महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित नगरमधील बालनाट्य प्रशिक्षण शिबीराचा उत्साहात समारोप

0
92

नगर – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने
आयोजित करण्यात आलेले बालनाट्य प्रशिक्षण शिबीर १७ ते २६ मार्च या १०
दिवसांच्या कालावधीत सावेडी
उपनगरातील माऊली सभागृहाच्या
बेसमेंट हॉल येथे झाले. २७ मार्च
रोजी शिबिराचा समारोप करण्यात
आला. शिबिरात सहभागी झालेल्या
बालशिबिरार्थींना घेऊन माऊली
सभागृहाच्या रंगमंचावर विविध
कला प्रकारांचे बाल शिबिरार्थींनी
सादरीकरण केले. यामध्ये छत्रपती
शिवाजी महाराजांच्या जीवनावर
आधारित ’एक रात्र गडावर’ या
बालनाट्यातील चार प्रवेश सादर
करण्यात आले. यामध्ये माँ
जिजाऊ, छोटे शिवबा, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे या
भूमिकांना बालकलाकारांनी न्याय देत उत्तम भूमिका साकारत उपस्थितांची दाद
मिळवली. शिबिरातील सर्वात छोटा विद्यार्थी ध्वज विराज मुनोत याने ’लोहगड’
या गडावर आधारित कथानक सादर केले. राजश्री भणगे हिने नाट्यछटा
सादर केली. ३५ बाल शिबिरार्थींनी सादर केलेले ’फुलपाखरू’ हे बालनाट्य
उपस्थितांच्या दाद मिळविण्यास पात्र ठरले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे मध्यवर्तीचे नियामक मंडळ सदस्य
क्षितिज झावरे, नाट्यकर्मी अविनाश कराळे, बालरंगभूमी परिषदेचे सचिव प्रसाद
भणगे, श्रिया देशमुख, शिबीर संचालक अनंत जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन
करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी क्षितिज झावरे आणि यांनी मनोगतातून शासनाच्या या उपक्रमाचे
कौतुक करत शिबिरार्थींना या शिबिराचा आपल्या दैनंदिन जीवनात मोठा फायदा
होणार असल्याचे प्रतिपादन केले.
शिबीर संचालक अनंत
जोशी यांनी प्रास्ताविकातून बाल
शिबिरार्थींवर केलेल्या संस्काराचे
महत्व विशद केले. समन्वयक
सागर मेहेत्रे यांनी सूत्रसंचालन
केले तर जालिंदर शिंदे यांनी
आभार मानले.
या शिबिरात अहिल्यानगर
येथील नाट्यकर्मी गणेश लिमकर,
आबा सैंदाणे, शैलेश देशमुख,
श्याम शिंदे, धनंजय सरदेशपांडे,
वैशाली पाटील गोस्वामी, नाना
मोरे, तेजस अतितकर, अनंत जोशी यांनी विविध विषयांवर संस्काराचे धडे
दिले. या उपक्रमासाठीची संकल्पना सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान
मंत्री आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण
चवरे यांची होती.