भरदिवसा बुरूडगाव रोडवर घरफोडी करणारे दोघे चोरटे पुणे येथून जेरबंद

नगर – बुरुडगाव रोडवरील नक्षत्र लॉन जवळ भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील वडगाव ब्रुदुक (ता.हवेली) येथे जेरबंद केले आहे. त्यांच्या कडून चोरीतील ८६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या बाबतची माहिती अशी की, २८ मार्च रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान राजकुम ारी आयोध्या शर्मा, रा.साई  आनंद अपार्टमेंट, बुरुडगाव रोड) यांचे राहते घराचे कुलूप
अज्ञात चोरटयांनी तोडून घरातील सोने चांदीचे दागीने, दोन मोबाईल व रोख रक्कम चोरुन नेली होती. याबाबत
कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिनेश आहेर यांना दिले होते. त्यानुसार पो.नि. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार, संतोष लोढे, गणेश लोंढे, फुरकान शेख, अमृत आढाव, प्रशांत राठोड, सारीका दरेकर व महादेव भांड यांचे पथक नियुक्त करून
तपास सुरु केला.

आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना, त्यांना हा गुन्हा रवि रामकुमार
सोलंकी, (रा.खुर्जा बुलंद शहर, उत्तरप्रदेश) याने त्याचे साथीदारासह केला.असून ते सध्या साई अपार्टमेंट, घुलेनगर, वडगाव बुद्रुक, ता.हवेली, जि.पुणे येथे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरुन पथकाने घुलेनगर, वडगाव बुद्रुक, ता.हवेली, जि.पुणे येथे जाऊन संशयीत आरोपींचा शोध घेऊन रवि सोलंकी व दुष्यंत धिरेस यादव (वय २३, रा. बरसामई, जि.हाथरस, उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी नक्षत्र
लॉन्स शेजारी दिवसा घरफोडी केल्याची माहिती दिली. त्यांच्याकडे गुन्हयातील मुद्देमालाबाबत विचारपूस केली
असता रवि सोलंकी याने गुन्हयात चोरी केलेले दोन मोबाईल व एक घडयाळ हे त्याची पत्नी हिस ठेवण्यासाठी
दिले व गुन्हयातील सोने हे श्री.सिध्दनाथ ज्वेलर्स, वडगाव बुद्रुक यांना दिले असल्याची माहिती दिली. पथकाने
स्नेहा रमेश सिंह यांच्या कडील दोन मोबाईल व एक घडयाळ व वडगाव बुद्रुक, येथील सोनाराकडून ७७ हजार ४०० रूपये
किंमतीची ८.६०० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड असा एकुण ८६ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस ठाण्यात मुद्देमालासह हजर करण्यात आले.

