आरोग्य

व्यायाम ठेवतो फ्रेश


सकाळी ३० मिनिटे व्यायाम केल्यामुळे शारीरिक-मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
व्यायामामुळे इंडोर्फिन्स हार्मोन्स सक्रिय होते आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होते.

दैनिक पंचांग शनिवार, दि. ६ जानेवारी २०२४

—-, शके १९४५ शोभननाम संवत्सर, मार्गशीर्ष कृष्णपक्ष, स्वाती २१|२३
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. २७ मि.

राशिभविष्य

मेष : महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ
झाल्याने तुमची मन:शांती ढळेल.

वृषभ : तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल.

मिथुन : तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस.

कर्क : आजचा दिवस विशेष साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत कॅण्डललाईट डीनरचा आस्वाद घ्या. नव्या
कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे.

सिंह : संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे.

कन्या : आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. आज तुमची प्रकृती फारशी बरी नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करणे जड जाईल.

तूळ : आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात. या परमानंदाचा अनुभव घ्या. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ.

वृश्चिक : तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. तुमच्या खासगी आयुष्यात मित्र प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करतील.

धनु : आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल.

मकर : अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. वैवाहिक आयुष्य आजच्याइतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल.

कुंभ : जेवणात मीठाची गरज ही अपिरहार्य असते, आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुखाची गरज भासतेच.

मीन : महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. तुम्ही साजरे करण्याच्या मूडमध्ये असाल आणि कुटुंबातील सदस्य तसेच मित्रमंडळी यांच्यासाठी खर्च करून मजा लुटाल.

                                                                                       संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सुविचार

वाटेल त्या कारणासाठी स्वतःचा पराक्रम खर्च करण्यात खरी हिंमत नसून,
योग्य कारणासाठी प्राणांची बाजी लावण्यात खरा पराक्रम आहे.  : महात्मा गांधी

आरोग्य

मेथ्यांमुळे शरीरातील ऊर्जा

मेथ्यांमुळे शरीरातील उर्जा वाढते. मेथी दाण्यांमुळे प्रतिकारशक्तीतही वाढ होते. नियमित
मेथीचे सेवन करणार्‍या व्यक्तीला अशक्तपणाची जाणीव कमी होऊन उत्साह आणि चैतन्य वाटत
राहते. त्याचप्रमाणे हाडे बळकट होण्यासाठी मेथी उपयुत असते.

पौष्टिक हलवा

पौष्टिक हलवा

साहित्य : कपभर खजुराचा गर, एक
कप दूध, अर्धा कप तूप, काजू, १० पिस्ते,
साखर, थोडी वेलची.
कृती : खजुराचे लहान तुकडे करून
दूध, खजूर, साखर शिजवा. उकळी आल्यावर
तूप सोडा. थोडे काजू त्यात सोडा. मिश्रण
आटल्यावर उतरवा. आता काजू, पिस्ते व
वेलची घाला. पौष्टिक हलवा तयार होईल.

केस गळणे थांबविण्यासाठी

केस गळणे थांबविण्यासाठी
कांद्याचा रस केसांना लावल्यास
केसांची गळती बंद होतात.

सल्ला

एक मूठ भुईमुगाचे दाणे भाजून दहा ग्रॅम
गुळासोबत चावून खावे. न्याहारीच्या वेळेस
असे केल्यास आवश्यक मात्रेत उर्जा प्राप्त
होते. हिवाळ्यात शरीरास उर्जेची आवश्यकता
असते.

वास्तू

वास्तूशास्त्रानुसार जर आपल्या हातात
नकारात्मक उर्जा प्रवेश करत असेल तर
येणारा प्रत्येक दिवस नवीन वाद घेऊन येत
असतो. घरात नीटनेटकेपणा असला तर
सकारात्मक उर्जा प्रवेश करते व घरातील
सदस्यांच्या विचारात परिवर्तन घडवून आणते.
घरातील वस्तूंवर बसलेली धूळ दररोज साफ
करावी. तसे केल्याने घरात येणार्‍या नकारात्म
क उर्जेचा प्रभाव कमी होतो. भिंतीवरील बंद
पडलेले घड्याळ व बिनकामाचे सामान बाहेर
काढा.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. ५ जानेवारी २०२४

—-, शके १९४५ शोभननाम संवत्सर, मार्गशीर्ष कृष्णपक्ष, चित्रा १९|५०
सूर्योदय ०६ वा. ३० मि. सूर्यास्त ०६ वा. २५ मि.

राशिभविष्य

मेष : आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला सोडावे लागतील. कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचे काम करतात.

वृषभ : तुमचे जीवन बदलण्यासाठी पत्नी मदत करील. स्वत:च्या प्रयत्नाने तुम्ही तुमचे जीवन फॅशनेबल करू शकाल आणि इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा दोष देण्याऐवजी स्वत: काम करा.

मिथुन : प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल.

कर्क : दुसर्‍यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. दुसर्‍यांना मदत करण्याची तुमची ताकद, सकारात्मक विचारांनी सुधारा.

सिंह : आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्याल.

कन्या : तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल.

तूळ : मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. पण तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्याल.

वृश्चिक : आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल, आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्यालोकांकडे निव्वळ दुर्लक्ष कराल.

धनु : कुटुंबिय अथवा मित्रांबरोबरील स्नेहमेळाव्यामुळे आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल.

मकर : इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल.

कुंभ : आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरु शकतो, त्यामुळे काळजी घ्या. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे.

मीन : आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळाल.

                                                                                       संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सुविचार

जेव्हा मनुष्याजवळचा पैसा संपतो; तेव्हा त्याच्याजवळची थोडीशी पुंजी संपते; जेव्हा त्याची प्रतिष्ठा नाहीशी होते; तेव्हा
त्यापेक्षा अधिक पुंजी संपते; पण जेव्हा मनुष्य स्वतःची हिंमत घालवून बसतो; तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ट होते. : जॉन रस्किन