आरोग्यदायी वेलची
जेवण झाल्यावर थोडीशी वेलची चघळावी. वेलचीच्या सेवनामुळे पोट साफ
होण्यास मदत होते. वेलची खाल्ल्यामुळे भूक चांगली लागते. वेलची चावून खाल्ली,
तर अॅसिडीटी दूर होते, शिवाय जळजळही थांबत.
सफला एकदशी, शके १९४५ शोभननाम संवत्सर, मार्गशीर्ष कृष्णपक्ष, विशाखा २२|०८
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. २७ मि.
राशिभविष्य
मेष :लोकांमध्ये मतभेद आणि अनोळखी लोकांचा विरोध आपणास अस्वस्थ करू
शकते. मुले व पत्नी यांच्या सहवासामुळे आरोग्य उत्तम राहिल.
वृषभ : जोखीम घेण्याच्या वृत्तीचे प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी नवीन मार्ग काढण्याच्या
आपल्या गुणांचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव
आहे.
मिथुन : कार्यक्षेत्रातील एखाद्या कल्पक सर्जनशील कार्यात प्रगति होईल, एखाद्या
ओळखीच्या व्यक्तीबरोबर सामंजस्य वाढेल. सामाजिक कामात सक्रिय भागीदारी. तब्बेत
सांभाळा.
कर्क : मीटिंगच्या माध्यमातून शिकवण्याची किंवा शिकण्याची संधी मिळण्याची
शयता आहे.
सिंह : आज नवीन संबंध स्थापितकरणे, माहितीची देवाण-घेवाण, कसोटी
घेणारा हा दिवस आहे.
कन्या : आपणास अधीर आत्मविश्वासाने परिपूर्ण वाटेल प्रतिस्पर्धी प्रयत्नासाठी किंवा
एखाद्या अशा कार्यासाठी हा वेळ उत्तम आहे वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
तूळ : महत्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल. प्रवासाचे योग संभवतात. वाहने काळजीपूर्वक
चालवा. दिवस धावपळीचा असेल. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.
वृश्चिक : अत्यंत परिश्रम केल्यानंतरथोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील.
लांबलेल्या प्रकरणात यश. वाहने व उपकरणे जपून वापरावीत.
धनु : वेळेकडे लक्ष ठेवा. कार्यात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. कार्यक्षेत्रात
मानसिक ताण होण्याची शयता आहे.
मकर : आनंदाचे वातावरण असल्यामुळे कार्य सुरळीत होतील. महत्वपूर्ण कार्यांमध्ये
यश मिळेल. मित्रांचा पाठिंबा राहील.
कुंभ: मनातल्या इच्छा पूर्ण होतील.उत्साहजनक बातम्या मिळतील. कौटुंबिक
वातावरण आनंदाचे राहील.
मीन : मित्रांचा लाभ मिळेल. मानसन्मान होईल. आपल्यासाठी अनुकूल वेळ आहे व
महत्त्वाच्या कार्यांमध्ये यश मिळेल. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. चांगल्या घटना घडतील.
संकलक: अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
नवरा – तुला किती वेळा सांगितले… स्वयंपाक करताना मोबाईलमध्ये
तोंड खुपसून स्वयंपाक नको करत जाऊस… आमटीत मीठ नाही… हळद
नाही… मिरची नाही… मसाला नाही… अगदी पाण्या सारखी फिक्की आहे.
बायको – (लाटणे फेकून) तुम्हाला किती वेळा सांगितले की मोबाईल
मध्ये तोंड खुपसून जेवत जाऊ नका.. तुम्ही पाण्याच्या ग्लासात पोळी
बुचकळून खात आहात.
मेन गेटसमोर या वस्तू नकोत
* मेन गेटच्या ठीक समोर लाकडी, लोखंडी खांब, विजेचा खांब, वृक्ष, पिलर असू नये. चिंच व मेंदीचे झाड असू नये, वाईट शक्तींचा वास या वृक्षांवर असतो.
* अभ्यासात मन लागत नाही किंवा केलेला अभ्यास लक्षात रहात नाही,अशी समस्या असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यावर उपाय म्हणून स्वतःच्या स्टडी टेबलवर किंवा अभ्यासास बसण्याच्या ठिकाणी स्वतःसमोर ‘एज्युकेशन टॉवर’ची स्थापना करावी, असा सल्ला फेंगशुईने दिला आहे. त्यामुळे शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती, स्मरणशक्ती आत्मविश्वास आणि चिकाटी वाढते, अशी फेंगशुईची धरणा आहे.