रसिक ग्रुपच्या उपक्रमांमुळे अहिल्यानगरची वेगळी ओळख निर्माण झाली

नगर – सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम अहिल्यानगरमध्ये
झालेच पाहिजे. यासाठीचा जयंत येलुलकरांचा पुढाकार कौतुकास्पद
आहे. यामुळे आपले नगर शहर पुढे जात सामाजिक बांधलकी जपली
जात आहे. असामान्य काम करणार्‍यांना रसिक गौरव पुरस्कार
दिल्याने त्यांच्या कार्याला अधिक प्रेरणा व प्रोत्साहन मिळणार आहे.
रसिक ग्रुपच्या उपक्रमांमुळे अहिल्यानगरची वेगळी ओळख निर्माण
झाली आहे. अशा जयंत येलुलकरांमागे सर्वांनी उभे राहावे, असे
प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले.
नुकत्याच गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या रसिकोत्सव सोहळ्यात
विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते रसिक ग्रुपच्या
वतीने देण्यात येणारे विविध पुरस्कारांचे समारंभपूर्वक वितरण
झाले. यंदा पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानचे
खजिनदार महेश सूर्यवंशी यांना धार्मिक, शैक्षणिक व आरोग्य
क्षेत्रातील योगदानाबद्दल स्व.प्रदीप गांधी स्मृती गौरव पुरस्काराने
सन्मानित करण्यात आले.
आ.संग्राम जगताप यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध
करत शहरात मोठ्याप्रमाणात सुरु झालेल्या कामांमुळे शहराच्या
विकासात मोलाची भर घातल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव पुरस्काराने
सन्मान करण्यात आला.
अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी
महत्त्वपूर्ण निर्णय घेत शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी दिलेल्या
योगदानाबद्दल व शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राला चालना देत
रखडलेल्या नाट्य संकुलच्या कामास गती दिल्याबद्दल त्यांचाही
विशेष गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यावेळी राजाभाऊ कोठारी, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, क्रेडाईचे
आशिष पोखरणा, अनिल पोखरणा, अश्विन गांधी, पेमराज बोथरा,
डॉ.प्रकाश कांकरिया, सुनील मुनोत, शशीकांत गुळवे, विजय इंगळे
उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप म्हणाले, जयंत येलुलकर निस्वार्थी भावनेन
उपक्रम राबवून अहिल्यानगरचा ऐतिहासिक वारसा व संस्कृती जपत
आहे. रसिक ग्रुपच्या या उपक्रमांमुळे शहरात नवे चैतन्य आले आहे.
आपापल्या क्षेत्रात काम करत सामाजिक क्षेत्रातही योगदान देणार्‍यांचे
कौतुक पुरस्काराच्या रूपाने रसिक ग्रुपने केले आहे. या पुरस्कारांनी
माझ्यासह सर्वाना सामाजिक कामासाठी प्रोत्साहन मिळणार आहे
या कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व व्याख्याते
प्रा.मिलिंद जोशी यांचा साहित्य चळवळ वृद्धिंगत करत केलेल्या
उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना गौरव पुरस्कार देण्यात आला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर
यांनी आपले कर्तव्य बजावत अनेक गुन्ह्यांचा शोध लावत गुन्हेगारांवर
वचक ठेवत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी
केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना गौरव पुरस्कार देण्यात आला.
उत्कृष्ट कल्पना शक्तीने मंडप सजावट करणारे गणेश भूतारे
यांचाही गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
सावेडीच्या जॉगिंग पार्क मधील झाडांची निगा राखत तेथील
सौदर्य वाढवून पर्यावरण क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणारे जीवन
खरात यांचाही सुप्रभात ग्रुपच्या वतीने सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविकात जयंत येलूलकर म्हणाले, आपले नगर शहर
सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जावे यासाठी गेल्या २२ वर्षांपासून
ग्रुप हा सांस्कृतिक वारसा जपत काम करत आहे. या कामात
अनेकांची साथ मिळत आहे. नगरमध्ये अनेक हिरे आहेत जे आपल्या
कार्यकर्तृत्ववाने नगरचे नावलौकिक वाढवत आहेत. अशांचा गौरव
करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी रसिक गौरव पुरस्कार देत
आहोत. या वर्षीच्या पुरस्कार्थींनी आपापल्या क्षेत्रात भरोव योगदान
देत अहिल्यानगरचे नाव उंचावले आहे. या पुरस्कार वितरण समारंभांचे
नियोजन ग्रुपचे तेजा पाठक, सुदर्शन कुलकर्णी, निखिल डफळ, समीर
पाठक, प्रशांत अंतापेलू, श्रीकृष्ण बारटक्के, स्नेहल उपाध्ये, प्रसन्न एखे,
बाळकृष्ण गोटीपामुल, तुषार बुगे, मीनाक्षी पाटील, शारदा होशिंग,
ऋषिकेश येलुलकर, ओंकार अंतापेलु आदींनी केले.

नगरच्या वाडिया पार्क येथे २३ एप्रिल ते ४ मे दरम्यान भगवान महावीर कप नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पधा

