ध्यानधारणेमुळे बोधनक्षमता वाढीस
हठयोग व ध्यानधारणेमुळे मेंदूची संस्कारक क्षमता वाढून अनावश्यक माहितीवर विचार
करण्याची सवय कमी होते, असा दावा कॅनडातील वॉटर्लू विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक
पीटर हॉल यांनी केला आहे. रोजच्या जीवनात चांगल्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता
त्यामुळे वाढते. २५ मिनिटे हठयोग तसेच २५ मिनिटे ध्यानधारणा केल्यानंतर २५ मिनिटे
वाचन केले असता त्याच्या आकलन क्षमतेत फरक पडला. किंबर्ले लू हे या संशोधनाचे प्रमुख
लेखक असून त्यांनी म्हटले आहे की, ध्यानधारणेमुळे बोधनक्षमता वाढते. जर्नल माइंडफुलनेस
या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. ऊर्जापातळी वाढवण्यासाठी हठयोग व
ध्यानधारणा गरजेची आहे, तर हठयोगाचा परिणाम यात जास्त प्रमाणात होतो.