नगर – भनसाळी टिव्हिएसचे नवे आधुनिक सर्व सुविधांनी सुसज्ज वर्कशॉपचे उद्घाटन पद्मश्री पुरस्कार प्राप्त अॅड. उज्वल निकम यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाव्दारे झाले. यावेळी कंपनीचे सर्व्हिस एरिया मॅनेजर योगेश निकुंभ उपस्थित होते.
यावेळी बोलतांना अॅड. निकम म्हणाले की, आययुब ही खरोखरच फार सुंदर गाडी असुन अल्पावधीत ती जनमानसात लोकप्रिय झाली आहे. ही इलेट्रिक गाडी असल्याने सामान्यांच्या पेट्रोल खर्चात मोठी बचत झाली असुन यामुळे पर्यावरण देखील चांगले राहते. कंपनीच्या सर्व्हिस मॅनेजर योगश निकुंभ यांनी गाडीची फिचर्सची संपुर्ण माहिती सांगितली. अभिनंदन भनसाळी हे वर्कशॉपबद्दल बोलतांना म्हणाले की, सध्या चाललेल्या ट्रेड व गरजेनुसार सर्व लोकांचा इलेट्रिक वाहनांकडे अधिक कल वाढला आहे. ग्राहकांना अधिक चांगली व तत्पर सेवा देण्यास आम्ही सदैव तत्पर असतो. मात्र आता या आधुनिक व सुसज्ज वर्कशॉप मुळे ग्राहकांना सर्व्हिसिंग किंवा गाडीच्या इतर कामासाठी कमी वेळ लागणार असुन त्यामुळे ग्राहकांच्या वेळेची बचत आणि संपुर्ण समाधान करण्यावर आमचा विशेष प्रयत्न राहणार आहे.
भनसाळी टिव्हिएसचे अद्ययावत आधुनिक वर्कशॉपचे उद्घाटन
आशा फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिन साजरा
नगर – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन आशा फाऊंडेशन तर्फे विविध कार्यक्रम साजरे करण्यात
आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. अनुराधा येवले व प्राचार्या गिता गिल्डा उपस्थित होत्या. लक्ष्मीचे पूजन
करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. बेटी बचाओ बेटी पढाओचे महत्त्व सांगून महिलांना मार्गदर्शन करण्यात
आले तसेच संस्थेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करुन स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
संस्थेच्यावतीने शुभांगी देशमुख, केदार देशमुख, वर्षा गांधी व सुनिता चक्रवर्ती, नीता भिंगारदिवे उपस्थित
होते. विजयी स्पर्धकांना गिता गिल्डा व अॅड. अनुराधा येवले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले
नगर महापालिकेचा सन २०२५-२६ चा १६८० कोटींचा अर्थसंकल्प सादर
स्व उत्पन्नासह केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून अनेक प्रकल्प लागणार मार्गी
नगर -अहिल्यानगर महापालिकेच्या लोकनियुक्त सदस्यांची मुदत संपून सव्वा वर्ष झाले आहे. त्यामुळे प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी महापालिकेचा सन २०२५-२६ चा एकुण १६८० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासकीय स्थायी समितीत १२ मार्च रोजी दुपारी सादर केला. या आर्थिक वर्षात स्व उत्पन्नासह केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून अनेक प्रकल्प मार्गी लागणार असल्याचा विश्वास आयुक्त डांगे यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्य व लेखा वित्त अधिकारी सचिन धस, उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंढे, सहायक आयुक्त निखील फराटे, सपना वसावा, प्रियंका शिंदे, नगरसचिव मेहेर लहारे, शहर अभियंता मनोज पारखे, जल अभियंता परिमल निकम, लेखा विभागाचे अनिल लोंढे तसेच इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रु. ३६५.१० लक्ष व जमा १६७६३१.७८ लक्ष अशी मिळून एकत्रित जमा १६७९९६.८८ लक्ष आणि खर्च रु. १६७६५०.८१ व शिल्लक रु. ३४६.०७ लक्ष असे महापालिकेचे सन २०२५-२०२६ चे मुळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आले.
