पंजाबी माँ दी दाल

0
40

पंजाबी माँ दी दाल

साहित्य : १ कप उडीद डाळ, १/२
कप राजमा, ४ कप पाणी, १ तुकडा कापलेले
आले, ४ पाकळी कापलेला लसूण, १
कापलेला कांदा, ३/४ चमचे गरम मसाला,
२ कापलेली हिरवी मिरची, १/२ चमचे हळद,
१ चमचा मीठ, २ मोठे चमचे तेल, ३/४ चमचे
जीरे, कापलेली कोथिंबीर, २ मोठे कापलेले
टोमॅटो, ३/४ चमचे लाल मिरची
कृती : उडीद व राजम्यास ४ कप पाणी
व एक चुटकी मीठ टाकुन उकळावे. तेल गरम
करून जीरे टाकावे. नंतर कांदा, लसूण, आले
व हिरवी मिरची फ्राय करावी. मीठ, वाटलेली
लाल मिरची व हळद टाकून एक मिनीट
फ्राय करून टोमैटो टाकावे. ३ मिनीटानंतर
उकळलेली डाळ टाकावी आणि चमच्याने
चांगली घोटावी, ४-५ मिनीट उकडल्यानंतर
कोथिंबीर व गरम मसाला टाकावा. तंदूरी
पोळी बरोबर गरम गरम खावी.