हसा आणि शतायुषी व्हा !

0
190

चौथीच्या वर्गात शाळेचे तपासणीस आले. त्यांनी फळ्यावर एक वाक्य लिहिले.
“रामाने रावणाला मारून टाकली.”
मग विद्यार्थ्यांना त्यांनी विचारले
“या वायात तुम्हाली विशेष काय दिसले?”
मुलांना चुकविण्यासाठी त्यांनी मुद्दामच व्याकरणाची चूक केली होती.
पण अनेक मुलांच्या ती लक्षात आली नाही.
शेवटी एक मुलगा हात वर करून म्हणाला,
‘’मी सांगतो सर.”
तपासणीस आनंदाने म्हणाले,
‘’शाब्बास फळ्यावर मी जे वाक्य लिहिले आहे. त्यात तुला विशेष काय दिसलं?”
‘सर, मला हे विशेष दिसलं की तुमचं हस्ताक्षर वाईट आहे.
तुम्हाला प्रॅटीस करायला पाहिजे.’