हसा आणि शतायुषी व्हा!

आई : का रडतोस?
पिंटू : बाबा पाय घसरून चिखलात पडले.
आई : अरे मग रडतोस का?
तुला तर हसायला पाहिजे.
पिंटू : मी अगोदर हसलोच होतो.

दैनिक पंचांग मंगळवार, दि. २७ फेब्रुवारी २०२४

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, माघ कृष्णपक्ष, हस्त अहोरात्र
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३१ मि.

राशिभविष्य

मेष : आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल

आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल.
वृषभ : स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. अधिकारी

वर्गाचा पाठिंबा मिळेल. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल राहील.
मिथुन : आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र

वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल.
कर्क : देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने

काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. ठरविलेले कामे पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील.
सिंह : मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल.

महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा. यथायोग्य विचार करून कार्य करा.
कन्या : स्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी

बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार मिळेल.
तूळ : कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक

स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. त्या संबंधीत कामे ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील.

वृश्चिक : इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. बेपर्वाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते.

धनु : एखाद्या महत्वाच्या प्रोजेटमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शयता आहे. प्रेमात स्थिती अनुकूल राहील. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात.

मकर : हसत खेळत दिवस जाईल. आर्थिक स्थिती संमिश्र राहील. कुटुंबातही वेळ चांगला जाईल. वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल. अधिकारी आपणास सहकार्य करतील. आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल.

कुंभ : देवाण-घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. दिवस उत्तम राहील. महत्वाच्या कार्यात यश मिळेल. आनंदाची बातमी मिळेल.

मीन : जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. पत्र मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या.

                                                                                        संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

वेदना का होते?

वेदना का होते?

पोळले की आपल्याला चटका बसतो. सरांनी हातावर छडी मारली तर दुखते. कान पिळला तरी दुखते. कधीकधी पोट दुखते. कधी डोके दुखते, तर कधी मान मुरगळते. इंजेशन देताना सुई टोचल्यावर दुखते, तसेच काटा मोडल्यास टाचेतही दुखते. जखम झाल्यावर दुखते, तसेच खूप दाब पडल्यासही दुखते. आपल्या दैनंदिन आयुष्यात असे वेदनेचे प्रसंग वारंवार येत असतात. शरीराच्या प्रत्येक भागात मज्जातंतूंचे जाळे असते. त्वचा असो वा जठर, आतडे असे अवयव असो किंवा रक्तवाहिन्या, हृदय असो. या सगळ्यांमध्ये मज्जातंतू असतात. या मज्जातंतूंमधून तापमान, दाब, ताण इत्यादींपासून निर्माण होणार्‍या अप्रिय संवेदना (ज्याला आपण वेदना म्हणतो…) मेंदूपर्यंत पोचवल्या जातात. मेंदूमध्ये या संवेदनांचे विश्लेषण होते व स्नायूंना, अवयवांना काय करावयाचे यासंबंधी आदेश दिले जातात. त्यामुळेच आपण चटका बसल्यावर हात विस्तवापासून दूर नेतो, हातावर दाब देणारी वस्तू बाजूला ठेवतो किंवा वेदना निर्माण करणार्‍या वस्तूपासून दूर जातो. याचाच अर्थ, वेदना होणे ही शरीराचे संरक्षण करण्यासाठीची एक यंत्रणा आहे. मज्जातंतू असल्यानेच आपल्याला वेदना समजते. कुष्ठरोग्याच्या मज्जातंतूंवर विपरीत परिणाम होऊन ते नष्ट झाल्याने त्याला संवेदना नसतात.

त्यामुळे हाताचे बोट कापले गेले वा जळाले तरी त्याला कळत नाही व शारीरिक विकृती निर्माण होतात. जठर, आतडे, फुफ्फुस इत्यादी इंद्रियांमध्ये वेदनेचा संबंध जखमेपेक्षा ताणाशी जास्त असतो. ताणले गेल्यावर या इंद्रियांत वेदना होते. प्रोस्टाग्लँडीनसारखी काही द्रव्ये देखील वेदना होण्यास कारणीभूत असतात. हृदयाला गरजेपेक्षा कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाला की छातीत दुखते. याचे कारण म्हणजे हृदयाच्या स्नायूंच्या पेशींना पुरेसा प्रमाणात प्राणवायू मिळत नाही. वेदना होण्याचे हेही महत्त्वाचे कारण होय. जंतूसंसर्गात, मार लागल्यास निर्माण होणार्‍या दाबामुळेही सूज येते व वेदना होते. वेदना कमी होणे हे साधारणतः रोग बरा होत असल्याचे लक्षण समजतात. पण एक लक्षात ठेवायला हवे, वेदना हा रोग नाही, ते एक लक्षण आहे. रोग बरा करणे हे उपचाराचे मुख्य ध्येय असते. रोग बरा झाला की लक्षणे आपोआपच कमी होतात. अशी आहे ‘व्यथा’ वेदनेची!