नगर – आदर्श व्यापारी मित्र मंडळ व मॉर्निंग क्रिकेट लबतर्फे वाडिया पार्क येथे २३ एप्रिल ते ४ मे दरम्यान भगवान महावीर कप २०२५ टेनिस बॉल क्रिकेट, धावणे, बॅडमिंटन आणि रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त फॉर्मचे
अनावरण सी.ए मोहन बरमेचा, गिरीश अग्रवाल आणि चेतन बोगावत यांच्या हस्ते करण्यात
आले. यावेळी आदर्श व्यापारी मित्र मंडळाचे संस्थापक माजी नगरसेवक संजय
चोपडा, अध्यक्ष राजेंद्र तातेड, राजेंद्र गांधी, अजय गुगळे, डॉ. सचिन बोरा,
अमित पितळे, लक्ष्मीकांत शेटिया, प्रीतम गुंदेचा, उमेश मंत्री, आनंद पितळे,
वर्धमान मुनोत, राहुल शिंदे, सुयोग लुणिया, मयूर पितळे, सी.ए आनंद गांधी,
प्रीतम पोखरणा, आनंद कटारिया, रुपेश कटारिया, रुपेश भंडारी, सचिन
कटारिया, रितेश बोरा, अतुल शेटीया, आनंद नाहाटा, प्रफुल्ल मुथा, विकास
सुराणा, प्रवीण शिंगवी, अजय कांबळे आदि उपस्थित होते.
सी.ए मोहन बरमेचा म्हणाले की, वाडिया पार्क येथे फ्लड लाईटच्या
प्रकाशात भगवान महावीर क्रिकेट कपचा थरार नगरकरांना पाहण्यासारखा
असतो. यावेळी समाजातील नागरिक उपस्थित राहत खेळाडूंना प्रोत्साहन
देण्याचे काम केले जाते. वाडिया पार्कमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण
निर्माण होत असते. तसेच खेळाच्या माध्यमातून एकोपा निर्माण होत असतो.
भगवान महावीर कप स्पर्धा ही नगरकरांसाठी एक पर्वणी असते असे ते
म्हणाले.
गिरीश अग्रवाल म्हणाले की, धका-धकीच्या जीवनामध्ये मनुष्य आपल्या
आरोग्याकडे अक्षरशः दुर्लक्ष करत असतात. मात्र भगवान महावीर कप स्पर्धे
च्या माध्यमातून युवकांमध्ये खेळाची गोडी निर्माण होत असून व्यायामाकडे
आकर्षित केले जाते. त्यामुळे आपले आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत
होते असे ते म्हणाले.
चेतन बोगावत म्हणाले की, आदर्श व्यापारी मित्र मंडळ व मॉर्निंग क्रिकेट
लबचे युवक एकत्रित येत शहरात भगवान महावीर कप स्पर्धेच्या माध्यमातून
खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले जाते. या माध्यमातून खेळाडू
आपल्या खेळाचे प्रदर्शन करत असतात असे ते म्हणाले.
वाडिया पार्क येथे भगवान महावीर कप उत्साहात होत असतो. यावर्षी
क्रिकेट स्पर्धेबरोबरच ४०० मीटर धावणे, बॅडमिंटन व रस्सीखेच स्पर्धेचे
आयोजन केले आहे. क्रिकेट खेळता येत नसणार्‍यांना इतर स्पर्धेमध्ये भाग
घेता येणार आहे. आय.पी.ए.ल च्या धर्तीवर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले
जात असून, १८ संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये सुमारे ४०० खेळाडू
खेळणार आहेत. या स्पर्धेमध्ये भगवान महावीर कप हे मानाचे पारितोषिक
असून १ लाख ११ हजार १११ रुपये तसेच दुसरे पारितोषिक ५१ हजार
रुपये तिसरे पारितोषिक ३१ हजार रुपये दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक
मॅचला (मॅन ऑफ द मॅच) (बेस्ट बॉलर) (बेस्ट फिल्डर) (बेस्ट बॅट्समन)
आदी पुरस्काराने खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे. तसेच (मॅन ऑफ
द सिरीज) चा देखील पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती मंडळाचे
अध्यक्ष राजेंद्र तातेड यांनी दिली.

अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण व मंडप उभारणीचा शुभारंभ

नगर – जगतगुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळा १५ एप्रिल ते २३ या कालावधीत नगर तालुयातील अकोळनेर येथे आयोजित करण्यात
आलेला आहे. या सोहळ्याचे ध्वजारोह व मंडप उभारणीचा शुभारंभ ३१ मार्च रोजी सायंकाळी डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, ह.भ.प माऊली महाराज कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

अकोळनेर (ता. अहिल्यानगर) येथे १५ एप्रिल ते ३ एप्रिल दरम्यान येथे जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्याचे आयोजन सरपंच प्रतिक शेळके व ग्रामस्थांनी केले आहे. हा सोहळा श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, आष्टी या तालुयांच्या सहभागातून पार पडत आहे. या सोहळ्यात ५ हजार गाथा वाचक, ५०० टाळकरी, २५ मृदंग वादक, ५०० गावांचा तुकाराम महाराज अखंड पहारा, एक लक्ष भाविकास पुरणपोळी महाप्रसाद, १०८  युवकांच्या हस्तेच श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र अकोळनेर ज्ञानज्योत आगमन, आठ दिवस जगद्गुरु तुकोबाराय भव्य कृषी प्रदर्शन, श्री बालयोगी भगवान महाराज संगमेश्वर देवस्थान बीड अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास हरिभक्त परायण श्रीनिवास महाराज, हरिभक्त परायण बंडातात्या कराडकर, हरिभक्त परायण महादेव महाराज राऊत, हरिभक्त परायण महंत भास्करगिरी महाराज, हरिभक्त परायण कान्होबा महाराज देहूकर, हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर, हरिभक्त परायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर, हरिभक्त परायण जयंत महाराज बोधले, हरिभक्त परायण महाराज ज्ञानेश्वर माऊली कदम या महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असलेल्या या सोहळ्याचे स्वागताध्यक्षडॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते आहेत. तसेच या कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री अण्णा हजारे व पद्मश्री पोपटराव पवार उपस्थित राहणार आहेत. सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही यावेळी करण्यात आले असल्याचे ज्ञानेश्वर माऊली कदम, सरपंच
प्रतिक शेळके यांनी सांगितले.

