पाककला

0
31

पाचक
अनेक वेळा अपचन, मळमळ, उलटी,
पचन नीट न होणे या तक्रारीवर जो एक घरगुती
उपाय केला जातो. तो म्हणजे पाचक खाणे.
आता हे पाचक कशाचे अन् कसे बनवले जाते
ते पाहू या –
साहित्य : २५० ग्रॅम आले, सहा रसदार
लिंबे, एक वाटी साखर, १ चहाचा चमचाभर
मीठ, २५ ग्रॅम काळ्या मनुका, चवीनुसार
शेंदेलोण, पादेलोण.
कृती : प्रथम आले स्वच्छ धुऊन घ्या.
मग ते किसून घ्या. लिंबाचा रस काढून घ्या.
त्या रसात साखर, मीठ, शेंदेलोण, पादेलोण,
काळ्या मनुका हे पदार्थ चवीनुसार घाला.
मग त्या रसात आपण किसलेले आले घाला
अन् नीट ढवळून बंद झाकणाच्या बाटलीमध्ये
भरून ठेवा. हे पाचक अबाल-वृद्धांना अजीर्ण
झाले, अपचन झाले, मळमळ होत असेल,
तोंडाला चव नसेल तर थोडेसे खायला द्या.
तसेच हे पाचक पाण्यात मिसळून ते पाणी
प्यायले तरी पण फायदा होतो.