते बॅग घेऊन पळून गेले. दुसरीकडे शराफत हुसेन यांना याची कल्पनाच नव्हती. हे कळल्यानंतर मात्र घटनास्थळी एकच गदारोळ सुरू झाला. सर्वजण माकडाचा शोध घेऊ लाग- ले. या वेळी माकड एका झाडावर बसले असल्याचे त्यांना दिसले. उपस्थित लोकांनी माकडाकडून बॅग मिळवण्याचा प्रयत्न केला; पण बॅग हाती लागत नव्हती. म ाकडाचा पाठलाग केला असता अखेर हुसेन यांना बॅग मिळवण्यात यश आले. सुदैवाने त्यांचे सर्व पैसे सुरक्षित होते. शहाबादमध्ये माकडांची दहशत वाढली आहे. जिल्हा प्रशासना- ने त्यांना पकडण्यासाठी एक टीम नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पथक माकडांना पकडून जंगलात सोडून देण्याचे काम करेल. शहाबादचे उपजिल्हाधिकारी अनिल कुमार यांनी सांगितले की, माकडांचा हैदोस कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. तालुका पातळी- वर माकडांना पकडून जंगलात सोडून देण्यात येईल, असे ते म्हणाले.