राघवदास लाडू

0
90

राघवदास लाडू

साहित्य : हरभरा डाळीचा रवा ४ वाट्या, १ वाटी साजूक तूप, अर्धी वाटी खवा, २ वाट्या साखर, १ चमचा वेलदोडे पूड, काजू, बेदाणे.

कृती : हरभरा डाळीचा रवा दूध घालून घट्ट भिजवून ठेवावा. २ तासांनंतर तूप घालून रवा मोकळा करून खमंग भाजावा. खवा भाजून त्यात मिसळावा. साखरेत पाणी घालून दोन तारी पाक करावा. पाकात रवा, खवा, वेलदोडे पूड घालून मिश्रण एकसारखे करून ठेवावे. २-३ तासांनी लाडू वळावेत. वरून काजू, बेदाणे बसवावेत. राघवदास लागू खूप चवदार, खमंग लागतो. शक्तिवर्धक आहे. आठ दिवस टिकतो.