नाशिकचा चिवडा

0

नाशिकचा चिवडा

साहित्य : अर्धा किलो भाजके पोहे,  अर्धा कप डाळ, खोबर्‍याचे काप, १ कप

शेंगदाणे, स्लाइस करून उन्हात वाळवलेला  कांदा, अर्धा कप काळा मसाला, २ चमचे

तिखट, मीठ, ७-८ आमसुलं, धने-जिरे पूड, पिठी साखर, बारीक चिरलेला लसूण,

२ चमचे आल्याचा कीस, २ चमचे तेल,  फोडणीचे साहित्य.

कृती : तेल तापवून, कांदा लालसर तळून घ्या. दाणे, डाळ, खोबरं तळून घ्या.

आमसुलं कुरकुरीत तळा. आलं, लसूण तळा.  (आमसुलं, आलं, लसूण वाटून घ्या.) फोडणी

बनवून त्यात आमसूल इ. वाटलेला मसाला परता.

आरोग्य

0

कडनीस्टोनवर द्राक्षे खाणे लाभदायक

किडनीस्टोनवर द्राक्षांचे सेवन करणे उपयुक्त ठरते. द्राक्षात अलबुमीन आणि सोडिअम
लोराइड यांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे किडनी स्टोन आजाराने ग्रस्त असलेल्यांनी
फळांमध्ये द्राक्षांना प्रधान्य द्यावे.

दैनिक पंचांग रविवार, दि. ३ डिसेंबर २०२३

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, कार्तिक कृष्णपक्ष, आश्लेषा २१|३६ सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. १० मि.

राशिभविष्य

मेष : साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात स्थिती संमिश्र राहील.

वृषभ : मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आनंदाची बातमी मिळेल. निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. मागील उधारी उसनवारी वसूल होईल.

मिथुन : संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला तरी यश मिळेल. नोकरदारांनी इतर व्यक्तींची मदत घेऊन कामे करावी. बेपर्वाईने वागु नका.

कर्क : कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. व्यापार व्यवसायात आशादायक परिणाम मिळतील.

सिंह : जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल. आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या.

कन्या : मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शयता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. स्वाक्षरी करण्यापूर्वी कागदपत्रे वाचून घ्या.

तूळ : मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल. आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ उत्तम आहे. इच्छित कार्य पूर्ण होतील.

वृश्चिक : पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये वरिष्ठांचा सल्ला घेऊन पाउल टाका. मुले व पत्नी यांच्या आनंददायी सहवासामुळे दिवस आनंदात जाईल.

धनु : धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर सन्मान वाढेल.

मकर : आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ मिळेल. कार्यालयामध्ये सहकार्य मिळेल. संपूर्ण दिवसभर वातावरण होकारात्मक राहील.

कुंभ : आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा.

मीन : मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ वार्ता देखील मिळतील. एखादे कार्य झाल्यामुळे आनंदाचा अनुभव येईल.

                                                                                          संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

रताळ्याचा राजस पाक

0

रताळ्याचा राजस पाक

साहित्य : दीड किलो रताळी, दोन
नारळांचा चव, सहा-सात वाट्या साखर,
पाव किलो खवा, ट्रुटी-फ्रुटी, आवडीनुसार
सुकामेवा, रताळी परतण्याइतपत साजूक तूप,
दोन वाट्या दूध.
कृती : रताळी स्वच्छ धुऊन, सालं
काढून टाकावीत, किसणीवर किसून घ्यावीत.
साजूक तुपावर कीस चांगला परतावा. नंतर
नारळाचा चव घालून परतावा. नंतर खवा
घालून परतावा.
साखर+दूध घालून पुन्हा परतावा
आणि हलव्याइतपत घट्ट झाल्यावर खाली
उतरवावा.
खाली उतरवून त्यात आवडीनुसार
काजू, बदाम, टुटीफ्रुटी घालून सजवा. जास्त
गोड हवं असल्यास साखर जास्त घालावी.
मात्र रताळ्यालाही अंगची गोडी असते हे
लक्षात घेऊन साखरेचं प्रमाण ठरवावं.

