भाऊसाहेब कबाडी यांचे प्रतिपादन; आदर्शनगर मनपा शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
नगर – मनपा शाळामधून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात माझी स्वतःची शाळा अशा छोट्या-मोठ्या उपक्रमांमधून आज आयएसओ ९००० मानांकन प्राप्त झाली आहे. छोट्या-मोठ्या उपक्रमांनी मुलांची शैक्षणिक जिज्ञासा वाढीस लागते. यामधून ते काही ना काही घेत आपला बौद्धिक विकास साधत असतात अशी नवनवीन संकल्पना राबवीत असताना शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील सुप्तगुण हेरून त्याला योग्य मार्गदर्शन करत दिशा दिली पाहिजे. यामुळे त्याची
शाळेप्रती गोडी वाढत जाऊन शाळेत शिक्षण घेण्यासाठी त्याला अधिक गोडवा वाटेल आज मनपाच्या शाळा दर्जेदार शिक्षण देत आहेत. स्नेहसंमेलन सारख्या कार्यक्रमांमधून बालचमूमधील अविष्कार अधिक विकसित होतात, असे प्रतिपादन ओंकारनगर मनपा शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी केले. दूथसागर येथील मनपा शाळेच्या स्नेहसंमेलन व गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात
सरस्वती पुजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी मनपा शिक्षण विभाग अहिल्यानगरचे प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, नगरसेवक मनोज कोतकर, जहागीरदार, शा. व्य. समिती अध्यक्ष सोनाली चव्हाण, भिंगार हायस्कूलच्या सौ. निलिमा पेंटा, मनपा शाळांचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, शशिकांत वाघुलकर, विजय घिगे, अरुण पवार, मुख्याध्यापिका सुवर्णा लांडगे, छाया गोरे, शिक्षक युवराज मोरे, संदीप राजळे, अमोल बोठे, अभय ठाणगे, मगर सर, वृषाली गावडे, अंगणवाडीच्या रेणूका लोंढे तसेच परिसरातील ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेली विविध देशभक्तीपर नृत्य, स्वागत गीत, बालगीते, लावणी, स्फूर्ती गीते सादर करत आपल्यात असलेल्या कलागुणांचे सादरीकरण करून बालचमुंनी उपस्थितांची मने जिंकली. नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की मनपा शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे सर्वसामान्यांची मुले मनपा शाळा मधून आज शिक्षण घेत
आहेत यासाठी मनपाच्या शाळेमधील शिक्षकांची अपार मेहनत व येणार्या विद्यार्थ्यांना
शिक्षकांकडून करण्यात येणारे गुणवत्तापूर्वक ज्ञानदान हीच या शाळेच्या यशाची गुरुकिल्ली
असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शाळेला येणार्या काळात काही अडचण आल्यास
जातीने लक्ष घालून ती सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली मेकल
यांनी शाळेच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन मनपा शाळा
क्रमांक २ चे मुख्याध्यापक शशिकांत वाघूलकर यांनी केले तसेच आभार
प्रदर्शन युवराज मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक,
व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व परिसरातील ग्रामस्थांनी प्रयत्न केले.