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे आरोग्य जपले जात

उद्योजक किरण रांका यांचे प्रतिपादन; दुबिर्णीद्वारे शस्त्रक्रिया तपासणी शिबीर : महिनाभरात ४४४४ रुग्णांची तपासणी

नगर – आनंदऋषीजी हॉस्पिटलध्ये रुग्णांची मानसिकता समजावून घेऊन त्यांच्या आजाराने योग्य ते निदान करून उपचार
केले जातात. रूग्णाचे आरोग्य जपले जाते, असा विश्वास रांका ज्वेलर्सचे किरण रांका यांनी व्यक्त केला.

राष्ट्रसंत आचार्यश्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित ‘दुबिर्णीव्दारे शस्त्रक्रिया’ या
मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. तेव्हा ते बोलत होते. यावेळी सुर्यकांत रांका,
नारंगीबाई शिंगवी, सौ.अनिताताई रांका, सौ.प्रीतम रांका, तज्ञ डॉ. लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.भास्कर जाधव, डॉ.आर.एन.पांडे, डॉ.राहुल कांडेकर, डॉ.रविंद्र मुथा, डॉ. हिरल चौधरी, संतोष बोथरा, सतिष लोढा, माणकचंद
कटारिया, अनिल मेहेर आदि उपस्थित होते. डॉ.आशिष भंडारी यांनी स्वागत केले.

उद्योजक किरण रांका पुढे म्हणाले, जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्ते, हॉस्पीटलमधील तज्ज्ञ डॉटर्स, नर्सेस, कर्मचारी या सर्वांचेच आपलेपणाचे सहकार्य रूग्णाला भावते. या शिबिर आयोजनात आमच्या रांका परिवाराला खारीचा वाटा मिळतो, हे आमचे भाग्यच आहे. यापुढेही शिबिराच्या आयोजनात सहभाग देत राहू, अशी ग्वाही देतो.
प्रास्तविक करताना संतोष बोथरा म्हणाले, रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य हॉस्पीटलच्या माध्यमातून सुरु आहे. आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या आशीर्वादाने आणि प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजी म.सा. यांच्या मार्गदर्शनाने वैद्यकीय सेवा सुरू आहे. अत्यल्प दरात अद्ययावत मशिनरी व सुविधांसह येथील सेवा दानशूर व्यक्तींच्या योगदानामुळे दिली जात आहे. मागील एक महिन्यापासून सुरु असलेल्या या शिबीरामध्ये ४४४४ रुग्णांची तपासणी करण्यात येऊन आवश्यक त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. समाजसेवेचे हे व्रत असेच पुढेही चालू राहिल. यावेळी तज्ञ डॉ.आर.एन.पांडे
म्हणाले, रुग्णांची सेवा आमच्या हातातून घडत आहे, हे आमचे भाग्य आहे. हॉस्पिटलमध्ये अनेक शिबीरे आयोजित करण्यात येतात. या शिबीरात चांगली सेवा  दिली जात असल्याने असंख्य रुग्ण येतात या हॉस्पिटलचा नावलौकीक संपुर्ण जगात आहे. आम्ही डॉटर्स सुद्धा रुग्णांना चांगले मार्गदर्शन करतो. त्यामुळे रुग्णांना एक विश्वास मिळातो. तो संपुर्ण बरा होतो, असे सांगून शिबीरातील शस्त्रक्रियांची त्यांनी माहिती दिली. शिबीरात दुबिर्णीव्दारे शस्त्रक्रिया (बिनाटाका) – लॅप्रोस्कोपी पोटावरील जागेचे, बेंबीचे ऑपरेशन व जांघेतील हार्नियाची शस्त्रक्रिया, पित्ताशय काढणे, स्त्रीयांची गर्भाशयाची पिशवी काढणे (हिस्ट्रोटॉमी), स्टॅपलर, लेझर पाईल्स शस्त्रक्रिया, अ‍ॅपेडिस ऑपरेशन, लॅप्रोस्कोपी स्त्रीयांचे बिजांडपोशावरील गाठी शस्त्रक्रिया, स्त्रीयांचे वंध्यत्वाची तपासणी करीता गर्भनलिकेची ट्युबल पेटेन्सी, लॅप्रोस्पोपी स्त्रीयांचे कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया तपासणी करुन मार्गदर्शन करण्यात आले. या मोफत तपासणी शिबीरात १२७ जणांची तपासणी केली. सुत्रसंचालन अनिल मेहेर यांनी केले. सतिष लोढा यांनी आभार मानले.

