मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
92

चलनी नाणी केव्हापासून व्यवहारात आली?

चलनी नाणी व नोटा यांच्यामुळे आज व्यवहार खूपच सुलभ झाला आहे. आपण कुठेही बाहेर पडताना खिशात पैसे ठेवतो. हे पैसे देऊन आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण विकत घेतो. पूर्वीच्या काळी जेव्हा चलन अस्तित्वात नव्हते, तेव्हा गरजेच्या वस्तूंची देवाणघेवाण होत असे. म्हणजे समुद्रकाठी राहणारे लोक आपल्याकडचे मीठ समुद्रापासून दूर राहणार्‍या लोकांना द्यायचे आणि त्यांच्याकडून कापूस घ्यायचे किंवा लोकर नि कातड़ी देऊन तंबाखू नि काचेचे मणी घ्यायचे. असा देवाणघेवाणीचा व्यवहार पूर्वी चालत असे. यामुळे हा व्यवहार करणार्‍या बाजारपेठा निर्माण झाल्या. मात्र या व्यवहारात खूप अडचणी होत्या. गाड्या भरभरून माल इकडून तिकडे हलवावा लागायचा. या अडचणी दूर करण्याच्या प्रयत्नात प्रथम सोने-चांदीच्या चिपांमार्फत व्यवहार सुरू झाला. भारतात रामायण-महाभारत कालाच्या आधीपासून सुवर्णमुद्रा किंवा मोहरा अस्तित्वात होत्या. पाश्चात्त्य देशांत लिडियामध्ये इ. स. पू. ७०० मध्ये प्रथम सोने-चांदी यांच्या मिश्रणाच्या मुद्रा सापडतात. पुढे लिडियातून या मुद्रा ग्रीसमध्ये व तिथून रोमन साम्राज्यातही लोकप्रिय झाल्या. प्रत्येक राजा आपापल्या नवनव्या मुद्रा पाडत असे. यावर बहुधा राजाचा चेहरा किंवा स्तुतीपर मजकूर असे. याला राजाचा ’शिक्का’ म्हणायचे. उत्तर हिंदुस्थानांत आजही नाण्याला ’सिक्का’ असेच म्हणतात. भारतात पूर्वीच्या काळापासून हुंडीची पद्धत होती, तर चीनमध्ये इ. सनच्या दुसर्‍या शतकापासून नोटा असल्याचा पुरावा मिळतो. स्वीडनमध्ये आधुनिक काळातल्या नोटा सर्वप्रथम व्यवहारात आल्या त्या सतराव्या शतकात. आता चेक, ड्राफ्ट अशा व्यवहारपद्धती अस्तित्वात आल्या आहेत. यामुळे हुंडीच्या पद्धतीला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणजे व्यवहाराची दुनियादेखील गोलच आहे