बगळा आणि खेकडा

त्याने खेकड्याला फारच अलगदपणे आपल्या चोचीत पकडले आणि निघाला. खेकड्याला मजा वाटत होती. आजवर त्याने असा उडत-उडत प्रवास केला नव्हता. तो इकडे-तिकडे पाहात मजेत चालला होता. एवढ्यात त्याची नजर पुढच्या टेकडीवर पडली. तेथे हाडांची रास पडली होती. ती सारी हाडे म्हणजे माशांचे काटे होते; आणि बगळा त्याच बाजूला खेकड्याला घेऊन चालला होता. बुद्धिमान खेकड्याला सर्व गोष्टींचा उलगडा झाला. सारा प्रकार त्याच्या ध्यानात आला. मनातच म्हणाला, “अरे माझ्या देवा, असे आहे तर? आपण तर मरणाच्या दारातच उभे आहोत. आता घाबरून, धीर सोडून उपयोग नाही. जोवर संकट येत नाही, तोपर्यंत भिण्याला अर्थ नसतो. पण आता प्रत्यक्ष मृत्यूच्या दारात असताना संकटाशी मुकाबला करणे, हाच खरा पुरुषार्थ. नशिबाने मला आधीच सावध केले आहे. अजूनही मला सुटका करता येईल.” असा विचार सुचताच खेकड्याने आपल्या नांग्या झटयात उचलून वर घेतल्या आणि बगळ्याची मान त्या नांग्यांनी करकचून आवळली. त्यासरशी बगळ्याची चोच उघडली. तसा खेकडा त्याच्या तावडीतून मोकळा झाला. मोकळा होताच पटकन् तो बगळ्याच्या पाठीवर चढून बसला. घट्ट पकड होताच त्याने बगळ्याची मान कचकन मोडली, तोडली आणि आपला जीव वाचविला. ढोंगी बगळा मरून पडला.

तात्पर्य : ढोंगी लोकांवर कधी विश्वास ठेवू नये. त्यांच्या गोड बोलण्याला फसू नये.

 

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

चलनी नाणी केव्हापासून व्यवहारात आली?

चलनी नाणी व नोटा यांच्यामुळे आज व्यवहार खूपच सुलभ झाला आहे. आपण कुठेही बाहेर पडताना खिशात पैसे ठेवतो. हे पैसे देऊन आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण विकत घेतो. पूर्वीच्या काळी जेव्हा चलन अस्तित्वात नव्हते, तेव्हा गरजेच्या वस्तूंची देवाणघेवाण होत असे. म्हणजे समुद्रकाठी राहणारे लोक आपल्याकडचे मीठ समुद्रापासून दूर राहणार्‍या लोकांना द्यायचे आणि त्यांच्याकडून कापूस घ्यायचे किंवा लोकर नि कातड़ी देऊन तंबाखू नि काचेचे मणी घ्यायचे. असा देवाणघेवाणीचा व्यवहार पूर्वी चालत असे. यामुळे हा व्यवहार करणार्‍या बाजारपेठा निर्माण झाल्या. मात्र या व्यवहारात खूप अडचणी होत्या. गाड्या भरभरून माल इकडून तिकडे हलवावा लागायचा. या अडचणी दूर करण्याच्या प्रयत्नात प्रथम सोने-चांदीच्या चिपांमार्फत व्यवहार सुरू झाला. भारतात रामायण-महाभारत कालाच्या आधीपासून सुवर्णमुद्रा किंवा मोहरा अस्तित्वात होत्या. पाश्चात्त्य देशांत लिडियामध्ये इ. स. पू. ७०० मध्ये प्रथम सोने-चांदी यांच्या मिश्रणाच्या मुद्रा सापडतात. पुढे लिडियातून या मुद्रा ग्रीसमध्ये व तिथून रोमन साम्राज्यातही लोकप्रिय झाल्या. प्रत्येक राजा आपापल्या नवनव्या मुद्रा पाडत असे. यावर बहुधा राजाचा चेहरा किंवा स्तुतीपर मजकूर असे. याला राजाचा ’शिक्का’ म्हणायचे. उत्तर हिंदुस्थानांत आजही नाण्याला ’सिक्का’ असेच म्हणतात. भारतात पूर्वीच्या काळापासून हुंडीची पद्धत होती, तर चीनमध्ये इ. सनच्या दुसर्‍या शतकापासून नोटा असल्याचा पुरावा मिळतो. स्वीडनमध्ये आधुनिक काळातल्या नोटा सर्वप्रथम व्यवहारात आल्या त्या सतराव्या शतकात. आता चेक, ड्राफ्ट अशा व्यवहारपद्धती अस्तित्वात आल्या आहेत. यामुळे हुंडीच्या पद्धतीला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणजे व्यवहाराची दुनियादेखील गोलच आहे

