सिलिकॉन या मूलद्रव्याचे उपयोग काय?

0
72

सलिकॉन हे मूलद्रव्य निसर्गात शुद्ध स्वरूपात सापडत नाही, पण निसर्गात सापडणार्‍या अनेक खनिजांत सिलिकॉन-डाय-ऑसाइड या स्वरूपात ते असते. पृथ्वीच्या कवचात फार मोठ्या प्रमाणात हे सिलिकॉन-डाय-ऑसाइड सापडते. हे सिलिकॉनय्डाय-ऑसाइड विद्युत ऊर्जेच्या सहाय्यानं तापवून, त्यापासून शुद्ध सिलिकॉन मिळवता येते. हे क्वार्टझ, अगेट, जास्पर, कार्नेलियन अशा स्वरूपात सापडत असते. क्वार्टझ हे स्फटिक रूपात सापडणारे सिलिकॉन- डाय-ऑसाइड. सिलिकॉनचे शुद्ध स्वरूपात इलेट्रॉनिक उद्योगात महत्त्वाचे उपयोग आहेत.

पोलादात मिश्रण केलेले सिलिकॉन पोलादाची भारक्षमता वाढवते, तर सिलिकॉन व कार्बन यांचे मिश्रण हे पॉलिशिंग धंद्यात वापरले जाते. प्रकाशकीय घट आणि ट्रान्झिस्टर्स यांच्यामध्येही सिलिकॉन वापरले जाते. याशिवाय सिलिकासँडचा- यात क्वार्टझच्या वाळूचा समावेश आहे याचा उपयोग निरनिराळ्या प्रकारच्या काचा तयार करताना होतो. अनेक मानवी उपयोगाची खनिजे ही निरनिराळ्या मूलद्रव्यांची सिलिकेट्स असतात.