दैनिक पंचांग रविवार, दि. १० डिसेंबर २०२३

प्रदोष, शके १९४५ शोभननामसंवत्सर, कार्तिक कृष्णपक्ष, स्वाती ११|५० सूर्योदय ०६ वा. २० मि. सूर्यास्त ०६ वा. ३२ मि.

राशिभविष्य 

मेष : आज आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर दबाव आणू शकतो. राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे.

वृषभ : मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल. कौटुंबिक सुख वाढेल. शत्रू पराभूत होतील.

मिथुन : ठरविलेले कामे पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील.

कर्क : आजचा दिवस आपल्या कार्य योजनेंसाठी आणि सहकार्यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल.

सिंह : बेपर्वाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.

कन्या : आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील.

तूळ : आपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल.

वृश्चिक : अधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे.

धनु : आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

मकर : महत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल.

कुंभ : आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात.

मीन : मागील उधारी-उसनवारी वसुल होईल. पत्नीसौख्य लाभेल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल.

                                                                                     संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

आरोग्य

0

अती चहाचे सेवन हानिकारक

चहा अती प्रमाणात प्यायल्याने कॅफिनमुळे मूत्रवृद्धी झाल्यामुळे शरीराची घाण (मल)
मूत्रावाटे निघणे आवश्यक असते. ती घाण शरीराच्या आतच जमा होऊ लागते यामुळे संधिवात
वेदना, किडनीचे आजार, आणि हृदयाचे आजार होऊ लागतात. चहाचे अधिक सेवनाने ऍसिड
मुळे पोटफुगी, पोटदुखी, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, गॅस, अपचन, झोप न येणे, दात पिवळे होणे
यासारखे आजार उद्भवू लागतात.

सुविचार

अविवेकी मनुष्यच मूर्ख असतो. : भगवान शंकराचार्य.

चेहऱ्यावरील समस्या

 

मुळ्याच्या रसात लिंबाचा रस
समप्रमाणात मिक्स करून त्वचेवर लावा.
यामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग उजळेल.
मुळ्याची पाने आणि बी एकत्र वाटून चेहऱ्याला
लावल्यासही चेहऱ्यावरील सर्व समस्या दूर
होतील.

हेल्दी ओट्स व पोहे चिवडा

0

हेल्दी ओट्स व पोहे चिवडा

साहित्य : २ कप ओट्स, १ कप पोहे,
१/४ कप शेंगदाणे, १/४ कप पंढरपुरी डाळ,
१/२ कप खाकरा (तुकडे करून), मीठ व
पिठीसाखर चवीने.
फोडणी करीता : २ टे स्पून तेल, १
टी स्पून मोहरी, १ टी स्पून जिरे, १/२ टी
स्पून हिंग, १/२ टी स्पून हळद, ४ हिरव्या
मिरच्या (चिरून), १०-१५ कडीपत्ता पाने
कृती : एका मध्यम आकाराच्या कढई
मध्ये ओट्स मंद विस्तवावर ४-५ मिनिट
भाजून घ्या. मग पोहे मंद विस्तवावर ४-५ मि
निट भाजून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून
त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हिरव्या मिरच्या,
कडीपत्ता पाने घालून शेंगदाणे घालून परतून
घ्या. मग पंढरपुरी डाळ, हळद, खाकरा
तुकडे, घालून ओट्स व पोहे घालून मिस
करून घेऊन पिठीसाखर व मीठ चवीने घालून
चिवडा २ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या.
चिवडा थंड झाल्यावर प्लास्टिकच्या पिशवीत
भरुन घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.

सल्ला

0

डोकेदुखी घालविण्यासाठी
डाळिंबाच्या कळ्या दोन तोळे आणि
साखर एक तोळा, दोन्ही बारीक वाटून ठेवावे.
याचे नस्य घेण्याने डोकेदुखी शीघ्र नष्ट होते.

वास्तू

0

* ऑफिसमध्ये हिरवा वा इतर
कोणत्याही गडद रंगाचा वापर करू नये. हा
रंग प्रकाश जास्त शोषून घेतो. पांढरा, क्रीम
वा पिवळा यासारख्या रंगाची निवड करावी.
* ऑफिसमध्ये हिरवा वा इतर
कोणत्याही गडद रंगाचा वापर करू नये. हा
रंग प्रकाश जास्त शोषून घेतो.
* वास्तुदोषाच्या अनिष्ट प्रभावापासून
सुटका करून घेण्यासाठीसुद्धा ॐ चा वापर
केला जातो. याची प्रतिमा स्थापना व
विधिपूर्वक पूजा ही मंगलकारी व सुख प्रदान
करणारी ठरते.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

दैनिक पंचांग शनिवार, दि. ९ डिसेंबर २०२३

भागवत एकादशी, शके १९४५ शोभननामसंवत्सर, कार्तिक कृष्णपक्ष, चित्रा १०|४३
सूर्योदय ०६ वा. २० मि. सूर्यास्त ०६ वा. ३२ मि.


राशिभविष्य-

मेष: लोकांमध्ये मतभेद आणि अनोळखी लोकांचा विरोध आपणास अस्वस्थ करू शकते.

