नगर – नगर तालुयातील साकत खुर्द आणि खंडाळा शिवारातील गावठी हातभट्ट्यांवर छापे मारून २ महिलांसह चौघांवर
कारवाई केल्या नंतर सलग दुसर्या दिवशीही साकत, वाळुंज, नेप्ती शिवारात ६ ठिकाणी कारवाई करत सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट करण्यात आला आहे.
या प्रकरणी २ महिलांसह ६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या सह पोलिस उपनिरीक्षक भारत धुमाळ, सहाय्यक फौजदार गांगर्डे, पो.हे.कॉ.सोनटक्के, दाते, खरमाळे, पो. कॉ. विक्रांत भालसिंग संभाजी बोराडे यांच्या पथकाने १२ मार्च रोजी पहाटे पासून
कारवाईला सुरुवात केली. साकत येथील सोमनाथ नारायण पवार, वाळुंज येथील श्रीरंग पांडुरंग गव्हाणे, नेप्ती येथील गणेश टिल्लू पवार, कानिफनाथ भिमाजी कळमकर तसेच २ महिलांच्या घराशेजारी असलेल्या दारू भट्ट्या उध्वस्त करत १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे २५०० लिटर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन तसेच १४ हजार रुपये किमतीची १४० लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू नष्ट करण्यात आली. या ६ आरोपींवर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
करण्यात आले.