मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
39

दव कसे तयार होते?

गवताच्या पात्यावर पडलेले दवबिंदू किंवा कोळ्याच्या जाळ्यावर चमकणारे दवबिंदू किती
छान दिसतात, नाही का? शहरातल्या मुलांना अनुभव नसेल कदाचित, पण हिवाळ्यात सकाळी
गवत ओले असते. आपण यालाच ’दव पडले’ असे म्हणतो, पण प्रत्यक्ष दव पावसासारखे पडत नसते;
तर हवेत जी पाण्याची वाफ असते त्यापासून हे पाण्याचे थेंब बनतात.
रात्री पाने, गवताची पाती जी वाफ उच्छ्वासाद्वारे बाहेर टाकतात त्याचेही हे जलबिंदू बनतातच.
शिवाय रात्री तापमान कमी झाल्यामुळे जे पृष्ठभाग गार बनतात त्यावरही हवेतल्या वाफेचे दवबिंदू
बनतात. हे थेंब किंवा दवबिंदू वाफेचे पाणी होण्यास आवश्यक इतकं तापमान तयार झाल्याने तयार होत
असतात.