आरोग्य

0

ध्यानधारणेमुळे बोधनक्षमता वाढीस


हठयोग व ध्यानधारणेमुळे मेंदूची संस्कारक क्षमता वाढून अनावश्यक माहितीवर विचार
करण्याची सवय कमी होते, असा दावा कॅनडातील वॉटर्लू विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक
पीटर हॉल यांनी केला आहे. रोजच्या जीवनात चांगल्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता
त्यामुळे वाढते. २५ मिनिटे हठयोग तसेच २५ मिनिटे ध्यानधारणा केल्यानंतर २५ मिनिटे
वाचन केले असता त्याच्या आकलन क्षमतेत फरक पडला. किंबर्ले लू हे या संशोधनाचे प्रमुख
लेखक असून त्यांनी म्हटले आहे की, ध्यानधारणेमुळे बोधनक्षमता वाढते. जर्नल माइंडफुलनेस
या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. ऊर्जापातळी वाढवण्यासाठी हठयोग व
ध्यानधारणा गरजेची आहे, तर हठयोगाचा परिणाम यात जास्त प्रमाणात होतो.

दैनिक पंचांग बुधवार, दि. २७ डिसेंबर २०२३

शके १९४५ शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष कृष्णपक्ष, आर्द्रा २३|२९
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.


राशिभविष्य 
मेष:  आपल्या कार्यक्षेत्रातील किंवाआपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार
करताना सावधगिरी बाळगा. मानसिकअस्थिरता जाणवेल. वैवाहिक जीवनात
अडचणी येण्याची शयता.

वृषभ:  अधिक श्रम करावे लागतील.पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची
काळजी घ्या. महत्त्वाचे निर्णय घेताना विचार करावा लागेल. वातावरण अनुकूल राहील.

मिथुन: एखाद्या मित्राशी झालेली भेट दिलासा देईल. आर्थिक पक्षाबाबत सावध
राहा. व्यवसायातील अनेक कामे मार्गी लावूशकाल. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल.

कर्क: कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही. वाहने अधिक काळजीपूर्वक
चालवा. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल.आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.                                                     मानसिक ताणय्तणाव जाणवेल.

सिंह: आपणास वरिष्ठ अधिकार्‍यांकडूनसमर्थन मिळेल. मानसन्मानात वाढ होईल.
महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. वाहनखर्च होण्याची शयता आहे.

कन्या: आज आपणास कठोर श्रम करावे लागेल. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची
शयता आहे. वैवाहिक सौख्य लाभेल.

तूळ : आजचा दिवस कालच्यादिवसापेक्षा चांगला नसेल. मानसिक स्थिती
आल्हाददायक राहील. प्रतिकूलता जाणवेल.नातेवाईकांपासून सावध रहा. प्रवासाचे योग
संभवतात.

वृश्चिक : आरोग्याची काळजी घ्या.व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च
होईल. आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवसहा विशेष कामासाठी अनुकूल असेल. प्रकृतीत
सुधारणा होईल पण विशेष लक्ष द्या.

धनु: साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा
अधिक असते. मानसन्मानाचे योग येतील.व्यापार-व्यवसायात अडचणी येण्याची
शक्यता .

मकर: चांगले भोजन मिळेल. मौजमजेतदिवस व्यतीत होईल. मानसिक स्थिती
आनंददायक राहील. दैनंदिन कामात सुयशलाभेल. मानसिक सुख मिळेल. वाद-विवाद
शयतो टाळा.

कुंभ: काळजीपूर्वक कार्य करा.संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल.
देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. मानसिकअस्वस्थता जाणवेल. प्रगतीकडे वाटचाल
कराल. कामामध्ये मन रमणार नाही.

