आरोग्य

 

आल्याच्या चहाचे लाभ

सकाळी एक कप आल्याचा चहा आपल्याला फक्त फ्रेशच करत नाही, तर अनेक
आजारांशी लढायलाही मदत करतो. आल्याच्या चहाचे अँटी इन्फ्लेमट्री, अँटी बॅटेरियल आणि
अँटी ऑसिडेंट गुण तब्येतीसाठी चांगले असतात.

चॉकलेट शंकरपाळे

चॉकलेट शंकरपाळे

साहित्य : २ वाट्या मैदा, मोहनासाठी
आणि तळण्यासाठी तूप, पिठीसाखर, कणभर
मीठ, पीठ, भिजविण्यासाठी दूध, अर्धा टी
स्पून व्हॅनिला इसेन्स.
कृती : मैद्यामध्ये साखर, बेकिंग
पावडर, मीठ, व्हॅनिला इसेन्स घालून
नीट मिस करून घ्या. त्यात मूठ वळेपर्यंत
तुपाचे मोहन घालून, तूप सगळ्या मिश्रणाला
नीट चोळून घ्या. हा गोळा अर्धा तास झाकून
ठेवा. कोको पावडरमध्ये दूध घालून घट्टसर
गोळा मळा. भिजविलेले पीठ आणि कोकोचे
गोळा अलगद मिस करा. पूर्ण एकजीव न
करता कोकोच्या मार्बवसारख्या लाइन्स
दिसतील, असं मिस करा. मोठी पोळी
लाटून आवडीप्रमाणे शंकरपाळे लाटून तळा
किंवा ओव्हनमध्ये १८० अंश तापमानावर २०
मिनिटे बेक करा. या शंकरपाळ्यांवर वरून
डेमोरश शुगर भुरभुरा (ब्राऊन शुगर).

चेहर्‍याचा काळेपणा दूर करण्यासाठी

चेहर्‍याचा काळेपणा दूर करण्यासाठी

मसूर डाळ रात्रभर भिजत ठेवून सकाळी
वाटून घ्यावी. त्यात मध किंवा दही मिसळून
चेहर्‍यावर लावीन १५-२० मिनिटापर्यंत तसेच
ठेवावे. नंतर आंघोळ करावी. त्याने काळेपणा
दूर होऊन चमक येत

वास्तू

घराची पूर्व दिशा स्वच्छ व पवित्र
ठेवावी. या दिशेस पाण्याचा साठा करावा.

संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा,
नगर.

दैनिक पंचांग मंगळवार, दि. ९ जानेवारी २०२४

भौमप्रदोष, शिवरात्रि, शके १९४५ शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष कृष्णपक्ष, ज्येष्ठा
२१|११
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. २७ मि.

राशिभविष्य

मेष : राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील.

वृषभ : घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल.

मिथुन : शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.

कर्क : आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे.

सिंह : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे.

कन्या : मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.
प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. प्रसिद्धी वाढण्याची शयता आहे.

तूळ : मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल. पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक सुख वाढेल.

वृश्चिक : सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त राहातील. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल.

धनु : प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल.

मकर : कामात काही विघ्न येऊ शकतात. अधिक जोखमीचे कार्ये टाळा. आरोग्य नरम-गरम राहील. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा.

कुंभ : व्यापारात वेळ मध्यम राहील. आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल.

मीन : व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. अधिकार्‍यांपासून दूर राहा. मित्रांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. आपले धाडस वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.

                                                                                         संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सुविचार

पुस्तके म्हणजे जागृत देवता आहे. त्यांची सेवा करून त्वरित वरदान मिळवता येते.

वास्तू

असे झोपावे
आपले बेड असे ठेवा की आपले डोके
दक्षिणेकडे वा पूर्वेकडे राहील. पश्चिमेकडे
डोके करून झोपणे टाळा.

सल्ला

शिजवताना जास्त तेल घातल्यास
व जास्त वेळ जाळावर ठेवल्यास भाज्यांची
पौष्टीकता नष्ट होते.

दूध आणि मध एकत्र करून त्वचेवर चोळल्याने ती मऊ व उजळ होते

दूध आणि मध एकत्र करून त्वचेवर
चोळल्याने ती मऊ व उजळ होते

* बदाम, गुलाबाची फुले, चारोळी
व उगाळलेले जायफळ रात्री दुधात भिजवा.
सकाळी वाटून त्याचे उटणे बनवा. यामुळे
चेहर्‍यावरील डाग नाहीसे होऊन त्वचा तेजस्वी
होते.
* लिंबाचा रस आणि खोबरेल तेल
केसांना लावण्याने कोंड्यापासून आराम
मिळतो.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

लाल भोपळी मिरचीची चटणी

लाल भोपळी मिरचीची चटणी

साहित्य – अर्धा किलो लाल भोपळी मिरच्या, पंधरा-वीस बेडगी मिरच्या, दोन
वाट्या टोमॅटोच्या फोडी, अर्धी वाटी चिंचेचा कोळ, एक मोठा चमचा जिरं, पाव वाटी तेल,
तीन मोठे चमचे उडदाची डाळ, चिमूटभर मेथीची पूड, मीठ, चवीला साखर.

कृति – तेल तापवून त्यात जिरे आणि उडदाची डाळ घालावी. डाळीचा रंग गुलाबी
झाला की मेथी आणि मिरच्यांचे तुकडे घालून परतावे. त्यात टोमॅटो घालून परतावे. आपण
वांगी भाजतो तशा लाल भोपळी मिरच्या गॅसवर भाजाव्या आणि गरम असतानाच
पेपर नॅपकीनमध्ये गुंडाळून दोन-तीन मिनिटे ठेवाव्या. नॅपकीननंच त्यांची साल पुसून
काढावी. टोमॅटो, भोपळी मिरचीचे परतलेले तुकडे, मीठ, साखर घालून मिसरमध्ये
चटणी वाटावी