नेप्तीत ईद मिलन कार्यक्रमातून हिंदू-मुस्लिम ऐयाचे दर्शन

आ. काशीनाथ दाते यांनी घेतला शीरखुर्माचा आस्वाद; गावाच्या विकासासाठी धार्मिक ऐय महत्त्वाचे

नगर – नेप्ती (ता. नगर) येथे मुस्लिम समाजाची रमजान ईद
(ईद-उल-फित्र) उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील
मुस्लिम बांधवांच्यावतीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले होते. या कार्यक्रमात सर्व हिंदू समाजबांधवांनी सहभागी
होवून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या ईद मिलन
कार्यक्रमास आ. काशीनाथ दाते यांनी देखील भेट देऊन ईदच्या
शुभेच्छा दिल्या.
सकाळी शाही मस्जिदच्या मैदानावर मुस्लिम बांधवांनी रमजान
ईदची सामुदायिक नमाज अदा केली. मौलाना मुनीर सय्यद यांच्या
मार्गदर्शनाखाली नमाज पठण करून देशामध्ये शांतता, सुख, समृद्धी
व धार्मिक एकात्मतेसाठी प्रार्थना करण्यात आली. संध्याकाळी
गावात ईद मिलनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन धार्मिक
एकात्मतेचे दर्शन घडविले. यावेळी सर्व समाजातील बांधवांनी
शीरखुर्माचा आस्वाद घेतला. रविवारी झालेला गुढी पाडवा व
सोमवारी झालेल्या ईदचा उत्साह गावात दिसून आला. उपस्थितांनी
एकमेकांना भेटून ईदच्या व पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
आ. काशीनाथ दाते म्हणाले की, गावा-गावातील धार्मिक
एकात्मता भारतीय संस्कृतीने जोडली गेलेली आहे. सर्व हिंदू- मुस्लिम
बांधव रमजान ईद असो किंवा दिवाळी एकमेकांच्या सण-उत्सवात
सहभागी होत असतात. गावाच्या विकासासाठी धार्मिक ऐय महत्त्वाचे
आहे. नेप्तीत ईद मिलनच्या कार्यक्रमातून धार्मिक एकात्मतेचा संदेश
दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उद्योजक दिलीप दाते, बापूसाहेब सोनवणे, माजी
उपसरपंच फारुख सय्यद, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण
होळकर, माजी सरपंच दिलीप होळकर, दादू चौगुले, रामदास
फुले, प्रा. एकनाथ होले, अंबादास पुंड, अशोक जपकर, मुनीर
सय्यद, गुलाब सय्यद, जमीर सय्यद, जावेद सय्यद, सलीम सय्यद,
बाबूलाल सय्यद, आयुब सय्यद, वाजिद सय्यद, उमर सय्यद,
सिकंदर शेख, नौशाद शेख, आसिफ सय्यद, हुसेन सय्यद, मुक्तार
सय्यद, रमीज सय्यद, परवेज सय्यद, अरबाज सय्यद, नवेद सय्यद,
इम्रान सय्यद, रफिक सय्यद, संतोष चहाळ, सोन्याबापू कानडे,
रऊफ सय्यद, समीर सय्यद, युनूस सय्यद, वसिम सय्यद, कय्यूम
सय्यद आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाले
हैदर यंग पार्टी व दोस्ती तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम
घेतले.

 

