हेल्दी ओट्स व पोहे चिवडा
साहित्य : २ कप ओट्स, १ कप पोहे,
१/४ कप शेंगदाणे, १/४ कप पंढरपुरी डाळ,
१/२ कप खाकरा (तुकडे करून), मीठ व
पिठीसाखर चवीने.
फोडणी करीता : २ टे स्पून तेल, १
टी स्पून मोहरी, १ टी स्पून जिरे, १/२ टी
स्पून हिंग, १/२ टी स्पून हळद, ४ हिरव्या
मिरच्या (चिरून), १०-१५ कडीपत्ता पाने
कृती : एका मध्यम आकाराच्या कढई
मध्ये ओट्स मंद विस्तवावर ४-५ मिनिट
भाजून घ्या. मग पोहे मंद विस्तवावर ४-५ मि
निट भाजून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून
त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हिरव्या मिरच्या,
कडीपत्ता पाने घालून शेंगदाणे घालून परतून
घ्या. मग पंढरपुरी डाळ, हळद, खाकरा
तुकडे, घालून ओट्स व पोहे घालून मिस
करून घेऊन पिठीसाखर व मीठ चवीने घालून
चिवडा २ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या.
चिवडा थंड झाल्यावर प्लास्टिकच्या पिशवीत
भरुन घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.