वेफर्स पांढरे राहण्यासाठी
* बटाट्याचे वेफर्स बनवताना पाण्यातचिमूटभर तुरटी टाकली तर वेफर्स पांढरे
राहतात.
* बटाट्याच्या भाजीत रस्सा जास्त झाला असेल तर ती भाजी अधिक घट्ट
बनवण्यासाठी त्यात उकडलेला बटाटा कुस्करुन टाका व वरुन थोडेसे मीठ मिसळा.
चवीसाठी चाट मसालाही मिसळू शकता.
रताळ्याचा राजस पाक
रताळ्याचा राजस पाक

साहित्य: दीड किलो रताळी, दोन नारळांचा चव, सहा-सात वाट्या साखर,
पाव किलो खवा, ट्रुटी-फ्रुटी, आवडीनुसार सुकामेवा, रताळी परतण्याइतपत साजूक तूप,
दोन वाट्या दूध.
कृती : रताळी स्वच्छ धुऊन, सालं काढून टाकावीत, किसणीवर किसून घ्यावीत.
साजूक तुपावर कीस चांगला परतावा. नंतर नारळाचा चव घालून परतावा. नंतर खवा
घालून परतावा. साखर+दूध घालून पुन्हा परतावा आणि हलव्याइतपत घट्ट झाल्यावर
खाली उतरवावा. खाली उतरवून त्यात आवडीनुसार काजू, बदाम, टुटीफ्रुटी घालून
सजवा. जास्त गोड हवं असल्यास साखर जास्त घालावी. मात्र रताळ्यालाही अंगची
गोडी असते हे लक्षात घेऊन साखरेचं प्रमाण ठरवावं.
आरोग्य
दुधी भोपळा हृदयरोग्यांसाठी वरदान
लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आर्द्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, हृदय, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे. दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याकारणाने तो हृदयरोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे.
दैनिक पंचांग मंगळवार, दि. २६ डिसेंबर २०२३
श्री दत्तात्रय जयंती, शके १९४५ शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष शुलपक्ष, मृग २२|२१
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. २६ मि.

राशिभविष्य-
मेष: मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आपल्या प्रिय व्यतींचा
सहवास लाभेल. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. प्रवासाचे योग संभवतात.
वृषभ: व्यवसायातील आर्थिक महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. सहकार्यांशी शयतो
वाद होऊ देऊ नयेत. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. प्रवासाचे योग संभवतात.
मिथुन: मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. जिद्द व चिकाटीने कार्यरत राहून
कामे मार्गी लावू शकाल. वाहने व उपकरणे जपून चालवा. नवीन कार्यात, योजनांमध्ये
यश मिळेल.
कर्क : महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. तांत्रिक वस्तू व वाहने जपून वापरावीत
हलगर्जीपणा केल्यास धोका संभवतो. आरोग्याची व खाण्या-पिण्याची काळजी घ्या.
मागील उधारी व उसनवारी वसूल होईल.
सिंह : वैवाहिक सौख्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. बाहेरचे जेवण शयतो
टाळावे. प्रवासाचे योग संभवतात. कार्यातअडचणी येण्याची शयता आहे. संभाषणात
सावधगिरी बाळगा.
कन्या: आजचा दिवस फायदेशीर ठरेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. आरोग्याची
काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाणय्घेवाण टाळा.
तूळ: व्यवसायात उधारी, उसनवारीची कामे यशस्वी होणार आहेत. मागील उधारी
उसनवारी वसुल होईल. आज आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील.
वृश्चिक : तुमच्या राहत्या जागेचे किंवा प्रॉपर्टीच्या जागेचे प्रश्न सोडवू शकाल. जुने
मित्र व नातेवाईक भेटतील. प्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
धनु : हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. जिद्द व चिकाटी वाढेल. कुटुंबियांसम
वेत वेळ घालवाल. आरोग्य नरम-गरम राहील.आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा.
मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायातील आर्थिक गुंतवणूक फायदेशीर.
वाहने व उपकरणे जपून वापरा. प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल.
कुंभ : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण
समाधानकारक राहील. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील.
मीन : शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला जाईल. अधिकारी वर्गाचे
पाठबळ मिळेल. शत्रू पराभूत होतील. व्यापारव्यवसायात अनुकूल वातावरण राहील.
संकलक: अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
शाही खिचडी
शाही खिचडी
साहित्य – ३ वाट्या दिल्ली राईस, दीड वाटी मुगाची डाळ, १ बटाट्याचे मध्यम काप,
हिंग, हळद, १ वाटी मटार दाणे, २ कांदे, २ इंच आलं, तूप, १५-२० लसूण पाकळ्या,
मिरच्या, दही, थोडे काजू, बदाम, बेदाणे, जिरे, मीठ, गरम मसाला आणि सुया मिरच्या.