बोल फाऊंडेशन व संतजॉन युवक रक्तदात्यांचा सहभाग

नगर – ३० मार्च रोजी ब्रेड ऑफ लाईफ बोल
फाऊंडेशन व संत जॉन युवक संघटना यांच्या संयुक्त
विद्यमाने आणि जनकल्याण रक्तकेंद्र नगर यांच्या
सौजन्याने ५१ रक्तदात्यांनी रक्तदान शिबीरामध्ये
सहभाग दर्शविला. उपवास काळ हा मनपरिवर्तनाचा,
सकारात्मक, सामाजिक व सत्कार्यांचा पवित्र काळाचे
औचित्य राखुन समाजातील गरजू व गंभीर आजारांनी
त्रस्त रुग्णांना या शिबीराद्वारे जीवन विस्तारीत
करण्याचा सामाजिक उपक्रम आयोजित केला गेला.
संत जॉन चर्च भिंगारचे प्रमुख धर्मगुरु फादर
विश्वास परेरा (डॉन बॉस्का) यांच्या हस्ते दिपप्रज्वलन
करुन व प्रार्थनेने रक्तदानाच्या शिबीराचे उद्घाटन
करण्यात आले. या प्रसंगी फादर विश्वास परेरा यांनी
परमेश्वराने मानवी जीवनामध्ये दिलेल्या रक्ताचा
उपयोग रक्तदानाने करुन गरजवंत रुग्णांना जीवनदान
द्यावे हा संदेश या प्रसंगी दिला. या प्रसंगी फादर
रिचर्ड डिसीलव्हा डॉन बॉस्को, सावेडी यांनी आपली
उपस्थिती दर्शवुन देवाने माणसाला दिलेल्या भरपूर रक्तदानाद्वारे मानवाने मानवासाठी जीवनदान द्यावे
हा पवित्र हेतु संबोधीत केला. फादर ब्लेझ फर्नांडिस यांनी या प्रसंगी रुग्णांसाठी विशेष प्रार्थना करुन
रक्तदात्यांनी रक्तदानात सहभाग द्यावा म्हणून आवाहन केले.
या प्रसंगी बोल फाऊंडेशनचे संचालक अमित
पाटोळे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन
प्रभावीपणे केले. या रक्तदानाच्या शिबीराचा केंद्रबिंदू
हा मानवधर्म आहे व तो आपण सर्वांनी जपला पाहिजे
असे सचिव सौ. शोभा पाटोळे यांनी प्रतिपादन
केले. जनकल्याण रक्तकेंद्राचे डॉ. मढीकर व डॉ.
झेंडे त्याचप्रमाणे जनसंपर्क अधिकारी सोनाली
खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबीर
यशस्वीरीत्या पार पडले. सर्व जातीधर्माती युवकांनी
रक्तदान शिबीरात भाग घेतला होता.
५१ रक्तदात्यांनी आपल्या स्वयंस्फूर्तीने व
उत्सफूर्तपणे नांवनोंदणी केली, त्यापैकी ३६ रक्तदाते
रक्तदान करण्यास पात्र ठरले. यावेळी सर्व रक्तदात्यांना
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व श्रीफळ देऊ गौरविण्यात
आले.
फाऊंडेशनचे चेअरमन जोसेफ पाटोळे, सचिव
शोभा पाटोळे, संचालक अमित पाटोळे व स्वयंसेवक
नीतीन पाटोळे, आरती नीतीन पाटोळे, अ‍ॅड. पिंटू पाटोळे, काजल पिंटू पाटोळे, अनिकेत पाटोळे,
आदित्य पाटोळे, अंतोन पाटोळे, रुबेन मुदलियार यांचे सहकार्य लाभले. या प्रसंगी संत जॉन युवक
संघटनेतर्फे कुमारी सेरेना अनिल के. बी. हिने मनोगत व्यक्त केले.

सावेडी प्रभाग क्रमांक सहा भाजपाचा बालेकिल्ला

नगर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनानुसार
अहिल्यानगर शहरात बुथ कमिटी गठण करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक ६ भाजपाचा महत्त्वाचा मानला जातो. या प्रभागाने ४ नगरसेवक निवडून देऊन शहराला महापौर पद मिळवून दिले आहे. बुथ कमिट्या पूर्ण करण्यासाठी
रवींद्र बारस्कर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेविका वंदनाताई ताठे, नगरसेविका पल्लवीताई जाधव यांनी चांगले
काम केले आहे. सावेडी गावात व परिसरात भाजपचे वर्चस्व आहे. तसेच तरुणांचा मोठा सहभाग बुथ कमिट्यामध्ये झालेला दिसत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बुथ कमिटीचे लाभार्थी प्रमुख महत्त्वाची भूमिका बजावतील. तसेच प्रभाग क्रमांक सहा मधील बुथ कमिटी एक आदर्श निर्माण करेल. येणार्‍या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल. प्रभाग क्रमांक सहा भाजपाचा बालेकिल्ला आहे, असे प्रतिपादन प्रभाग क्रमांक ६ चे निरीक्षक तथा प्रदेश सदस्य वसंत लोढा यांनी केले आहे.

