तोंडोली मटार मसालेभात

0
98

तोंडोली मटार मसालेभात

साहित्य – २ वाट्या तांदूळ, २ वाट्या उभी चिरलेली तोंडली, १ वाटी मटारचे दाणे, २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, १ चमचा काळा मसाला, १ चमचा धणेपूड, १/२ चमचा जिरेपूड, १/२ चमचा लमवंग, दालचिनी पूड, तेल, तिखट, मीठ, हळद, दही, ओले खोबरे, कोथींबीर.

कृती – तांदूळ स्वच्छ धूवून ठेवावे. तेलात हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करा. त्यात तोंडली व मटारचे दाणे घालून परता. थोडे पाणी घालून ४ वाफा काढा. नंतर त्यात तांदूळ घालून परता. तिखट, मीठ, मसाले, हळद, दही, ओले खोबरे, कोथींबीर, मिरच्यांचे तुकडे घालून ढवळा. तांदळाच्या दुप्पट पाणी घालून भात करा. जरूर वाटल्यास आणखी थोडे पाणी घाला. चांगली वाफ आणा.