खर्च बाजूस वेतन, भत्ते व मानधनावर १७० कोटी ६४ लाख, पेन्शन ५४ कोटी, पाणी पुरवठा विज बिल ४० कोटी, स्ट्रीट लाईट विज बिल ८ कोटी, शिक्षण विभाग वेतन हिस्सा व इतर खर्च हिस्सा ६ कोटी, महिला व बाल कल्याण योजना ३ कोटी २५ लाख, अपंग पुनर्वसन योजना ३ कोटी २५ लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना ८ कोटी ४१ लाख, औषधे व उपकरणे १ कोटी ७० लाख, कचरा संकलन व वाहतूक १८ कोटी, पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती १ कोटी, टँकरद्वारे पाणी पुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी २ कोटी ७५ लाख, अशुध्द पाणी आकार ४ कोटी, विविध वाहने खरेदी ३ कोटी, नविन रस्ते ३०० कोटी, रस्ते दुरुस्ती ३ कोटी,
इमारत दुरुस्ती ५५ लाख, शहरातील ओढ नाले साफसफाई ५५ लाख, आपत्कालीन व्यवस्थापन ५० लाख, कोडवाड्यावरील खर्च १२ लाख, वृक्षारोपण तदनुषंगिक खर्च १ कोटी, हिवताप प्रतिबंधक योजना ६० लाख, कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी १ कोटी १६ लाख, मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त ९५ लाख, मालमत्ता सर्वेक्षण १० कोटी, मृत जनावरे विल्हेवाट प्रकल्प ३५ लाख, पुतळे बसविणे २ कोटी, भविष्य निर्वाह निधी तूट २ कोटी ५० लाख, बेवारस प्रेत विल्हेवाट ४० लाख, उद्यान दुरुस्ती २५ लाख यासह इतर बाबींबर खर्च अपेक्षीत आहे.
महापालिका अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न रु. ४५२ कोटी ०३ लाख, भांडवली जमा रु. ११५९ कोटी ०५ लाख अंदाजित आहे. महसुली उत्पन्नात संकलीत करापोटी रु. १०३ कोटी ८० लाख, संकलीत करावर आधारीत करापोटी ५८ कोटी ७० लाख, जी एस टी अनुदान १४० कोटी ६७ लाख व इतर महसुली अनुदान रु. १८ कोटी, गाळा भाडे ३ कोटी ८२ लाख, पाणीपट्टी ३० कोटी लाख, मिटरद्वारे पाणी पुरवठापोटी १० कोटी, संकीर्णे ३० कोटी इ. महत्वाच्या बाबी आहेत. तसेच विविध शासकीय निधी मोठ्या प्रमाणत मिळणार असल्याने शहर विकासासाठी त्याचा मोठा हातभार लागणार आहे.
महत्वाच्या भांडवली कामांवर होणारा खर्च पुढील प्रमाणे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा – २० कोटी, मुलभूत सुविधा विकास निधी – ७० कोटी, पर्यटनासाठी पायाभूत सुविधा – १५ कोटी, अमृत शहर पाणी पुरवठा फेज २ – १२ कोटी, नाट्य संकुल – १० कोटी, रस्ता अनुदानातून रस्ते -३ कोटी, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान – १०० कोटी, नगरोत्थान जिल्हास्तर – ३४ कोटी, नाविन्यपूर्ण योजना – ४ कोटी, नागरी घनकचरा व्यवस्थापन – १० कोटी ८३ लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना -१० कोटी, ई बस – १२ कोटी, संविधन भवन – १५ कोटी, जिल्हा ग्रंथालय इमारत बांधणे – १५ कोटी, दलितेतर वस्ती सुधारणा – २४ कोटी, सर्वांसाठी घरे – ३० कोटी, अमृत योजना- भुयारी गटर योजना – ३७ कोटी ५० लाख, अमृत योजना- मलनिःसारण केंद्र उभारणे – २१ कोटी २५ लाख, अमृत/नगरोत्थान राज्यस्तर पाणी पुरवठा योजना – १०० कोटी, २ मेगावॅट सौर उर्जा निर्मीती प्रकल्प – १०० कोटी, खासदार निधी – ५ कोटी, आमदार निधी – १६ कोटी. असा खर्च अपेक्षित आहे.