वृषभ : जोखीम घेण्याच्या वृत्तीचे प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी नवीन मार्ग काढण्याच्या
आपल्या गुणांचे वरिष्ठांकडून कौतुक होईल.

मिथुन: कार्यक्षेत्रातील एखाद्या कल्पक सर्जनशील कार्यात प्रगति होईल, एखाद्या
ओळखीच्या व्यक्तीबरोबर सामंजस्य वाढेल.

कर्क : मीटिंगच्या माध्यमातूनशिकवण्याची किंवा शिकण्याची संधी मिळण्याचीशयता आहे.

सिंह: आज नवीन संबंध स्थापित करणे, माहितीची देवाण-घेवाण, कसोटी
घेणारा हा दिवस आहे.

कन्या : आपणास अधीर आत्मविश्वासानेपरिपूर्ण वाटेल प्रतिस्पर्धी प्रयत्नासाठी किंवा
एखाद्या अशा कार्यासाठी हा वेळ उत्तम आहे

तूळ: महत्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल.प्रवासाचे योग संभवतात. वाहने काळजीपूर्वक
चालवा.

वृश्चिक : अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील.

धनु : वेळेकडे लक्ष ठेवा. कार्यात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. कार्यक्षेत्रात
मानसिक ताण होण्याची शयता आहे.

मकर: आनंदाचे वातावरण असल्यामुळेकार्य सुरळीत होतील. महत्वपूर्ण कार्यांमध्ये
यश मिळेल. मित्रांचा पाठिंबा राहील.

कुंभ : मनातल्या इच्छा पूर्ण होतील.उत्साहजनक बातम्या मिळतील. कौटुंबिक
वातावरण आनंदाचे राहील.

मीन:  मित्रांचा लाभ मिळेल. मानसन्मानहोईल. आपल्यासाठी अनुकूल वेळ आहे व
महत्त्वाच्या कार्यांमध्ये यश मिळेल.

                                                          संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा !

चौथीच्या वर्गात शाळेचे तपासणीस आले. त्यांनी फळ्यावर एक वाक्य लिहिले.
“रामाने रावणाला मारून टाकली.”
मग विद्यार्थ्यांना त्यांनी विचारले
“या वायात तुम्हाली विशेष काय दिसले?”
मुलांना चुकविण्यासाठी त्यांनी मुद्दामच व्याकरणाची चूक केली होती.
पण अनेक मुलांच्या ती लक्षात आली नाही.
शेवटी एक मुलगा हात वर करून म्हणाला,
‘’मी सांगतो सर.”
तपासणीस आनंदाने म्हणाले,
‘’शाब्बास फळ्यावर मी जे वाक्य लिहिले आहे. त्यात तुला विशेष काय दिसलं?”
‘सर, मला हे विशेष दिसलं की तुमचं हस्ताक्षर वाईट आहे.
तुम्हाला प्रॅटीस करायला पाहिजे.’

जीवनाचे रहस्य

एकदा एका कसायाकडे त्याचा एक मित्र त्याला भेटण्यासाठी गेला होता. तिथे त्याने असे
पाहिले की, एका मोठ्या पिंजर्‍यात खूप असे बोकड, मेंढ्या कैद आहेत आणि एकमेकांशी मस्ती
करत आहेत. मोठ्या आनंदात ते प्राणी आहेत. दुसरीकडे त्याने असे पाहिले की त्याच पिंजर्‍यातून
एकेक बोकड काढून तो कसाई कापत आहे आणि त्याचे मांस विकत आहे.
कसायाच्या मित्राला ही गोष्ट पाहून कसेतरी वाटले. तो त्रस्त झाला कारण ज्यावेळी प्रत्येक
बोकडाला कसाई बाहेर काढून कापत असे हे जाळीतून पिंजर्‍यातल्या प्रत्येक बोकडाला दिसत
होते पण तरीसुद्धा ते बोकड आपला कुणीतरी मित्र मरतो आहे याची जाणीव न ठेवता आनंदात
कसे राहत होते याचे त्या मित्राला राहून राहून आश्चर्य वाटत होते.

बोकड आपल्याच मस्तीत खेळत, बागडत, आनंदात त्या पिंजर्‍यात राहतात कसे याचे त्या
मित्राला कोडे पडले होते. शेवटी न राहवून त्याने त्या कसाई मित्राला याचे कारण विचारले असता
कसाई म्हणाला, अरे मित्रा, फार सोपे कारण आहे. मी त्या प्रत्येक बोकडाच्या कानात असे सांगितले
आहे की, सगळे बोकड मेले तरी हरकत नाही पण मी तुला काही कापणार नाही. त्यामुळे तू आनंदात
राहा. तू एकमेव बोकड असा असशील की जो शेवटपर्यंत जिवंत राहशील. त्यामुळे ते प्रत्येक
बोकड हे आपण जिवंत राहणार या आनंदात आहे आणि हे त्याचमागचे रहस्य आहे.

तात्पर्य – शेवट हा अंतिम सत्य आहे त्यामुळे उरलेले आयुष्य दु:खात वाया घालाऊ नये.