‘क्रेडाई’चे राज्य सचिव आशिष पोखरणा यांचे प्रतिपादन; रसिक ग्रुपचा गुढीपाडवा रसिकोत्सवाची जय्यत तयारी सुरु
नगर – रसिक ग्रुपच्या रसिकोत्सव गुढीपाडवा सांस्कृतिक महोत्सवाने अहिल्यानगरची पूर्ण राज्यात वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण केली आहे. यासाठी जयंत येलुलकर व त्यांच्या सहकारींचे काम कौतुकास्पद आहे. गेल्या २२
वर्षापासून राबवला जात असलेला हा उपक्रम नगरकरांसाठी मोठी मेजवानी ठरत असल्याने रसिकोत्सव कार्यकम सांकृतिक क्षेत्रातील माईल्ड स्टोन ठरला आहे, असे गौरवोद्गार क्रेडाई संघटनेचे राज्य सचिव आशिष पोखरणा यांनी काढले.
ग्रुपच्या वतीने गुढीपाडवा व मराठी नव वर्षाच्या स्वागतासाठी अहिल्यानगरमध्ये गेल्या २२ वर्षांपासून ‘रसिकोत्सव’ या संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. यावर्षी ३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता सावेडीच्या जॉगिंग पार्कच्या मैदानावर होणार्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. यासाठी ४० बाय ६० फुटाचे स्टेज उभारणीच्या
कामास सुरवात झाली आहे. स्टेजच्या कामाचा शुभारंभ आशिष पोखरणा व कायनेटिक कंपनीचे जनरल मॅनेजर शशिकांत गुळवे यांच्या हस्ते नारळ वाढवून झाला. यावेळी ग्रुपचे संस्थापक जयंत येलुलकर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.
संयोजन समितीच्या स्नेहल उपाध्ये म्हणाल्या, नगर शहराचा ऐतिहासिक व सांकृतिक वारसा जपत ही चळवळ तळमळीने पुढे नेणारे जयंत येलुलकर यांच्या पुढाकाराने व संयोजनाने नगरमध्ये होणारा रसिकोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा
गुढीपाडवा सांस्कृतिक सोहळा आहे. या सोहळ्याची नगरकर आतुरतेने वाट बघत असतात. या वर्षीही राज्यात नावाजलेले अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमास उपस्थिती लावणार आहेत. प्रास्ताविकात प्रसन्न ऐखे म्हणाले, सर्वांसाठी
मोफत असलेल्या रसिकोत्सव सोहळ्यासाठी जॉगिंग पार्कच्या मैदानात स्टेज उभारणीस सुरवात झाली आहे. मैदानात सुमारे ३० ते ४० हजार प्रेक्षक बसून या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटू शकतील अशी बैठक व्यवस्था येथे करण्यात येत आहे. त्याच बरोबर एलईडी स्क्रीन, आकर्षक विद्युत रोषणाईची तयारी सुरु झाली आहे. यावेळी संयोजन समितीचे सदस्य सुदर्शन कुलकर्णी, समीर पाठक, तेजा पाठक, दिपाली देऊतकर, निखिल डफळ, श्रीकृष्ण बारटक्के, मीनाक्षी पाटील, प्रशांत आंतेपेल्लू, कुणाल आंतेपेल्लू, बालकृष्ण गोटीपामूल, हनीफ शेख, स्वाती आहेर आदी उपस्थित होते.