त्वचा जास्त ऑयली वा जास्त कोरडी नसल्यास

अशी त्वचा जास्त ऑयली वा जास्त
कोरडी नसते. ही मऊ, मुलायम दिसते. लिंबू
व तुळस टॅनिंग व अ‍ॅलर्जीपासून रक्षण करतात.
टॅनिंगपासून रक्षणासाठी पीचमध्ये एक चमचा
ओटमील मिसळून त्यात थोडासा मध घालून
दाट पेस्ट तयार करावी व चेहर्‍यावर व मानेवर
पंधरा मिनिटे लावून ठेवावी. त्यानंतर थंड
पाण्याने चेहरा साफ करावा.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

वास्तू

0

घराचा दरवाजा

दरवाजाच्या वाटेमध्ये अवजड वस्तू वा
अडथळा असू नये. दरवाजाची वाट मोकळी
असावी. दरवाजाशी टाकाऊ वस्तूंचे ढीग
किंवा कचऱ्याचे डबे किंवा कचरा असू नये.

सल्ला

0

खीर बनवताना त्यामध्ये एक चमचा
मक्याचे पीठ मिसळल्यास खीर घट्टही होते
व चवदारही.

दैनिक पंचांग मंगळवार, दि. १२ डिसेंबर २०२३

दर्श अमावास्या, शके १९४५ शोभननाम संवत्सर, कार्तिक कृष्णपक्ष, अनुराधा ११|५७
सूर्योदय ०६ वा. २२ मि. सूर्यास्त ०६ वा. ३२ मि.

राशिभविष्य

मेष : पैसा खर्च होईल. संतती बरोबर मतभेद किंवा त्यांच्या चिंतेत मन व्यग्र राहील. सामाजिक क्षेत्रात अपयश येणार नाही याकडे लक्ष द्या.

वृषभ : नवीन कामाची सुरूवात करण्याला अनुकूल दिवस. मित्रांबरोबर दिवस आनंदात घालवाल. मागील देणी वसुल होतील.

मिथुन : विद्यार्थ्यांना आज अभ्यासात रस वाटणार नाही. शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकाल. आध्यात्मिकतेतून शांती मिळेल.

कर्क : मित्र आणि कुटुंबीय यांच्याबरोबर आनंदात दिवस घालवाल. प्रवास, सहली यातूनही आज आनंद मिळवू शकता.

सिंह : आध्यात्मिकतेच्या मदतीने विचारातील नकारात्मकता दूर करा. मनाच्या एकाग्रतेमुळे सर्व कामात फायदा होईल.

कन्या : स्वकीयांचा वियोग घडू शकतो. कुटुंबातील लोकांशी मतभेद संभवतात. मिळणार्‍या फायद्यात नुकसान होईल.

तूळ : देण्या-घेण्याचे निर्णय विचारपूर्वक घ्या. अपघात व गैरसमज यापासून दूरच राहा. वाहने सावकाश चालवावीत.

वृश्चिक : शारीरिकस्वास्थ्य बिघडू शकते. विनाकारण खर्च होईल. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.

धनु : आज अध्यात्माकडे कल राहिल. जुने मित्र व नातेवाईक यांच्या सहवासामुळे दिवस आनंदात व्यतीत होईल. तब्येत सांभाळा.

मकर : उतावीळ स्वभावावर नियंत्रण ठेवून कार्ये शांततेत केल्यास आजचा दिवस हा यशदायी ठरेल. उधारी वसुल होईल.

कुंभ : हितशत्रुंपासून पिडा संभवते. संततीसौख्य लाभेल. कोर्ट-कचेरी आदी गोष्टींपासून लांब रहा.

मीन : आर्थिक व्यवहार करताना अनोळखी व्यतीवर विश्वास ठेवू नका. मागील देणी वसुल होतील.