नगर शहर वासीयांच्या सेवेसाठी आपण आयुक्त तथा प्रशासक म्हणून २४ तास ७ दिवस उपलब्ध असून या शहराचा केवळ विकास न करता शहरवासियांचे आरोग्य चांगले राहावे, शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा आपला मानस आहे. या प्रक्रियेत सर्व शहरवासियांनी सहकार्य करावे असे आवाहन शेवटी आयुक्त डांगे यांनी केले आहे.
वकिलाच्या घरातून दागिने चोरणार्या नातेवाईक महिलेला पकडले
चोरलेले ५७ तोळे ९ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत, सोने विकत घेणारा सराफही अटकेत
नगर – घरातील लग्न समारंभा करिता लाँकर मध्ये ठेवलेले दागिने घरी आणून कपाटात ठेवलेले असताना अज्ञात चोरट्याने ६४ तोळे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा ऐवज लग्न समारंभाच्या गडबडीत नजर चुकवून चोरून नेला. ही घटना सावेडी परिसरातील रेणावीकर शाळेच्या मागे उदय हाऊसिंग सोसायटी येथे ८ ते ९ मार्च दरम्यान
घडली. दरम्यान सोमवारी (दि.१०) गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी २४ तासांत एका महिलेला पकडून चोरीचे दागिने हस्तगत केले आहेत. तसेच काही दागिने विकत घेणार्या सराफालाही अटक करण्यात आली आहे. याबाबत ड. निखिल बबन वाकळे (वय ३४, रा. उदय हौसिंग सोसायटी, रेणावीकर शाळेच्या मागे, अ.नगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की त्यांचा लहान भाऊ मनोहर याचे ७ मार्च रोजी लग्न असल्याने त्यांनी लग्न समारंभाकरिता लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने घरी आणले. लग्नाच्या दिवशी घरातील लोकांनी सर्व दागिने अंगावर घातले होते. दिवसभर अंगावर दागिने ठेवून रात्री आठ वाजल्याच्या सुमारास अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने घरातील कपाटामध्ये ठेवले होते. त्यानंतर ते सोन्याचे व चांदीचे दागिने चोरीला गेले होते.
या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी अॅड. निखिल वाकळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द
घरफोडीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलिस उप निरीक्षक अमोल गायधनी हे करीत आहेत. गुन्हा दाखल होताच पो.नि. आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरु केला आणि २४ तासांच्या आत हा गुन्हा
उघडकीस आणला आहे. सदर चोरी ही लग्न समारंभासाठी आलेल्या नातेवाईक महिलेने केल्याचे उघड झाले. पोलिसांनी
तिला पकडून तिने घराजवळील पडया जागेत खड्डा करून पुरून ठेवलेले ५७ तोळे ९ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले. तसेच काही सोने हे एका सोनाराला विकल्याचे त्या महिलेने सांगितले असून पोलिसांनी त्या सोनारालाही ताब्यात घेतले आहे.
सदर कारवाई पो.नि. आनंद कोकरे, स.पो.नि.उज्ज्वल राजपूत, उप निरीक्षक अमोल गायधनी, पोलिस अंमलदार दत्तात्रय जपे, सुनिल चव्हाण, वसीम पठाण, बाळासाहेब भापसे, सतीश भवर, सतीश त्रिभुवन, सुजय हिवाळे यांच्या पथकाने केली.
सलग दुसर्या दिवशीही गावठी हातभट्ट्यांवर छापे
नगर – नगर तालुयातील साकत खुर्द आणि खंडाळा शिवारातील गावठी हातभट्ट्यांवर छापे मारून २ महिलांसह चौघांवर
कारवाई केल्या नंतर सलग दुसर्या दिवशीही साकत, वाळुंज, नेप्ती शिवारात ६ ठिकाणी कारवाई करत सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट करण्यात आला आहे.