मीन: हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. खर्च अधिक होईल. मनोबल व
आत्मविश्वास वाढवणारी एखादी घटना घडेल.तब्येत बिघडू शकते त्याकडे विशेष लक्ष द्या.

                                                                     संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!


बाळोबांचा मुलगा अतिशय ढ होता. एस. एस. सी. ला बरेच वेळा गोते
खाल्ल्यावर शेवटी तो कसाबसा पास झाला. आता तो बी.ए.ला आठव्यांदाम
बसत होता. बाळोबाला त्याच्या मित्रांनी विचारले,
‘तुझा मुलगा बी.ए. झाल्यावर कोण होणार?’
‘म्हातारा’ बाळोबा म्हणाले.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

बगळा आणि खेकडा

एका देशात एक सुंदर सरोवर होते. सरोवरात खूप मासे-खेकडे आनंदात राहत होते. त्याच सरोवराकाठी एक ढोंगी बगळाही राहत होता. सरोवरात खूप मासे असले, तरी याच्या तावडीत ते सहसा सापडत नसत. त्यामुळे बगळ्याला कधी-कधी उपास घडायचा तेव्हा बगळ्याने एक ढोंग रचले. एके दिवशी तो सरोवराच्या काठावर एका पायावर उभा राहिला. डोळे मिटले व जप करीत आहोत, असा देखावा उभा केला. हे तिथेच राहणार्‍या एका खेकड्याने पाहिले. तो जरा लांब उभा राहत म्हणाला, “काय बगळेदादा, आज कशाचा जप करता? शिकार करण्याचा उद्योग बंद केला की काय?” यावर बगळा म्हणाला, “अरे मित्रा, कसली शिकार आणि कसले काय? या सरोवरातील माशांवर माझे जिवापाड प्रेम आहे. मला त्यांची दया येते. बिचार्‍यांवर आता मोठेच संकट येणार आहे. येणारे संकट टळावे; म्हणून मी देवाची प्रार्थना करीत आहे.” “संकट येणार? कसले संकट,दादा?” “अरे, यावर्षी मोठा दुष्काळ पडणार आहे. पाऊस पडणार नाही. बारीक-मोठे तलाव, जलाशय आटून जाणार. हे सरोवर तसे उथळच आहे. फारसे खोल नाही. तेही आटून जाणार आणि माझे मित्र हे मासे फुकटच जिवाला मुकणार. बिचारे पाण्यावाचून तडफडून मरणार.” “पण दादा, हे तुम्हाला कसे समजले?” “अरे मित्रा, कालच मला गरुड महाराज भेटले. त्यांनीच देवांचा असा बेत असल्याचे सांगितले. हे ऐकून खेकडाही घाबरला. तोही पाण्यात राहत होता; माशांवर जगत होता. “पण यावर काही तरी उपाय असेलच ना, बगळेदादा?” “होय मित्रा, यावर उपार आहे.” “तो कोणता, दादा?” “अरे, या टेकडीपलीकडे एक मोठे रुंद आणि खोल सरोवर आहे. ते काही आटणार नाही. आपण सर्वांना तिथे गेले पाहिजे.” “पण दादा, हे मासे कसे काय जाणार तेथे?” “अरे, हे तर मी विसरलोच बघ. पण ही अडचण सोडवता येईल. तुम्ही म्हणत असाल, तर मीच एकेकाला तेथे सोडून येईन.” हे बोलणे चालले असता जवळ असलेल्या माशांनी हे ऐकले. येणार्‍या संकटाने तेही घाबरले. थोड्याच वेळात सरोवरात ही बातमी पसरली. मासे आपआपसात येणार्‍या संकटाबद्दल बोलू लागले, विचार करू लागले. काही मासे म्हणाले, “हा बगळा तर आपला शत्रू. पण यावेळी तो आपला तारणहारच ठरला आहे. विश्वासघात करणार्‍या मित्रापेक्षा उपकार करणारा शत्रू चांगला आहे. संकटात जो उपयोगी पडतो, तोच खरा मित्र. आपण यालाच शरण जाऊ आणि आपला जीव वाचवू.” असे ठरताच सर्व मासे बगळ्याभोवती गोळा झाले. जो-तो पुढे घुसू लागला. आधी मला न्या, आधी मला न्या, म्हणत सर्व मासे रेटारेटी करू लागले; ढकलाढकली करू लागले. गोंधळ माजला. तेव्हा बगळा म्हणाला, “हे बघा मित्रांनो, अशी गडबड कराल, लोटालोटी कराल, तर मी कोणालाच तिकडे पोहोचवणार नाही. जरा शिस्तीने रांग लावा. मग एकेकाला नेऊन सोडीन तिकडे. पाणी आटायला अजून बरेच दिवस आहेत, तोपर्यंत मी सर्वांनाच तिथे सोडीन. मग तर झाले?” यावर सर्व मासे रांग करून उभे राहिले. बगळा एकेका माशाला चोचीत पकडून नेऊ लागला. टेकडीआड जाताच त्याला मारून मटकावू लागला. त्याला विनासायास, काही कष्ट न करता भरपूर खायला मिळू लागले. त्याची खाण्याची चंगळच चालू झाली. अशा प्रकारे काही दिवस जाताच एके दिवशी खेकडा बगळ्याला म्हणाला, “दादा, मी तर सर्वांच्या आधी तुमच्याशी बोललो, मग सर्वांच्या पाठीमागे कशाला राहू? आज मला घेऊन चला.” बगळ्याला ही कल्पना पसंत पडली. वेगळे काही तरी खायला मिळणार, याचा त्याला आनंद झाला. आजवर त्याने खेकडा खाल्ला नव्हता. त्याच्या जिभेला पाणी सुटले. (क्रमशः)