कृती – खिचडी करण्याच्या आधी १ तास अगोदर डाळ व तांदूळ एकत्र करून धुवून
ठेवावे. कांदे उभे पातळ चिरावे. पातेल्यात तूप तापवून काजू, बदाम, बेदाणे तळून
घ्यावे. त्याच तुपात कांदा तळून घ्यावा. कांदा लालसर कुरकुरीत तळावा. आलं-लसणाची
पेस्ट करावी. पातेल्यात तूप तापवून हिंग, जिरे, हळद, सुया मिरच्या आणि आलं-लसूण
पेस्ट घालून हे सर्व जिन्नस परतावे. त्यात डाळ, तांदूळ, बटाटे, मटार दाणे टाकावेत. ते
चांगले परतून तांदळाच्या दुप्पट पाणी घालावे. चवीनुसार त्यात मीठ, गरम मसाला घालून मंद
आचेवर खिचडी शिजू द्यावी. खिचडी वाढताना ती गरमागरमच वाढावी
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज
सोन्याची कुर्हाड
एका गावातील एक लाकूडतोड्या लाकडे तोडण्यासाठी रानात गेला. नदीकाठी असलेले एक झाड पाहून तो ते झाड तोडू लागला. परंतु काही वेळातच अचानक हातातील कुर्हाड निसटून ती नदीच्या पाण्यात पडली. तेव्हा दुःखाने तो रडू लागला. लाकूडतोड्याचे रडणे देवाने ऐकले. देव तिथे आला आणि त्याला म्हणाला, “असा का रडतोस बाबा? कसले संकट कोसळले तुझ्यावर?” तेव्हा लाकूडतोड्याने आपली कुर्हाड नदीत पडल्याचे सांगितले. तेव्हा देव म्हणाला, “रडू नकोस, मी तुझी कुर्हाड काढून देतो.” असे म्हणून देवाने नदीत बुडी मारली आणि एक सोन्याची कुर्हाड घेऊन वर येऊन त्याला दाखवीत म्हटले, “अरे, हीच ना तुझी सोन्याची कुर्हाड?” त्यावर ‘नाही नाही’ असे लाकूडतोड्या म्हणताच देवाने पुन्हा नदीत उडी मारून रुप्याची कुर्हाड वर काढून दाखवीत म्हणाले, “मग हीच का?” त्यावर “हीही नाही” असे म्हणताच देवाने पुन्हा नदीत बुडी मारून त्याची स्वतःची पाण्यात पडलेली कुर्हाड वर आणून त्याला दाखविताच, “हो, हीच माझी कुर्हाड!’ असे म्हणत त्याने आनंद व्यक्त केला आणि देवाला धन्यवाद दिले. त्याच्या वागण्यातील प्रामाणिकपणा पाहून देवाने संतुष्ट होऊन त्या सोन्या-रुप्याच्या दोन्ही कुर्हाडी त्याला बक्षीस दिल्या. ही कथा लाकूडतोड्याच्या शेजार्याला समजताच त्याला लोभ सुटला आणि आपणही असेल करावे म्हणून तोही नदीकाठी आला आणि मुद्दामच आपली कुर्हाड पाण्यात टाकून नदीकाठी मोठमोठ्याने रडू लागला. त्याचे रडणे ऐकून देव तेथे आला आणि पहिल्याप्रमाणेच पाण्यात उडी मारून एक सोन्याची कुर्हाड घेऊन वर आला आणि त्या माणसाला म्हणाला, “हीच का तुझी कुर्हाड?” सोन्याची कुर्हाड पाहून त्या लोभी माणसाला मोह आवरला नाही. “ती माझीच कुर्हाड!” असे म्हणत तो देवाच्या हातातील कुर्हाड घेण्यासाठी पुढे येताच देवाने त्याच्या लबाडपणाबद्दल त्याची चांगलीच खरडपट्टी काढीत निर्भत्सना केली. सोन्याची कुर्हाड परत पाण्यात टाकून देवाची स्वारी अदृश्य झाली. अशा प्रकारे सोन्याची कुर्हाड तर दूरच; पण तो लोभी माणूस स्वतःची कुर्हाडदेखील गमावून बसला. तात्पर्य ः प्रामाणिक आणि साधे वर्तन सर्वांनाच आवडते. असा माणूस सर्वांनाच आवडतो. परंतु प्रामाणिकपणाचा नुसता देखावा करून जो लबाडी करायला धजावतो, त्याची लबाडी शेवटी उघडकीला येऊन फजितीच होते





