नगर – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ ते २५ मार्च या कालावधीत अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित लावणी नृत्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ २५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता उत्साहात पार पडला. कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव
दराडे, पत्रकार सुधीर लंके, प्रा. डॉ. शेषराव पठाडे, शिबिर संचालिका लावणी सम्राज्ञी राजश्री काळे नगरकर, लावणी
सम्राज्ञी आरती काळे नगरकर, मार्गदर्शक ज्येष्ठ ढोलकी वादक पांडुरंग घोटकर गुरुजी, हार्मोनियम वादक लक्ष्मणराव भालेराव, लोककला अभ्यासक बाबाजी कोरडे, सिने अभिनेते मोहिनीराज गटणे, सिने अभिनेते
राधाकृष्ण कराळे आदी उपस्थित होते. प्रारंभी शिबिरार्थींनी पारंपारिक गण, मुजरा, गवळण, बतावणी व लावणी असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमानंतर सहभागी शिबिरार्थींना मान्यवरांच्या हस्ते
प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. पत्रकार सुधीर लंके, प्रा. डॉ. शेषराव पठाडे, लोककला अभ्यासक बाबाजी
कोरडे, ज्येष्ठ ढोलकी वादक पांडुरंग घोटकर गुरुजी, अभिनेते मोहिनीराज गटणे यांनी मनोगत व्यक्त केले. नटराज
पूजन व दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविक शिबिर संचालिका राजश्री काळे नगरकर यांनी केले.
सूत्रसंचालन भगवान राऊत यांनी केले. आरती काळे नगरकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास शिबिरार्थींचे पालक
व रसिक उपस्थित होते.