थंड इमली सरबत
साहित्य – चिंच २२५ ग्रॅम, साखर६७५ ग्रॅम, पाणी सव्वा लिटर, चवीला मीठ,
जिरेपूड.
कृति – चिंच स्वच्छ करा व धुवून घ्या. पाण्यात भिजत टाका. अर्ध्या तासाने
चांगली कोळा व चोथा टाका. गाळा. त्यात उरलेले पाणी घाला. २० मिनिटे उकळा.
साखर घाला. परत अर्धा तास उकळा. गाळा निवल्यावर थंड करा. मीठ व जिरेपूड घालून
प्या किंवा थंड सोड्यात हे मिश्रण थोडे थोडे ढवळा व प्या.
जीवनाचे रहस्य
एकदा एका कसायाकडे त्याचा एक मित्र त्याला भेटण्यासाठी गेला होता. तिथे त्याने असे पाहिले की, एका मोठ्या पिंजर्यात खूप असे बोकड, मेंढ्या कैद आहेत आणि एकमेकांशी मस्ती करत आहेत. मोठ्या आनंदात ते प्राणी आहेत. दुसरीकडे त्याने असे पाहिले की त्याच पिंजर्यातून एकेक बोकड काढून तो कसाई कापत आहे आणि त्याचे मांस विकत आहे. कसायाच्या मित्राला ही गोष्ट पाहून कसेतरी वाटले. तो त्रस्त झाला कारण ज्यावेळी प्रत्येक बोकडाला कसाई बाहेर काढून कापत असे हे जाळीतून पिंजर्यातल्या प्रत्येक बोकडाला दिसत होते पण तरीसुद्धा ते बोकड आपला कुणीतरी मित्र मरतो आहे याची जाणीव न ठेवता आनंदात कसे राहत होते याचे त्या मित्राला राहून राहून आश्चर्य वाटत होते. बोकड आपल्याच मस्तीत खेळत, बागडत, आनंदात त्या पिंजर्यात राहतात कसे याचे त्या मित्राला कोडे पडले होते. शेवटी न राहवून त्याने त्या कसाई मित्राला याचे कारण विचारले असता कसाई म्हणाला, अरे मित्रा, फार सोपे कारण आहे. मी त्या प्रत्येक बोकडाच्या कानात असे सांगितले आहे की, सगळे बोकड मेले तरी हरकत नाही पण मी तुला काही कापणार नाही. त्यामुळे तू आनंदात राहा. तू एकमेव बोकड असा असशील की जो शेवटपर्यंत जिवंत राहशील. त्यामुळे ते प्रत्येक बोकड हे आपण जिवंत राहणार या आनंदात आहे आणि हे त्याचमागचे रहस्य आहे. तात्पर्य – शेवट हा अंतिम सत्य आहे त्यामुळे उरलेले आयुष्य दु:खात वाया घालाऊ नये.
मुले अंथरुणात लघवी का करतात?
सामान्यतः तीन वर्षांपर्यंत मुलाला लघवीवर नियंत्रण ठेवता यायला लागते. त्यामुळे तोपर्यंत मुले कोठेही लघवी करतात; पण तीन वर्षाच्या नंतरही मुले अंथरुणात लघवी करत असतील, तर त्याचे कारण शोधून उपचार करायला हवेत. मानसिक कारणांमुळे मुले अंथरुणात लघवी करतात. यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्याची इच्छा, रात्री लघवीला बाहेर जाण्याची भीती, रात्री झोपताना पाणी प्यायची सवय, असुरक्षितता यांचा समावेश होतो. या कारणांचा शोध घेऊन त्याचे निराकरण केले, तर ही समस्या सोडवता येईल. अंथरुणात लघवी करण्याच्या इतर कारणांमध्ये मधुमेह, मूत्राशयाचा जंतूसंसर्ग, मूत्रपिंडाचा दाह, शिश्नातून लघवी बाहेर यायला अडथळा, मूत्र बाहेर येण्याचा मार्ग लहान असणे, बद्धकोष्ठ, आतड्यातील कृमींची लागण इत्यादींचा समावेश होतो. क्वचित प्रसंगी मज्जारज्जूत असणार्या जन्मजात दोषामुळेही लघवीवरचे नियंत्रण जाते व मूल अंथरुणात लघवी करते. बहुतांश मुलांमध्ये ही समस्या मानसिक कारणांमुळेच असते; पण क्वचित गंभीर कारणेही त्यामागे असू शकतात. ही शयता लक्षात घेऊन तज्ज्ञांकडून तपासणी करून घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेणे योग्य ठरते.