सुविचार

आपल्या नम्रतेचा आपणच गर्व करणे या इतकी निंदनीय गोष्ट दुसरी कोणतीच नाही. : मार्कस औरलियस

हिस्टीरियावर घरगुती उपाय

0

हिस्टीरियावर घरगुती उपाय
* बेशुद्ध पडलेल्या स्त्रिया शुद्धीवर येण्यासाठी मिठाच्या पाण्याचे काही थेंब नाकात टाका;
पण हा उपाय लगेच आणि थोड्या वेळासाठीच करा. आवळ्याचा मुरांबा सकाळ संध्याकाळ
जेवणाबरोबर खाण्यानेही फायदा होतो.
* १० ग्रॅम कोरफडीचा रस १० ग्रॅम खडीसाखरेत मिसळून त्रिफला जलाबरोबर प्या. ब्राम्ही
हा मानसिक आजारावरील रामबाण उपाय आहे, ३ ग्रॅम ब्राम्हीची ताजी पाने, ३ ग्रॅम सुकलेली
पाने, १५ काळेमिरे एकत्र करून मिसळून वाटून घ्या. आराम मिळतो.

कणकेचे मोदक

0

कणकेचे मोदक

साहित्य : एका नारळाचा किस, एक
वाटी गुळ, एक चमचा खसखस भाजलेली,
एक चमचा वेलदोडा पावडर, एक चमचा तेल,
चिमुटभर मीठ, दोन मोठे चमचे साजूक तूप,
काजूचे तुकडे.
कृती : नारळाचा चव, गूळ एकत्र
शिजवून घ्यावा. वेलदोडा पावडर व भाजलेली
खसखस टाका. यात दोन मोठे चमचे साजूक
तूप टाका.
काजू बदाम टाका. कणकेत मीठ, तेल,
टाकून कणीक घट्ट मळून घ्या. तेलाचा हात
लावून पातळ पुर्‍या लाटून त्यात वरील सारण
भरून मोदकाचा आकार द्या. चाळणी किंवा
मोदकपात्रात मोदक वाफून घ्या.

चेहर्‍यासाठी ताकाचा वापर

चेहर्‍यासाठी ताकाचा वापर
ताकाने चेहरा धुतल्याने, त्वचेवरील
डाग-धब्बे कमी होतात व रंग उजळतो.

सल्ला

0

स्नानाच्या पाण्यात एक चमचा मध व
एक चमचा ताज्या लिंबाचा रस टाकून स्नान
केल्यास त्वचा मऊ, मुलायम होऊन थकवा
दूर होतो.

वास्तू

0

प्राचीन काळापासून बहुतांश घरांमध्ये
रात्रीच्या वेळी साफसफाई, स्वच्छता केली
जात नाही. अशुभ मानले जाते. घरामध्ये
कोणत्याही प्रकारची धूळ, कचरा असणे
आरोग्यासाठी तर हानिकारक असतेच व
त्याचबरोबर घर-कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी
अस्वच्छता असेल तर आर्थिक अडचणींना
सामोरे जावे लागते. याच कारणाने रात्रीच्या
वेळी साफसफाई करणे वर्ज्य आहे.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

दैनिक पंचांग रविवार, दि. २५ फेब्रुवारी २०२४

गुरुप्रतिपदा, शके १९४५ शोभननाम संवत्सर, माघ कृष्णपक्ष, पूर्वा २५|२४
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. ३४ मि.

राशिभविष्य

मेष : जर आपणास एका कार्यात वाढ मिळाली तर इतर कार्यात अवनती होणे शय आहे. ज आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर दबाव आणू शकतो.

वृषभ : सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल. सहकार्‍यांबरोबर प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य उत्तम राहील. आज आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर दबाव आणू शकतो.

मिथुन :  मनोरंजनाच्या विषयांमध्ये वेळ खर्च होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. पत्नीपासून सुख मिळेल. मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल.

कर्क : गृह भूमीसंबंधी विषयांमध्ये लाभ मिळेल. खरेदी-विक्रीत लाभ मिळण्याची स्थिती बनेल. वैवाहिक सुख वाढेल. ठरविलेले कामे पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा.

सिंह : आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या नव्या संधी देईल परंतु घाई करणे वादाला कारण ठरू शकते.

कन्या : कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आर्थिक प्रयत्नांमध्ये स्थिती अनुकूल राहील. सौंदर्याकडे आकर्षण वाढेल. महत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. सामुदायिक उपक्रमांमध्ये समक्षता आपणास सुविख्यात बनवेल. आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापारय्व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

वृश्चिक : आपल्या जीवनातील इच्छित वस्तूवर लक्ष द्या. कौटुंबिक प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारचे विवाद टाळा.

धनु : व्यापार-व्यवसायात स्थिती सुधार होईल. अनुकूल स्थिती मिळेल. वरिष्ठांशी वितुष्ट येण्याची शयता आहे. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात.

मकर : नेहमीपेक्षा अधिक चांगले काही घडण्यासाठी आपणास आपल्या कामात एकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे.

कुंभ : एखाद्या जुन्या मित्राशी भेट होण्याची शयता आहे. व्यापार-व्यवसायात आशानुरूप परिणाम मिळतील. आरोग्य उत्तम राहील.

मीन : वेळेचे सदुपयोग केल्याने यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आपल्या हातात आलेल्या संधी निसटू देऊ नका. आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल.

                                                                                     संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.