डेसिकेटेड कोकोनट बर्फी

0
128

डेसिकेटेड कोकोनट बर्फी

साहित्य : पाव किलो डेसिकेटेड
कोकोनट (बाजारी खोबरा कीस), दुधाची
पावडर शंभर ग्रॅम, दीड वाटी साखर, एक
वाटी दूध, चमचाभर तूप, वेलदोडा पूड वा
व्हॅनिला इसेन्स.
कृति : साखरेत एक वाटी दूध घालून
पाक करावा. एकतारी पाक झाल्यावर त्यात
खोबरा कीस घालून ढवळावे. तूप सोडावे.
(हे सगळे नॉनस्टिक कढई किंवा पॅनमध्ये
करावे) व घट्ट होत आले की उतरवून त्यात
दुधाची पावडर घालून खूप घोटावे व तूप
लावलेल्या थाळ्यात ओतून वड्या थापाव्या.
थंड झाल्यावर कापाव्या.