प्रेग्नन्सीमध्ये उपयुत नारळपाणी

0
116

प्रेग्नन्सीमध्ये उपयुत नारळपाणी
सौंदर्याच्या दृष्टीकोनातून नारळाचे तेल फार उपयुक्त आहे. नारळाचा खोवलेला कीस,
नारळाचे पाणी, दुध, तेल इतकेच काय तर नारळाची कवटी सुद्धा सौंदर्यवृद्धीसाठी फार
महत्त्वाची आहेत. नारळामध्ये विविध प्रकारचे एन्झाइम्स असतात. यात प्रामुख्याने इन्व्हेस्टीन,
ऑसिडेज आणि कॅटॅलेज यांचा समावेश असतो. तसेच ओल्या नारळात तेल, प्रथिने आणि
इतर तत्व असतात.
नारळाच्या पाण्याची एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे स्त्री गर्भार राहिल्या नंतर
आठवड्यातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित पिल्यास बाळाची कांती सुधारते आणि
बाळाचा रंग उजळतो, ओले आणि सुके खोबरे शांती देणारे, कामशक्ती वाढवणारे, पोट साफ
होण्यास मदत करणारे, तसेच बद्धकोष्ठाचा नाश हि होतो. त्वचेचे आरोग्य त्यामुळे सुधारते.