सिलिकॉन या मूलद्रव्याचे उपयोग काय?

सलिकॉन हे मूलद्रव्य निसर्गात शुद्ध स्वरूपात सापडत नाही, पण निसर्गात सापडणार्‍या अनेक खनिजांत सिलिकॉन-डाय-ऑसाइड या स्वरूपात ते असते. पृथ्वीच्या कवचात फार मोठ्या प्रमाणात हे सिलिकॉन-डाय-ऑसाइड सापडते. हे सिलिकॉनय्डाय-ऑसाइड विद्युत ऊर्जेच्या सहाय्यानं तापवून, त्यापासून शुद्ध सिलिकॉन मिळवता येते. हे क्वार्टझ, अगेट, जास्पर, कार्नेलियन अशा स्वरूपात सापडत असते. क्वार्टझ हे स्फटिक रूपात सापडणारे सिलिकॉन- डाय-ऑसाइड. सिलिकॉनचे शुद्ध स्वरूपात इलेट्रॉनिक उद्योगात महत्त्वाचे उपयोग आहेत.

पोलादात मिश्रण केलेले सिलिकॉन पोलादाची भारक्षमता वाढवते, तर सिलिकॉन व कार्बन यांचे मिश्रण हे पॉलिशिंग धंद्यात वापरले जाते. प्रकाशकीय घट आणि ट्रान्झिस्टर्स यांच्यामध्येही सिलिकॉन वापरले जाते. याशिवाय सिलिकासँडचा- यात क्वार्टझच्या वाळूचा समावेश आहे याचा उपयोग निरनिराळ्या प्रकारच्या काचा तयार करताना होतो. अनेक मानवी उपयोगाची खनिजे ही निरनिराळ्या मूलद्रव्यांची सिलिकेट्स असतात.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

दव कसे तयार होते?

गवताच्या पात्यावर पडलेले दवबिंदू किंवा कोळ्याच्या जाळ्यावर चमकणारे दवबिंदू किती
छान दिसतात, नाही का? शहरातल्या मुलांना अनुभव नसेल कदाचित, पण हिवाळ्यात सकाळी
गवत ओले असते. आपण यालाच ’दव पडले’ असे म्हणतो, पण प्रत्यक्ष दव पावसासारखे पडत नसते;
तर हवेत जी पाण्याची वाफ असते त्यापासून हे पाण्याचे थेंब बनतात.
रात्री पाने, गवताची पाती जी वाफ उच्छ्वासाद्वारे बाहेर टाकतात त्याचेही हे जलबिंदू बनतातच.
शिवाय रात्री तापमान कमी झाल्यामुळे जे पृष्ठभाग गार बनतात त्यावरही हवेतल्या वाफेचे दवबिंदू
बनतात. हे थेंब किंवा दवबिंदू वाफेचे पाणी होण्यास आवश्यक इतकं तापमान तयार झाल्याने तयार होत
असतात.

त्वचेचा रुक्षपणा


त्वचेवर दररोज मध लावल्यास त्वचेवरील डाग कमी होतात. तसेच त्वचेचा
रुक्षपणाही नाहीसा होतो.
संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

वास्तू

0

मेन गेटच्या ठीक समोर लाकडी, लोखंडी खांब, विजेचा खांब, वृक्ष, पिलर असू
नये. चिंच व मेंदीचे झाड असू नये, वाईट शक्तींचा वास या वृक्षांवर असतो.

सल्ला

0

स्वयंपाकासंदर्भात


* कोणत्याही प्रकारच्या कोफ्त्याच्या
साहित्यात बेसनासोबत थोडीशी दाट मलई
मिसळल्यास कोफ्त्याचा स्वाद द्विगुणित होतो.
* स्टीलची भांडी, सिंक व नळाच्या
तोट्या इ. स्वच्छ करण्यासाठी सोडा वापरा.
त्यामुळे ती नव्यासारखी चमकू लागतील.

थंड इमली सरबत

0

थंड इमली सरबत


साहित्य – चिंच २२५ ग्रॅम, साखर ६७५ ग्रॅम, पाणी सव्वा लिटर, चवीला मीठ,जिरेपूड.

कृति – चिंच स्वच्छ करा व धुवून घ्या. पाण्यात भिजत टाका. अर्ध्या तासाने चांगली
कोळा व चोथा टाका. गाळा. त्यात उरलेले पाणी घाला. २० मिनिटे उकळा. साखर घाला.
परत अर्धा तास उकळा. गाळा निवल्यावर थंड करा. मीठ व जिरेपूड घालून प्या किंवा थंड
सोड्यात हे मिश्रण थोडे थोडे ढवळा व प्या.

आरोग्य

0

व्यायाम ठेवतो फ्रेश


सकाळी ३० मिनिटे व्यायाम केल्यामुळे शारीरिक-मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत
होते. व्यायामामुळे इंडोर्फिन्स हार्मोन्स सक्रिय होते आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश राहण्यास मदत
होते.