स्वच्छ त्वचा

कच्च्या दुधात चिमूटभर मीठ घालून
त्वचेवर चोळावे. त्वचा स्वच्छ होते. स्क्रब
होते.

वास्तू

0

 

* प्रफुल्लित, आनंददायक
वातावरणासाठी रात्री झोपताना सौम्य
सुगंधाचा सेंट, अगरबत्ती, सुगंधित फुले यांचा
वापर करावा.
* मधुर संगीत निर्माण करणारे
भिंतीवरील घड्याळ घरातील शुभ सकारात्मक
उर्जेचे संतुलन करते, असे फेंगशुईने मानले
आहे. किचनमध्ये जर एखादा वास्तुदोष असेल
तर त्यात दगडी व धातूची दक्षिणमुखी गणेश
प्रतिमा स्थापन करावी.
                                                       

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

दैनिक पंचांग शनिवार, दि. २ डिसेंबर २०२३

शके १९४५ शोभननामसंवत्सर,  कार्तिक कृष्णपक्ष, पुष्य १८|५४
सूर्योदय ०६ वा. २७ मि. सूर्यास्त ०६ वा. १४ मि.

मेष : अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. आर्थिक स्थिती संमिश्र
राहील. मनोरंजनावर खर्च होईल.

वृषभ: देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. हसत खेळत दिवस
जाईल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

मिथुन : व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा.
कुटुंबातही वेळ चांगला जाईल. राजकीय कार्ये पूर्ण होतील.

कर्क:  सर्व कामे योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण नियोजन कराल.वाहने काळजीपूर्वक चालवा. आर्थिक
विषयांमध्ये सावधगिरी बाळगा.

सिंह: महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले सहकार्य
तुमची उत्तम राजकीय जाण दाखवेल. देवाणय्घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा.

कन्या :  कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. आरोग्य उत्तम
राहील. शत्रूंपासून सावध राहा.

तूळ : कामात अत्यंत व्यस्त राहाल.खर्च वाढेल. महत्वाच्या कार्यात यश मिळेल.
आपल्या प्रकृतीची काळजी घ्या.

वृश्चिक : इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. एखाद्या महत्वाच्या
प्रोजेटमध्ये यश मिळेल.

धनु : अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. विरोधक पराभूत
होतील. आरोग्य उत्तम राहील. पत्र मिळेल.

मकर: इतर लोकांना तुमचे विचार पटतील. नोकरदारांनी कामात लक्ष द्यावे.
अधिकारी आपणास सहकार्य करतील.

 कुंभ :  मनोरंजनावर खर्च होण्याची शयता आहे. प्रेमात स्थिती अनुकूल राहील.
महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा.

मीन: वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल. नवीन करार होतील. नोकरदार
व्यक्तींसाठी स्थिती अनुकू राहील. वडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल.
                                                      संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

राजाचे डोळे उघडले. 

