मेथी मटार मलाई

0
72

मेथी मटार मलाई

साहित्य : २ वाट्या बारीक चिरलेली
मेथी, वाफवलेले ३ वाट्या मटार, मीठ
चवीनुसार, ३ चमचे तेल, १-२ चमचे जिरे,
बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला
टोमॅटो, १ कप दुध, चिमुटभर साखर, २
चमचे फ्रेश क्रीम, हिरवी मिरची, आलं, लसून,
काजू, खसखस, खडा मसाला
कृति : मेथी धुऊन त्यावर थोडं मीठ
शिंपडून ठेवा. थोड्या वेळाने सर्व पाणी काढून
टाका. यानंतर कढाईत २ चमचे तेल गरम
करून घ्या, त्यामध्ये जिरं घालून घ्या नंतर
मेथी घालून २-३ मिनिटं परतवू द्या सर्वात
शेवटी खडा मसाला पूड करून घाला नंतर
वाफवलेले मटार, दुध, साखर, फ्रेश क्रीम,
मीठ आणि थोडंसं पाणी घालून मेथी मटार
मलई गरमागरम सर्व्ह करा.