सावेडीगाव येथे रवींद्र बारस्कर यांच्या निवासस्थानी बूथ कमिटीची बैठक निरीक्षक बाळासाहेब भुजबळ (ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत वसंत लोढा हे होते. या बैठकीत  बुथ क्रमांक ७४च्या अध्यक्ष थंगवेल स्वामी- सूचक गणेश विखे, सरचिटणीस राजेश टाके, बूथ क्रमांक ७६चे अध्यक्ष रवींद्र बारस्करय्सूचक अवधूत बारस्कर, सरचिटणीस राम बारस्कर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच मन की बात प्रमुख,
लाभार्थी प्रमुख, बुथ अध्यक्ष यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. या नेमणुका निरीक्षक वसंत लोढा, बाळासाहेब भुजबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या आहेत. यावेळी रवींद्र बारस्कर, श्रीकांत कुलकर्णी, प्रकाश गोसावी, सुरेश चव्हाण, आदित्य करपे, गिरीश वाकळे, राम बारस्कर, अवधूत बारस्कर, जयदीप बारस्कर, गणेश विखे, कृष्णा गडाख, अभिषेक ढोले, आदित्य पाटील, कार्तिक मिश्रा, जितेश मनकानी, अभिषेक करपे आदी उपस्थित होते. बाळासाहेब भुजबळ
म्हणाले, अहिल्यानगर शहरात भाजपमय वातावरण झालेले आहे. या बुथ कमिटीच्या माध्यमातून व्हाट्सअप प्रमुख, मन की
बात प्रमुख, लाभार्थी प्रमुख तसेच बुथ कमिटी अध्यक्ष या नेमणूक होत आहेत. पार्टीने बुथ कमिटीला विशेष महत्त्व दिले
आहे. १८ वर्षावरील मतदारांची नाव नोंदणीचे काम या कमिटीच्या वतीने करण्यात येणार आहे.
या प्रभागामध्ये रवींद्र बारस्कर, बाबासाहेब वाकळे, वंदनाताई ताठे, पल्लवीताई जाधव यांनी कमिट्या पूर्ण करण्यासाठी चांगले काम केले आहे.

रवींद्र बारसकर म्हणाले, वसंत लोढा व बाळासाहेब भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली व युवकांच्या उपस्थितीत
कमिटी करण्यात आली. प्रभाग क्रमांक ६ मध्ये महापौर पद लाभल्याने बाबासाहेब वाकळे यांच्या माध्यमातून प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहेत. या प्रभागातील तयार झालेल्या बुथ कमिट्या सक्षमपणे काम करून पक्षाला मजबूत करतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक ६ मध्ये बुथ कमिटीची तिसरी बैठक झाली. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. अवधूत बारस्कर यांनी आभार मानले.

स्वच्छता कर्मचार्‍यांनी सेवानिवृत्तीनंतर आपल्या आरोग्याकडे लक्ष द्याव

नगर – महापालिकेचा सफाई कर्मचारी हा समाजातील एक
महत्वाचा घटक असून आपण सकाळी घराबाहेर पडतो तेव्हा संपूर्ण
शहराची स्वच्छता झालेली असते, त्यामुळे नगरकरांचे आरोग्य सदृढ,
निरोगी राहत असते महापालिकेचा स्वच्छता अभियानामध्ये नंबर येत
असून त्याचे श्रेय स्वच्छता कर्मचार्‍यांनाच जाते, स्वच्छता कर्मचार्‍यांनी
३०-३५ वर्ष नगरकरांचे आरोग्य जपले, आता सेवानिवृत्तीनंतर
आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, मनपा कर्मचारी अजय सौदे त्यांची
सफाई कर्मचारी बद्दल असलेली आपुलकी आणि ऋणानुबंध त्यामुळेच
सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम केला, आपण
अनेक वर्ष एकत्रित काम करत असतो आपल्या सुखदुःखामध्ये सामील
होत असतो सेवानिवृत्ती हा सण मनुष्याच्या जीवनातील आठवणीचा
दिवस असतो त्या दिवशी त्यांचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे
प्रतिपादन मनपा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी
केले.
अहिल्यानगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १२ मधील सफाई
कर्मचार्‍यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार सोहळा झाला. यावेळी
बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, सचिव आनंद वायकर, नंदकुमार नेमाने, बलराज
गायकवाड, बाळासाहेब व्यापारी, सोमनाथ सोनवणे, भरत सारवान, भांगरे, चांदणे, तावरे,
ऋषिकेश वाल्मीक, अनिल वाणे, अजय सोदे, सतीश खुडे, कृष्णालाल बेगी, पृथ्वीराज
तांबोळी, सचिन लोखंडे, शुभम चांदणे, दीपक अडागळे, शाहू वाघमारे, शुभम साठे आदी
उपस्थित होते
प्रभाग क्रमांक १२ मधील स्वच्छता कर्मचारी सेवानिवृत्त असून
कर्मचार्‍यांच्या वतीने सत्कार केला जातो ही बाब कौतुकास्पद आहे,
काम करत असताना एकमेकांमध्ये प्रेम आपुलकी भावना असते,
सेवानिवृत्तीमुळे दररोज भेटणारा कर्मचारी आता भेटणार नाही,
एकमेकांमधील संवाद कमी होईल, सुखदुःखाच्या गोष्टी होणार नाही,
मी देखील सफाई कर्मचारी म्हणून पालिकेत काम केले आहे आणि
प्रभाग अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालो आहे, सफाई कर्मचारी यांचा
सेवानिवृत्ती निमित्त सन्मान होणे गरजेचे असल्याचे मत जितेंद्र सारसर
यांनी व्यक्त केले
मनपा प्रभाग क्रमांक १२ मधील इंदू खुडे, विजया वैराळ, सविता
साठे, संदीप सारवान, सुरेश साठे, विद्या चव्हाण, ललिता दिवटे,
कन्हैया चावरे आदी सफाई कर्मचारी सेवानिवृत्त होत असून आम्ही
सर्वांनी एकत्रित काम केले आहे. दररोजच्या साफसफाई बरोबरच
सांगितलेले वाढीव काम देखील हे कर्मचारी करत असत कधीही
कामाचा कंटाळा केला नाही. अनेक वर्ष आम्ही सर्वांनी एकत्रित काम
केले असून त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळा झाला असल्याचे मत अजय सौदे यांनी
व्यक्त केले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित नगरमधील बालनाट्य प्रशिक्षण शिबीराचा उत्साहात समारोप