या प्रकरणी २ महिलांसह ६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या सह पोलिस उपनिरीक्षक भारत धुमाळ, सहाय्यक फौजदार गांगर्डे, पो.हे.कॉ.सोनटक्के, दाते, खरमाळे, पो. कॉ. विक्रांत भालसिंग संभाजी बोराडे यांच्या पथकाने १२ मार्च रोजी पहाटे पासून
कारवाईला सुरुवात केली. साकत येथील सोमनाथ नारायण पवार, वाळुंज येथील श्रीरंग पांडुरंग गव्हाणे, नेप्ती येथील गणेश टिल्लू पवार, कानिफनाथ भिमाजी कळमकर तसेच २ महिलांच्या घराशेजारी असलेल्या दारू भट्ट्या उध्वस्त करत १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे २५०० लिटर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन तसेच १४ हजार रुपये किमतीची १४० लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू नष्ट करण्यात आली. या ६ आरोपींवर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
करण्यात आले.
शासनाची जागा राहण्यासाठी मिळवून देण्याच्या मागणीसाठी भूमिहीन बेघरांचा नगर जिल्हा परिषदेवर कार्यालयावर ‘मोर्चा’
नगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुयात व गावात बेघर आदिवासी भिल्ल समाजाचा सर्वे करून ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागा आहे. त्यातून भूमिहीन आदिवासी भिल्ल समाजच्या कुटुंबीयांना ग्रामपंचात हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाची जागा राहण्यासाठी मिळवून द्यावी तसेच जागा नावावर नसल्याने आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबीयांना घरकुलाचा लाभ देखील घेता येत नसल्याने एक घारापुती जागा नावावर करून देउन घरकुलाचा
लाभ देण्याच्या मागणीसाठी एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड, महाराष्ट्र संघटिका वैजयंता
गोलवाड व नाशिक सभापती शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद कार्यालयावर बेघर आदिवासी भिल्ल समाजाचा मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. विजय दळे, चंद्रभान फुलपगारे, बाबासाहेब फुलपगारे, बाबासाहेब दळे, शहर टाकली बबन गडाख, अण्णा पवार, राजू आहेर, गोपीनाथ माळी, चंद्रकला माळी, नवनाथ पवार, दामू ठाकरे, भागवत मोरे, दुर्योधन पवार, सोमनाथ पवार, बाबासाहेब निकम, सचिन निकम,
मनोहर निकम, काळू गोलवड, सखाराम गोलवड, कानिफनाथ बडे, बाळू थोरात, राहुल बडे, सुनील
मोठे, रावसाहेब माळी, लक्ष्मी माळी आदीसह नगर, शेवगाव, दहिगाव, बेरसडे, आने, निमगाव, नेप्ती,
निंबोडी, कर्जत, मिरजगाव, श्रीगोंदा, तरडगव्हाण, सांगवी, शहर टाकळी, अंतरवाली, ढोर जळगाव,
करवंडी आदीसह नागरिक उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी भिल्ल समाजाचे अनेक कुटुंबीय असून हे ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणची जागा नावावर नसून ती महाराष्ट्र शासनाची आहे. व गावामध्ये
शेत जमीन अथवा घर बांधण्यासाठी जागा नावावर नाही तसेच या लोकांची अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्याने
जागा विकत घेता येत नाही व त्यांच्याकडे कोणतेही साधन नसल्याने अनेक वेळा उपाशी राहावे लागते त्यामुळे इकडे
तिकडे भटकंती करावी लागत असून या कुटुंबीयांना घरकुलाचा देखील लाभ भेटत नाही. त्यामूळे जागा नावावर करून
देण्यासाठी जीआर काढण्यात यावा व देशाचा आदिवासी देशाचा मालक असून त्यांना जागा राहण्यापूर्ती देण्यात यावी
अशी मागणी करण्यात आली असून आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबीयांचे सर्वे करून जागा अथवा गावातील
महाराष्ट्र शासनाची जागा नावावर करण्यात यावी व घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर आंदोलन करते यांना आश्वासन दिले की, लवकर लवकर प्रश्न मार्गी लावून न्याय मिळवून देणारा असल्याचे सांगितले.
नेप्ती ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी एकनाथ जपकर
नगर – नगर तालुयातील नेप्ती ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी एकनाथ आसाराम जपकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याची माहिती पिठासन अधिकारी सरपंच सविता संजय जपकर यांनी दिली. यावेळी ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळून फटाके फोडून आनंद व्यक्त केला असल्याची माहिती रामदास फुले यांनी दिली.
