नगरच्या वाडिया पार्क येथे २३ एप्रिल ते ४ मे दरम्यान भगवान महावीर कप नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पधा

0
58

नगर – आदर्श व्यापारी मित्र मंडळ व मॉर्निंग क्रिकेट लबतर्फे वाडिया पार्क येथे २३ एप्रिल ते ४ मे दरम्यान भगवान महावीर कप २०२५ टेनिस बॉल क्रिकेट, धावणे, बॅडमिंटन आणि रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त फॉर्मचे
अनावरण सी.ए मोहन बरमेचा, गिरीश अग्रवाल आणि चेतन बोगावत यांच्या हस्ते करण्यात
आले. यावेळी आदर्श व्यापारी मित्र मंडळाचे संस्थापक माजी नगरसेवक संजय
चोपडा, अध्यक्ष राजेंद्र तातेड, राजेंद्र गांधी, अजय गुगळे, डॉ. सचिन बोरा,
अमित पितळे, लक्ष्मीकांत शेटिया, प्रीतम गुंदेचा, उमेश मंत्री, आनंद पितळे,
वर्धमान मुनोत, राहुल शिंदे, सुयोग लुणिया, मयूर पितळे, सी.ए आनंद गांधी,
प्रीतम पोखरणा, आनंद कटारिया, रुपेश कटारिया, रुपेश भंडारी, सचिन
कटारिया, रितेश बोरा, अतुल शेटीया, आनंद नाहाटा, प्रफुल्ल मुथा, विकास
सुराणा, प्रवीण शिंगवी, अजय कांबळे आदि उपस्थित होते.
सी.ए मोहन बरमेचा म्हणाले की, वाडिया पार्क येथे फ्लड लाईटच्या
प्रकाशात भगवान महावीर क्रिकेट कपचा थरार नगरकरांना पाहण्यासारखा
असतो. यावेळी समाजातील नागरिक उपस्थित राहत खेळाडूंना प्रोत्साहन
देण्याचे काम केले जाते. वाडिया पार्कमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण
निर्माण होत असते. तसेच खेळाच्या माध्यमातून एकोपा निर्माण होत असतो.
भगवान महावीर कप स्पर्धा ही नगरकरांसाठी एक पर्वणी असते असे ते
म्हणाले.
गिरीश अग्रवाल म्हणाले की, धका-धकीच्या जीवनामध्ये मनुष्य आपल्या
आरोग्याकडे अक्षरशः दुर्लक्ष करत असतात. मात्र भगवान महावीर कप स्पर्धे
च्या माध्यमातून युवकांमध्ये खेळाची गोडी निर्माण होत असून व्यायामाकडे
आकर्षित केले जाते. त्यामुळे आपले आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत
होते असे ते म्हणाले.
चेतन बोगावत म्हणाले की, आदर्श व्यापारी मित्र मंडळ व मॉर्निंग क्रिकेट
लबचे युवक एकत्रित येत शहरात भगवान महावीर कप स्पर्धेच्या माध्यमातून
खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले जाते. या माध्यमातून खेळाडू
आपल्या खेळाचे प्रदर्शन करत असतात असे ते म्हणाले.
वाडिया पार्क येथे भगवान महावीर कप उत्साहात होत असतो. यावर्षी
क्रिकेट स्पर्धेबरोबरच ४०० मीटर धावणे, बॅडमिंटन व रस्सीखेच स्पर्धेचे
आयोजन केले आहे. क्रिकेट खेळता येत नसणार्‍यांना इतर स्पर्धेमध्ये भाग
घेता येणार आहे. आय.पी.ए.ल च्या धर्तीवर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले
जात असून, १८ संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये सुमारे ४०० खेळाडू
खेळणार आहेत. या स्पर्धेमध्ये भगवान महावीर कप हे मानाचे पारितोषिक
असून १ लाख ११ हजार १११ रुपये तसेच दुसरे पारितोषिक ५१ हजार
रुपये तिसरे पारितोषिक ३१ हजार रुपये दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक
मॅचला (मॅन ऑफ द मॅच) (बेस्ट बॉलर) (बेस्ट फिल्डर) (बेस्ट बॅट्समन)
आदी पुरस्काराने खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे. तसेच (मॅन ऑफ
द सिरीज) चा देखील पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती मंडळाचे
अध्यक्ष राजेंद्र तातेड यांनी दिली.