म्हैसूर पाक
साहित्य : ३ लहान वाट्या ताजे बेसन,
३ वाट्या साखर, ५ वाट्या तूप, वेलदोडे पूड
अर्धा चमचा, थोडे बदाम काप.
कृती : २ मोठा चमचा तूप डाळीच्या
पिठाला चोळा व मंद गॅसवर थोडे भाजा.
दुसरीकडे २ वाट्या पाणी व ३ वाट्या
साखरेचा पाक करा. त्यात भाजलेले बेसन
घाला व घोटा. दुसर्या गॅसवर तूप गरम करत
ठेवा. दर २ मिनिटांनी ३ मोठे चमचे गरम तूप
बेसनात घालत राहा.
साधारण १ वाटी तूप उरेपर्यंत तूप
घालून हलवत राहा. बेसनाचे मिश्रण चौकोनी
ट्रेमध्ये घालून हलवा. म्हणजे सगळीकडे
सारखे पसरेल. आता पातेल्यात उरलेले १
वाटी गरम तूप पूर्ण म्हैसूरपाकावर ओता असे
केल्याने जाळी छान पडते.