त्या देशाचा राजा भयंकर अत्याचारी आणि  जुलमी स्वभावाचा होता. श्रीमंतांना जबरदस्ती करून
तो लुटीत असे, गरिबांना जिणे नकोसे करून सोडी, त्यामुळे राज्यातील जनता अगदी वैतागून
गेली होती. ‘देवा, राजाच्या जाचातून सोडव,’ अशी ती परमेश्वराची प्रार्थना करीत असे. मात्र एके
दिवशी चमत्कार व्हावा, तसे झाले. राजा शिकारीहून राजवाड्यात परतला, तसे त्याने दवंडी पिटून सर्व
प्रजेला राजवाड्यात बोलवून सांगितले, “प्रजाजनहो, आजपर्यंत मी तुम्हाला फार
छळले. तुमच्यावर जुलूम-जबरदस्ती करून भंडावून सोडले. मी तुमच्याशी फार अन्यायाने वागलो. ही माझी
चूक झाली. परंतू आजपासून मी तुमच्यावर कसलाही अत्याचार करणार नाही. तुम्हाला सुखासमाधानात
आनंदी ठेवीन.” राजाचे हे बोलणे ऐकून प्रजेला फारच आनंद झाला. राजा इतका बदलला की, लोक त्याला
न्यायी, प्रजाहितदक्ष, वैभवशाली राजा मानू लागले. एकदा राजा खुषीत येऊन गप्पा मारीत असता
प्रधान म्हणाला, “महाराज, आपण एकाएकी एवढे कसे बदललात?‘’ तेव्हा राजा म्हणाला,
“प्रधानजी, तुम्हाला आठवत असेल, त्या दिवशी मी कोणाला न सांगता शिकारीला गेलो होतो.
मी एका कोल्ह्याच्या मागावर असता एका कुत्र्याने कोल्ह्याचा लचका तोडला, पण तेवढ्यात कोल्हा
बिळात शिरला असे मला दिसले. तो कुत्रा मग तसाच पुढे निघाला असता समोरून येणार्‍या लांडग्याने त्याचे
नरडे फोडून त्याला ओढीत चालवले. तोच समोरून एक भरधाव घोडा आला आणि त्याने लांडग्याला एक
सणसणीत लाथ हाणताच लांडगा जागेवरच मरुन पडला. घोडा तसाच पुढे निघाला असता समोरून
आलेल्या सिंहाने त्याच्या डोयावर हल्ला करून त्याला ठार मारले.
सिंह त्याच्यावर ताव मारीत असता कुठून तरी एक बाण सूं सूं करत आला आणि गचकन
सिंहाच्या मानेत रुतला. या सर्व घटना पाहून माझे डोळे उघडले. मनाशी विचार केला, वाईट कृत्यांची
फळं वाईटच मिळतात, हेच खरं. मग मी पुढे गेलोच नाही. तसाच माघारी फिरलो आणि मनाशी निश्चय
केला की आजपासून कोणावरही अन्याय करायचा नाही. प्रजेचे जेवढे भले करता येईल, तेवढे करण्याचा
आटोकाट प्रयत्न करायचा.”

तात्पर्य :  आपले वर्तन जर चांगले असेल तर
लोकही आपल्याशी चांगले वागतात.

 

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

जाहिरातींचा उगम आणि विकास कसा झाला?

आपण जर अरेबियन नाईट्स किंवा पौराणिक कथा, बखरी वगैरे वाचल्या तर आपल्या असे
लक्षात येईल की, जाहिरात ही कला फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. पूर्वीच्या काळी राजे लोक आपल्या
लग्नाच्या मुलीची दवंडी पिटवून जाहिरात करायचे. नापितांकडून गावातल्या अनेक गोष्टींची जाहिरात
व्हायची. बाजारात व्यापारी आपल्या मालाची ओरडून जाहिरात करायचे. काही शिलालेखांत राहण्याच्या
व्यवस्थेची, राजानं केलेल्या उत्तम कामांची स्तुती आढळते. ही ही एक प्रकारची जाहिरातच होती. पुढे
भाटांनी ही कामगिरी आपल्या शिरावर घेतली.

इ. स. १४५० मध्ये छपाई कलेचा शोध लागल्यावर पहिली दहा वर्षेतरी छापील जाहिराती
होत नव्हत्या. पहिली छापील जाहिरात करण्याचा मान विल्यम कॅस्टनकडे जातो. इ. स. १४६०
मध्ये विल्यम कॅस्टनने एका धार्मिक पुस्तकात एक जाहिरात छापली. ही पहिली छापील जाहिरात.
पुढे वृत्तपत्रांची सुरुवात झाली आणि लगेचच वृत्तपत्रीय जाहिरातीही सुरू झाल्या. आज जाहिरात
करणे हा एक प्रचंड मोठा धंदा होऊन बसला आहे. अमेरिकेसारख्या देशात दरवर्षी २५ ते ३०
अब्ज डॉलर एवढी रक्कम जाहिरातीपोटी खर्च होते. यात सिनेमाचा समावेश नाही. टी. व्ही., रेडिओ,
नियतकालिके यांच्या उत्पन्नाचा बराच मोठा भाग हा जाहिरातींवर अवलंबून असल्यामुळे आजकाल
बहुतेक प्रगत देशांतून जाहिराती जास्त व कार्यक्रम कमी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

सुविचार

सुविचार :


जे आपली प्रशंसा करतात ते लोक आपल्याला आवडतात,

पण आपण ज्यांची प्रशंसा करतो ते लोक आपल्याला आवडत नाहीत.