मोदक

0

मोदक

साहित्य – २ फुलपात्रे वर्‍याच्या तांदुळाचे पीठ, २ वाट्या साखर, १ मोठा
नारळ, ७-८ वेलदोडे, २५ ग्रॅम बेदाणा, २टेबलस्पून तूप, १ केळे (हवे असल्यास)

कृती – नेहमीप्रमाणे नारळ व साखर यांचे सारण तयार करावे. त्यात वेलदोड्याची पूड व बेदाणा घालावा. केळे बारीक चिरून आयत्या वेळी घालावे (हवे असल्यास). वर्‍याचे तांदूळ घरी दळावे व चाळणीने पीठ चाळून घ्यावे. २ फुलपात्रे पाणी गॅसवर ठेवून, पाण्यातच मीठ व तूप घालावे. पाण्याला उकळी आली, की त्यात वर्‍याचे पीठ पेरावे व उलथण्याच्या टोकाने
ढवळावे. झाकण ठेऊन वाफ येऊ द्यावी. नंतर खाली उतरवून २ मिनिटांनी उकड चांगली माळून, नेहमीप्रमाणे अगर साचा
वापरुन मोदक करावेत. हे मोदक उपवासाला सुद्धा चालतात.

आरोग्य

0

बेबी मसाजचे फायदे


* मसाजमुळे मुलाचे वजन वाढण्यास मदत होते.
* दिवसभरातून किमान एक वेळा मसाज केल्याने मुलाचे स्नायू बळकट होतात.
* मसाजमुळे मुलामधील एकाग्रता वाढते.
* मुलाच्या पोट व पचनक्रियेसंबंधी व्याधी दूर होतात.
* मसाजमुळे मुले व आई यांच्यात घनिष्टता वाढीस लागते.
* मसाजमुळे मुलांना शांत झोप लागत असते.
* मसाजमुळे मुलाचा शारीरिक व मानसिक विकास होत असतो

दैनिक पंचांग गुरुवार, दि. २८ डिसेंबर २०२३

गुरुपुष्यामृत, शके १९४५ शोभननाम संवत्सर, मार्गशीर्ष कृष्णपक्ष, पुनर्वसु २५|०५
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६वा. २९ मि.


राशिभविष्य-
मेष: आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शयता
आहे. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील.

वृषभ: पोरकटपणा करणे टाळा. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. शांत राहाण्याचा
प्रयत्न करा.

मिथुन : आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या. गृह भूमीसंबंधी
विषयांमध्ये लाभ मिळेल. कोणत्याही प्रकारचे जोखिम टाळा.

कर्क : आपल्या आवडीच्या नातलगांना भेटाआणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.

सिंह:  आजचा दिवस व्यापार क्षेत्रातीलचांगली बातमी आणणारा आहे. आर्थिक
विषयांमध्ये सावगिरी बाळगा.

कन्या: आपण जीवनात हव्या असलेल्या वस्तूंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या
प्राप्तीचा प्रयत्न करा.

तूळ : बळात वाढ होईल. आरोग्य उत्तमराहील. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे.
कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल. वाहने जपून चालवावीत.

वृश्चिक :  व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रातयश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल.
व्यापारात नुकसान मोठे होईल. वैवाहिक सुख वाढेल.

धनु : नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक
दृष्टीकोन प्रदर्शित करा. आपला निष्काळजी दृष्टीकोण आज चांगला ठरणार नाही.

मकर : प्रेमीजनांसाठी आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण असेल. घर बदलण्यासाठी
आजचा दिवस उत्तम आहे. आत्मविश्वासाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न कराल.

कुंभ : आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय
ठरावण्यास साहाय्यक असू शकतो.

मीन : सुख-शांतीचे वातावरण राहील. हसत खेळत वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय
सहज राहील. शत्रू प्रभावहीन ठरतील. मनोरंजनाच्या विषयांमध्ये वेळ खर्च होईल.

संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

बिस्कीटासह बटाटा पकोडे 

0

खाण्याचे शौकीन लोक जगभरात अनेक ठिकाणी सापडतात. ते रुचकर खाण्यासाठी काहीही करू शकतात आणि त्यांच्या आवडत्या गोष्टी खायला कुठेही जाऊ शकतात. आजकाल अन्नावरही विविध प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. काही लोक पाणीपुरी पासून शेक बनवतात तर काहीजण लोकांना अंडी पॉपकॉर्नची रेसिपी देऊन आश्चर्यचकित करतात. असे अनेक प्रयोग बघून कोड्यात पडायला होते. अशाच एका प्रांतामध्ये एक महिला बिस्किटांसह बटाटा पकोडे बनवताना दिसली. तिची ही पाककृती अनेकांना चकीत करुन गेली. महिलेने आधी बटाटे उकडले आणि मॅश केले. नंतर पॅनमध्ये चांगले तळून मसाला बनवला. मग तिने बिस्किटे घेतली. प्रत्येक बिस्किटात बटाटा मसाला भरला. बेसनाच्या पिठात बुडवून तिने पकोडे तळायला सुरुवात केली. हे बिस्कीट पकोडे बटाट्याच्या पकोड्यांसारखे दिसत होते; पण त्यांची चव कशी आहे हे फक्त ती महिलाच सांगू शकते. हे विचित्र पकोडे ‘सोशल मीडिया’वर व्हायरल होत आहेत. अवघ्या ५८ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत २० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला, तर शेकडो लोकांनी व्हिडीओला लाईक करून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरला हे पकोडे कोण खाणार असा प्रश्न पडला तर एकजण म्हणतो, हे पकोडे केवळ दिखाव्यासाठी बनवले गेले आहेत, मला वाटते ते कोणी खाणार नाही. त्याचबरोबर एका यूजरने लिहिले आहे की या महिलेला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तर दुसर्‍याने लिहिले की हा खाद्यप्रयोग आकलनापलीकडचा आहे.

हसा आणि शतायुषी व्हा!

 


मुलगा : बाबा लग्नाला किती खर्च येतो?
बाबा : सांगता येणार नाही,
मुलगा : माझा अंदाज पूर्णपणे चूकला आह

सुविचार

सामर्थ्य हा मनुष्याचा सर्वश्रेष्ठ गुण आहे

वास्तू

0


* हॉलमध्ये उत्तरेस धबधब्याचे चित्र लावावे.

* भौमितिक आकारातील चित्रे विध्वंसक विचार वाढवितात.

संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सल्ला

0


वाळलेला ब्रेड वाळवून वाटून घ्यावा व
बाटलीत भरून ठेवावा. कटलेटस् तळण्यापूर्वी
या चुर्‍यात घोळवावेत. यामुळे कटलेटस्
कुरकुरीत होतील.

डोळ्याखालील काळी वर्तुळे घालविण्यासाठी

डोळ्याखालील काळी वर्तुळे घालविण्यासाठी


* डोळे थंड पाण्याने धूत रहावेत. डोळे
जळजळत असल्यास काकडीच्या चकत्या वा
बर्फाचे खडे डोळ्यांवर ठेवावेत.
* मूळा किसून त्याचा रस व मलाई
एकत्र करून चेहर्‍यावर लावावे. रंग उजळतो.
* मसूर डाळ बारीक वाटून दुधात
घुसळून घ्यावी आणि चेहर्‍यावर लावावी. १०
मिनिटांनी चेहरा धुवून घ्यावा. आठवडाभर हा
उपाय सकाळ-संध्याकाळ करावा.

चॉकलेट बिस्कीट केक 

0

चॉकलेट बिस्कीट केक 

साहित्य – चोवीस मारी बिस्किटे, पाच टी स्पून लोणी, एक कप दूध, तीन टे. स्पून
फळांचा रस, चार टे. स्पून ड्रिंकिंग चॉकलेट, तीन टे. स्पून पिठीसाखर, दोन टे. स्पून
जिलेटीन, शोभेसाठी थोडे भाजलेले काजूचे काप व मलई.

कृती – थोड्या कोमट पाण्यात जिलेटीन विरघळून घ्यावे. नंतर त्यात फळांचा रस घालून सारखे करावे. लोणी फेसून घ्यावे. नंतर त्यात साखर, ड्रिंकिंग चॉकलेट घालून हलके होईपर्यंत पुन्हा फेसावे. जिलेटीनचे मिश्रण गार झाले की ते एगबिटरने घुसळून वरील मिश्रणात घालावे. दुधात एकेक बिस्किट बुडवून एकाप्लेटमध्ये ओळीने मांडावे. प्रत्येक बिस्किटावर चॉकलेटचे मिश्रण ओतावे (पहिल्या थरात साधारण आठ बिस्किटे). पुन्हा बिस्किटांचा एक थर देऊन चॉकलेटचे मिश्रण ओतावे. उरलेले मिश्रण कडेने गोल ओतावे. शोभेसाठी वर काजू व साखर घातलेली मलई पसरावी.
नंतर ही बशी फ्रीजमध्ये ठेवून चांगले घट्ट होऊ द्यावे.