                                                                                        संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सुविचार

 

कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्‌भुत कार्ये घडतात. – डॉ. हेडगेवार

आरोग्य

0

रोज मनुका खाण्याचे फायदे

मनुका खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन इम्प्रुव्ह होते. यामुळे त्वचेची रंगत वाढतेआणि रंग देखील
निखरण्यास मदत होते. मनुकांमध्ये फायबर्स असतात. हे डायजेशन योग्य ठेवण्यास मदत
करतात. यात पोटॅशियमची मात्रा जास्त असते. मनुका हार्ट अ‍ॅमटॅकच्या आजारांमध्ये इफेटिव
आहे. यात आयरन असते. हे अ‍ॅनीमिया (रक्ताची कमतरता) दूर करण्यास फायदेशीर ठरतात.

पुदिना शेव

0

साहित्य : २ कप बेसन, १ पुदिना गड्डी,
४ हिरव्या मिरच्या, १/४ कप बटर, १/४ टी
स्पून हिंग, चिमूट हळद, मीठ चवीने, तेल
कृती : प्रथम पुदिना गड्डी निवडून,
धुऊन घ्या. मिसरमध्ये पुदिना पाने, हिरवी
मिरची, १/४ कप पाणी घालून चांगली
बारीक पेस्ट करून घेऊन गाळून घ्या. एका
परातीत बेसन व बटर मिस करून घ्या.
मग त्यामध्ये मीठ, हिंग, हळद घालून मिस
करून पुदीन्याचे पाणी घालून मिस करून
शेवेचे पीठ चांगले मळून घ्या. शेवेच्या पिठाला
तेलाचा हात लावावा. शेव बनवण्यासाठी
शेवेचा सोर्‍या घेऊन बारीक भोक असलेली
चकती लावून शेवेचे पीठ त्यामध्ये भरून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये शेव
घालून विस्तव मंद करा. दोन्हीही बाजूने शेव
कुरकुरीत तळून घ्या. शेव थंड झाल्यावर घट्ट
झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.

 

 

वास्तू

0

आरशावर पडदा टाका

नवदाम्पत्याच्या खोलीत आरसा लावू
नये. या खोलीत जर ड्रेसिंग टेबल ठेवला
असेल तर झोपताना तुमचे प्रतिबिंब आरशात
पडणार नाही याची विशेष काळजी घेतली
पाहिजे. परंतु, बदल करण्याची व्यवस्था
नसेल तर आरशावर पडदा टाकायला विसरू
नका.

चेहर्‍यावरील सुरकुत्या

* कुस्करलेला बटाटा रेशमी कापडात
बांधून रोज थोडा वेळ डोळ्यांवर ठेवल्यास
डोळ्यांखालील काळवंडलेपणा नाहीसा होतो.
लिंबाचा रस गाळलेला, दोन तोळे गुलाब अर्क,
२ तोळे ग्लिसरीन मिसळून बाटलीत भरून
ठेवावं. रात्री झोपताना चेहर्‍यावर चोळून लावावे.
वीस दिवस उपचार केल्याने मुरूम, पुटकुळ्या
दूर होऊन त्वचा मऊ आणि तजेलदार होते.
चेहर्‍यावर ग्लो येतो.
* नारळाचे तेल नैसर्गिक प्रकारे सनटैन
दूर करतो. उन्हात बाहेर निघण्यापूर्वी २०-२५
मिनिटे पहिले चेहरा, हात-पायावर लावावे.
* पपई-चेहर्‍यावर सुरकुत्या दिसत
असतील तर पपईचा गर काढून चेहर्‍यावर
लावा. हळूहळू सुरकुत्या नाहीशा होतील.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सल्ला

0

लोणच्याला अधूनमधून उन्हात ठेवावे.
यामुळे त्यातील अवाजवी पाणी सुकून जाते.
उन्हात ठेवताना बरणीचे तोंड कापडाने बांधावे.
लोणचे जास्त वेळ उन्हात ठेवल्यास त्याचा रंग
काळा पडतो व चव फिकी पडते.