उपसरपंच पदाची निवड ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. माजी उपसरपंच अनिता दादू चौगुले यांनी
उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे हे पद रिक्त राहिले. या पदासाठी निवड प्रकिया पार पडली. एकनाथ जपकर यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने हि निवड बिनविरोध झाली. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने सरपंच संजय जपकर व रामदास फुले यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच एकनाथ जपकर यांचा सत्कार करण्यात आला. उपसरपंच पदाची संधी सर्वांना मिळावी म्हणून प्रत्येक वर्षी हि निवड केली जाते.
यावेळी माजी सरपंच विठ्ठल जपकर, सरपंच सविता संजय जपकर, माजी उपसरपंच संजय आसाराम जपकर, रामदास फुले, ग्रामविकास अधिकारी लालभाई शेख, माजी उपसरपंच आनिता चौगुले, सोनाली जपकर, विमल होळकर, फारुक सय्यद, संभाजी गडाख, संजय अशोक जपकर, बंडू जपकर, दादू चौगुले, बाबासाहेब होळकर, कृषी उत्पन्न बाजार
समितीचे माजी संचालक वसंत पवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवाजी होळकर, माजी सरपंच सुधाकर कदम, नंदू
जाधव, जालिंदर शिंदे, सोसायटी अध्यक्ष विलास जपकर, मल्हारी कांडेकर, राजेंद्र जपकर, अंबादास जपकर, अशोक जपकर, राजाराम जपकर, भाऊसाहेब होळकर, उमर सय्यद, बाबू होळकर, सुरेश कदम, सादिक पवार, मच्छिंद्र
होळकर, ज्ञानेश्वर जपकर, दिपक गायकवाड, कारभारी जपकर, देवा होले, माजी सरपंच दिलीप होळकर, सोमनाथ
जपकर, अतुल जपकर, निखिल जपकर, देवराम जपकर, राजेंद्र जपकर, भैरवनाथ जपकर, जमीर सय्यद,जावेद सय्यद, नितीन कदम, शिवाजी गाडेकर, राजू गाडेकर, भास्कर जपकर, बाबासाहेब जपकर, मच्छिंद्र जपकर, सहादू जपकर, केशव जपकर, दादाभाऊ जपकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौरे, राजेंद्र होळकर, दत्ता कदम, लक्ष्मण कांडेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी मोठा विश्वास ठेवून मला उपसरपंच केले आहे. त्यामुळे मी जनतेच्या विश्वासाला थोडाही तडा जाऊ देणार नाही. गावच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करीन. उपसरपंच पदाच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना गोरगरिबापर्यंत पोहचविन असे प्रतिपादन नवनिर्वाचित उपसरपंच एकनाथ
जपकर यांनी केले.
स्नेहसंमेलनामधून बालचमुचे बालअविष्कार विकसित होतात
भाऊसाहेब कबाडी यांचे प्रतिपादन; आदर्शनगर मनपा शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
नगर – मनपा शाळामधून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात माझी स्वतःची शाळा अशा छोट्या-मोठ्या उपक्रमांमधून आज आयएसओ ९००० मानांकन प्राप्त झाली आहे. छोट्या-मोठ्या उपक्रमांनी मुलांची शैक्षणिक जिज्ञासा वाढीस लागते. यामधून ते काही ना काही घेत आपला बौद्धिक विकास साधत असतात अशी नवनवीन संकल्पना राबवीत असताना शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील सुप्तगुण हेरून त्याला योग्य मार्गदर्शन करत दिशा दिली पाहिजे. यामुळे त्याची
शाळेप्रती गोडी वाढत जाऊन शाळेत शिक्षण घेण्यासाठी त्याला अधिक गोडवा वाटेल आज मनपाच्या शाळा दर्जेदार शिक्षण देत आहेत. स्नेहसंमेलन सारख्या कार्यक्रमांमधून बालचमूमधील अविष्कार अधिक विकसित होतात, असे प्रतिपादन ओंकारनगर मनपा शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी केले. दूथसागर येथील मनपा शाळेच्या स्नेहसंमेलन व गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात
सरस्वती पुजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी मनपा शिक्षण विभाग अहिल्यानगरचे प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, नगरसेवक मनोज कोतकर, जहागीरदार, शा. व्य. समिती अध्यक्ष सोनाली चव्हाण, भिंगार हायस्कूलच्या सौ. निलिमा पेंटा, मनपा शाळांचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, शशिकांत वाघुलकर, विजय घिगे, अरुण पवार, मुख्याध्यापिका सुवर्णा लांडगे, छाया गोरे, शिक्षक युवराज मोरे, संदीप राजळे, अमोल बोठे, अभय ठाणगे, मगर सर, वृषाली गावडे, अंगणवाडीच्या रेणूका लोंढे तसेच परिसरातील ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेली विविध देशभक्तीपर नृत्य, स्वागत गीत, बालगीते, लावणी, स्फूर्ती गीते सादर करत आपल्यात असलेल्या कलागुणांचे सादरीकरण करून बालचमुंनी उपस्थितांची मने जिंकली. नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की मनपा शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे सर्वसामान्यांची मुले मनपा शाळा मधून आज शिक्षण घेत
आहेत यासाठी मनपाच्या शाळेमधील शिक्षकांची अपार मेहनत व येणार्या विद्यार्थ्यांना
शिक्षकांकडून करण्यात येणारे गुणवत्तापूर्वक ज्ञानदान हीच या शाळेच्या यशाची गुरुकिल्ली
असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शाळेला येणार्या काळात काही अडचण आल्यास
जातीने लक्ष घालून ती सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली मेकल
यांनी शाळेच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन मनपा शाळा
क्रमांक २ चे मुख्याध्यापक शशिकांत वाघूलकर यांनी केले तसेच आभार
प्रदर्शन युवराज मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक,
व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व परिसरातील ग्रामस्थांनी प्रयत्न केले.
पद्मशाली स्नेहिता संघमतर्फे महिला पोलिसांचा सत्कार
पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने महिला पोलीस कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला.
नगर – पद्मशाली स्नेहिता संघम तर्फे महिल दिन निर्मित तोफखाना पोलिस स्टेशन अहिल्यानगर येथील सर्व महिला पोलिसांचा सत्काराचे नियोजन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्षा डॉ. रत्ना बल्लाळ यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांचा गुलब पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आल. याप्रसंगी पो.निरिक्षक आनंद कोकरे यांचे सहाय्य झाले. महिला पो. निरिक्षक संपदा तांबे, महिला पो सहाय्यक निरिक्षक पूनम श्रीवास्तव, म. पो. सहनिरिक्षक
कल्पना चौहान, पो. डे.कॉन्स्टे संजीवनी नेटके, पो.कॉन्स्टे. माढेकर, काळाने, संध्या म्हस्के, ललिता कोल्हे, रेखा क्षिरसागर, बाचा गायकवाड, उषर मोहारे, मीना गहिले, राधिका वाघ, बोडखे गंगा आदि महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. रत्ना बल्लाळ म्हणाले की, प्रत्येक स्त्रीची भूमिका महत्त्वाची असते आणि त्यातील अंतिम भूमिका म्हणजे आई. तिचे त्याग असंख्य आहेत जे ती आपल्या मुलाला आनंदी पाहण्यासाठी करते आणि ज्याची परतफेड आपण कधीही करू शकत नाही कारण ते अमूल्य आहे. आपल्या आयुष्यात एक स्त्री आपल्यासाठी जे काही करते ते नेहमीच अमूल्य असते. आज आपला कुटुंब सांभाळत महिला पोलीस दलातही उत्कृष्टरित्या काम करून आपले कर्तव्य पार पाडत असून आज महिला दिनी अशा कर्तुत्वान महिलांचा सन्मान होणे तितकेच महत्त्वाचे असल्याने पद्मशाली स्नेहिता संघम च्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला.
संघमच्या सौ.रेखा वड्डेपेल्ली, सचिवा सपना छिंदम, सविता येनगंदूल, सीमा अंकाराम, रोहिणी पागा, सरू रच्चा, विजया गुंडू, आरती छिंदम, पूनम वन्नम, पूजा म्याना, सुवर्णा पुलगम, रेखा गुरुड, नीता बुरा, सविता एक्कलदेवी, भारती मुत्याल, कल्पना बुलबुले, सुनिता जक्का, हेमा चिप्पा, कांचन कुंटला आदी उपस्थित होत्या.
भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या १३ विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी ‘मासूम’ची शिष्यवृत्ती
पेमराज सारडा ज्युनिअर कॉलेजच्या चेअरमनपदी डॉ. पारस कोठारी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार
नगर – रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना रोजगार-स्वयंरोजगार निर्माण होण्यासाठी व शिक्षणाबरोबरच कौशल्य आत्मसात करण्याच्या उद्देशाने मुंबई येथील मासूम संस्थेच्या वतीने भाई सथ्था नाईट हायस्कूल मधील १३ विद्यार्थ्यांना व्यावसायिक
शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण घेता येणार आहे.
महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमाप्रसंगी रात्र शाळेचे मावळते चेअरमन डॉ. पारस कोठारी, नूतन चेअरमन प्रा. ज्योतीताई कुलकर्णी, स्त्री रोग तज्ञ डॉ. अर्चना नागरे, रात्रशाळेचे प्राचार्य सुनिल सुसरे आदींसह रात्र शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
मासूम संस्थेच्या वतीने अॅडव्हान्स फॅशन डिझायनिंगसाठी रेश्मा पठाण, स्वाती सोनवणे, शारदा मंगलपेल्ली, भाग्यश्री नायडू, रूपाली बिल्ला, निकिता चव्हाण यांना मासूम संस्थेकडून प्रत्येकी ४८ हजार रुपये, संगणक प्रशिक्षणासाठी वैष्णवी जोशी, रेखा वाघ, भावना गर्गे, शितल पन्हाळे या विद्यार्थिनींना प्रत्येकी ७ हजार रुपये तसेच अॅडव्हान्स फोटोग्राफी व संगणक प्रशिक्षणासाठी निशांत शेलार, अभिषेक भागडे विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळाली आहे. शिष्यवृत्ती प्राप्त करणार्यांमध्ये महिलांची संख्या अधिक असून, महिला दिनी त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
डॉ. पारस कोठारी म्हणाले की, सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून, महिलांनी भरारी घेण्यासाठी उच्च शिक्षित होवून व्यावसायिक शिक्षण देखील आत्मसात करावे. रात्र शाळेत शिक्षक तळमळीने गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत असून, कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेत असल्याचे सांगितले. रात्र शाळेत कार्य करताना जीवनात आनखी कार्य करण्याची उमेद मिळाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. अर्चना नागरे यांनी महिलांचे स्वास्थ्य व दैनंदिन जीवन या विषयावर मार्गदर्शन
करताना महिलांनी आरोग्याची काळजी घेऊन शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. महिला निरोगी असल्यास संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले ठेऊ शकते. शारीरिक स्वास्थ्य आपल्या हातात असून, योग्य आहार, व्यायामाचे त्यांनी महत्त्व सांगितले.
डॉ. पारस कोठारी यांची पेमराज सारडा ज्युनिअर कॉलेजच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तर नूतन चेअरमन प्रा. ज्योतीताई कुलकर्णी यांचे स्वागत करण्यात आले. महिला दिनानिमित्त महिला शिक्षिका उज्वला साठे, वैशाली दुराफे, वृषाली साताळकर, स्वाती होले, अनुराधा दरेकर यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी युनूस शहा, ज्योती गायकवाड, कविता मरकड, स्नेहल गीते यांनी मनोगत व्यक्त केले.
वृषाली साताळकर यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश भुते यांनी आभार मानले. मासूम संस्थेच्या संचालिका श्रीमती निकिता केतकर, डायरेटर युवराज बोर्हाडे, कमलाकर माने, करिअर सेल प्रमुख स्नेहल ठाकूर, सीनियर समुपदेशक गजाला शेख यांनी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर, मानद सचिव संजय जोशी, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, अजित बोरा, मा.कार्याध्यक्ष अनंत फडणीस व सर्व संचालकांनी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मनपाचे माजी स्थायी समिती
सभापती गणेश कवडे यांनी रात्र शाळेस डसबिन उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.