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

रबर कशाचे बनवतात?

रबर म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर पहिली गोष्ट उभी राहते, ती म्हणजे खोडरबर. रबराचे चेंडू, सायकल, स्कूटर, मोटारी, ट्रस यांच्या धावाही रबरी असतात. याशिवाय बागेतून पाणी घालायला वगैरे अजूनही रबरी नळ्या वापरल्या जातात. रबराच्या झाडाचा चीक वाळवून, त्यावर काही प्रक्रिया करून आपले व्यवहारातले रबर तयार केले जाते. झाडापासून काढलेला चीक पांढरा असतो. तो वाळला की त्याला ’नैसर्गिक रबर’ असे म्हणतात. हे रबर उष्णतेने वितळते नि अतिथंडीत भेगाळते. या रबरावर चार्लस् गुडइयर या अमेरिकनाने १९ व्या शतकात काही प्रयोग करून ’व्हल्कनायझिंग’ची प्रक्रिया शोधून काढली. या प्रक्रियेतून गेलेले ’औद्योगिक रबर’ हे व्यवहारोपयोगी ठरले. दक्षिण अमेरिकेतल्या रेड इंडियन जमातींना रबराच्या झाडाची खूप पूर्वीपासून माहिती होती. अमेरिकेत प्रथम गेलेल्या युरोपियन प्रवाशांनी रबर युरोपात आणले. रेड इंडियन लोक या रबराचे गोळे चेंडू म्हणून उपयोगात आणायचे. रबराचे उपयोग वाढू लागल्यावर कृत्रिम रबराचा वापर सुरू झाला. पण पेट्रोलियम पदार्थांचे भाव वाढल्यावर कृत्रिम रबर महागले नि नैसर्गिक रबराची मागणी वाढली. ब्राझील आणि इतर द. अमेरिकन देश यांच्यापेक्षाही आज मलेशिया रबरनिर्मितीत आघाडीवर आहे. द. भारतात रबराची झाडे लावायचे प्रयोग सुरू आहेत.

सुविचार :

सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात; त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या                       ओलाव्याने वितळतात. – साने गुरुजी

वास्तू

0

 


प्रफुल्लित, आनंददायक वातावरणासाठी
रात्री झोपताना सौम्य सुगंधाचा सेंट, अगरबत्ती,
सुगंधित फुले यांचा वापर करावा.
                                                                  संकलक ः अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

स्वच्छ त्वचा

कच्च्या दुधात चिमूटभर मीठ घालून
त्वचेवर चोळावे. त्वचा स्वच्छ होंते. स्क्रब
होते.