नगर – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने
आयोजित करण्यात आलेले बालनाट्य प्रशिक्षण शिबीर १७ ते २६ मार्च या १०
दिवसांच्या कालावधीत सावेडी
उपनगरातील माऊली सभागृहाच्या
बेसमेंट हॉल येथे झाले. २७ मार्च
रोजी शिबिराचा समारोप करण्यात
आला. शिबिरात सहभागी झालेल्या
बालशिबिरार्थींना घेऊन माऊली
सभागृहाच्या रंगमंचावर विविध
कला प्रकारांचे बाल शिबिरार्थींनी
सादरीकरण केले. यामध्ये छत्रपती
शिवाजी महाराजांच्या जीवनावर
आधारित ’एक रात्र गडावर’ या
बालनाट्यातील चार प्रवेश सादर
करण्यात आले. यामध्ये माँ
जिजाऊ, छोटे शिवबा, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे या
भूमिकांना बालकलाकारांनी न्याय देत उत्तम भूमिका साकारत उपस्थितांची दाद
मिळवली. शिबिरातील सर्वात छोटा विद्यार्थी ध्वज विराज मुनोत याने ’लोहगड’
या गडावर आधारित कथानक सादर केले. राजश्री भणगे हिने नाट्यछटा
सादर केली. ३५ बाल शिबिरार्थींनी सादर केलेले ’फुलपाखरू’ हे बालनाट्य
उपस्थितांच्या दाद मिळविण्यास पात्र ठरले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे मध्यवर्तीचे नियामक मंडळ सदस्य
क्षितिज झावरे, नाट्यकर्मी अविनाश कराळे, बालरंगभूमी परिषदेचे सचिव प्रसाद
भणगे, श्रिया देशमुख, शिबीर संचालक अनंत जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन
करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी क्षितिज झावरे आणि यांनी मनोगतातून शासनाच्या या उपक्रमाचे
कौतुक करत शिबिरार्थींना या शिबिराचा आपल्या दैनंदिन जीवनात मोठा फायदा
होणार असल्याचे प्रतिपादन केले.
शिबीर संचालक अनंत
जोशी यांनी प्रास्ताविकातून बाल
शिबिरार्थींवर केलेल्या संस्काराचे
महत्व विशद केले. समन्वयक
सागर मेहेत्रे यांनी सूत्रसंचालन
केले तर जालिंदर शिंदे यांनी
आभार मानले.
या शिबिरात अहिल्यानगर
येथील नाट्यकर्मी गणेश लिमकर,
आबा सैंदाणे, शैलेश देशमुख,
श्याम शिंदे, धनंजय सरदेशपांडे,
वैशाली पाटील गोस्वामी, नाना
मोरे, तेजस अतितकर, अनंत जोशी यांनी विविध विषयांवर संस्काराचे धडे
दिले. या उपक्रमासाठीची संकल्पना सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान
मंत्री आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण
चवरे यांची होती.