विजेचा शॉक बसल्यास काय होते?

0
55

विजेचा शॉक बसल्यास काय होते?

लहान मुले फार उद्याेगी असतात. त्यांच्या काहीतरी कारवाया चालू असतात. विजेच्या उपकरणांशी खेळणे तर मुलांना फारच आवडते. इकडचा बल्ब काढून दुसरीकडे लाव, असली काही कामे करायला मुले नेहमीच तयार असतात. कधी कधी मात्र या गाेष्टी अंगलट येतात. जुनाट वायरवर ओले कपडे वाळत घालणे, प्लगमध्ये खिळा घालणे, बल्ब हाेल्डरमध्ये बाेट घालणे इत्यादीमुळे विजेचा शाॅक बसताे. विजेचा शाॅक बसला नाही, असा माणूस सापडणे अवघडच आहे. पाणी तापवण्यासाठी बèयाच घरात वापरल्या जाणाèया इमर्शन राॅडचे बटण चालू असताना पाण्यात हात घातला तरी शाॅक बसताे. विजेचा शाॅक हा तसा आपल्याला बारीकसा वा दाेन मिनिटे झिणमिण्या आणणारा अपघात वाटला, तरी प्रत्यक्षात मात्र ताे जीवघेणा असा गंभीर अपघात ठरू शकताे. आकाशात चमकणारी वीज काेणाच्या अंगावर पडली, तर ती व्यक्ती वाचत नाही. तिचा जळून अगदी काेळसा हाेऊन जाताे. घरगुती विजेमुळे मात्र कमी-अधिक शक्तीचे धक्के बसू शकतात. डीसी वीज ही एसीपेक्षा जास्त घातक असते. महाराष्ट्रात जवळपास सगळीकडची वीज एसी आहे. आकाशातून पडणारी वीज मात्र डीसीप्रमाणे कार्य करते. विद्युत धक्क्याचे व शाॅकचे दाेन प्रकारे परिणाम हाेतात. एक म्हणजे भाजणे व दुसरे म्हणजे मज्जासंस्था, स्नायू व हृदय यांच्यावर विद्युतप्रवाहाचा परिणाम हाेणे. विद्युतधक्क्यामुळे हृदयाची गती अनियमित हाेण्याची किंवा हृदय बंद पडण्याची शक्यता असते. शाॅकमुळे स्नायू अचानक आकुंचन पावतात व त्यामुळे दूर ेकले जाणे, खाली पडणे अशा माेठ्या हालचाली हाेऊ शकतात. विजेचा शाॅक खूप माेठा असेल, तर बेशुद्धी येते किंवा मृत्यूही ओढवताे. वीज आणि विकास यांची सांगड आहे, हे आपण औद्याेगिक क्रांतीपासून अनुभवताेय. पण वीज आणि विनाश यांच्या परस्परसंबंधाची जाणीव आपल्याला अपघातातून अधूनमधून हाेत असते. वीज हे दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे त्याचा वापर करताना नीट काळजी घेणे अगत्याचे आहे, अन्यथा जीवावर बेतू शकते.