सुविचार

 

प्रेम डोळ्यांनी नव्हे; पण हृदयाने पाहत असते. म्हणूनच प्रेम आंधळे असते, असे म्हटले जाते. – शेसपियर

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. ८ डिसेंबर २०२३

उत्पत्ति (स्मार्त) एकादशी, शके १९४५ शोभननामसंवत्सर, कार्तिक कृष्णपक्ष,                                                  हस्त ०८|५४  सूर्योदय ०६ वा. २२ मि. सूर्यास्त ०६वा. २८ मि.


राशिभविष्य-
मेष : मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा
सहयोग मिळेल. शुभवार्ता देखील मिळतील. एखादे कार्य झाल्यामुळे आनंदाचा अनुभव येईल.

वृषभ : मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती
अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.

मिथुन : व्यापार-व्यवसायात स्थितीसुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची
काळजी बाळगणे आवश्यक राहील. वाहनेचोरील जाण्याची शयता आहे.

कर्क: घरात किंवा पैशांमध्ये वाढ झाल्याने आपणास आनंद मिळेल. आपला
निष्काळजी दृष्टीकोन आज चांगला ठरणार नाही.

सिंह: आपल्या आत्मविश्वासाचा स्तरवाढविण्याचा प्रयत्न करा. धार्मिक भावना
वाढेल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूलसहकार्यांबरोबर प्रतिष्ठा वाढेल. मागीलं उधारी
उसनवारी वसुल होईल.

कन्या:  अधिक श्रम करावे लागतील. व्यापार-व्यवसाय व आर्थिक विषयांमध्ये
सावधगिरी बाळगावी लागेल. शत्रू पक्षापासून सावध राहा.

तुळ : सामाजिक क्षेत्रांमध्ये अजून काही विशेष कार्ये होणार नाही. एखादी व्यक्ती
निष्कारण आपल्याला त्रास देईल. मित्रांशी भांडणे संभवतात.

वृश्चिक : शत्रू प्रभावहीन पडतील. आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या                                            आणि व्यापाराच्या नव्या संधी देईल परंतु घाई करणे वादाला कारण ठरू शकते.

धनु : आज रात्री विश्रांती घ्या. घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. शत्रू
प्रभावहीन ठरतील.

मकर : आजचा दिवस आपल्यासाठीनवीन सुरुवात करणे किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय
निर्धारित करण्यात सहायक ठरेल.भाऊबंद डोके वर काढतील.

कुंभ : नोकरदार व्यक्तींनी कार्यात सहयोग घेऊन चालावे. भविष्यात मान-सन्मानात वाढ
होईल. कौटुंबिक प्रश्नांचे निराकरण होईल.मागील उधारी वसुल होईल.

मीन : नेहमीपेक्षा अधिक चांगले काही घडण्यासाठी आपणास आपल्या कामात
एकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे. वाद टाळा.

                                                                         संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

गाढव आणि लांडगा

एका रानात खूप प्राणी राहत होते. त्यांत एक  चांगले धष्टपुष्ट गाढव आणि एक लांडगाही राहत
होता. एकदा लांडग्याने त्या धष्टपुष्ट गाढवाला चरताना पाहिले. याचे थोडे जरी मास खायला मिळाले, तर
काय मजा येईल, असा विचार लांडग्याच्या मनात येताच त्याच्या तोंडाला पाणी सुटले. या गाढवाला
कसे फसवावे, याचा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने एक बेत रचला.
लांडग्याने वैद्याचे सोंग घेतले आणि सर्व प्राण्यांना कळविले की, “मी अनेक देशांत
हिंडून-फिरून सर्व औषधांची माहिती घेतली आहे. माझ्याकडे सर्व रोगांवर रामबाण औषधी वनस्पती
आहेत. प्राण्यांचे सर्व रोग मी बरे करू शकतो.” लांडग्याचा आपल्यावर डोळा आहे, फसवून
माझे मांस त्याला खायचे आहे; म्हणूनच त्याने हे ढोंग रचले आहे, हे गाढवाने ओळखले आणि त्या
लांडग्याला चांगली अद्दल घडवावी, असा विचार गाढवाच्या मनात आला.
मग भोळेपणाचा आव आणून गाढव खोटेच लंगडत-लंगडत लांडग्यापुढे गेले आणि म्हणाले,
“वैद्यमहाराज, माझ्या पायात काटा घुसल्याने मी अगदी वैतागून गेलो आहे. कृपा करून त्यावर काही
उपाय करा.” यावर लांडगा साळसूदपणा दाखवित म्हणाला, “अरे मित्रा, असा माझ्याजवळ ये; म्हणजे
मला तुझा पाय चांगला पाहता येईल.” लांडगा असे म्हणताच गाढव त्याच्याजवळ गेले आणि आपल्या
मागच्या पायाची अशी सणसणीत लाथ लांडग्याच्या तोंडावर हाणली की, ह्या तडाख्याने त्याचे तोंड
फुटून तो मोठमोठ्याने आकांत करू लागला. असे पाहताच गाढवाने धूम ठोकून तेथून पलायन केले;
आणि जाता-जाता म्हणाले, “मला फसवतोस काय लबाडा! आता बस कोकलत.”

तात्पर्य : आपल्यापेक्षा सवाई कोणी तरी भेटतोच.