भरदिवसा बुरूडगाव रोडवर घरफोडी करणारे दोघे चोरटे पुणे येथून जेरबंद

0
133

नगर – बुरुडगाव रोडवरील नक्षत्र लॉन जवळ भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील वडगाव ब्रुदुक (ता.हवेली) येथे जेरबंद केले आहे. त्यांच्या कडून चोरीतील ८६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या बाबतची माहिती अशी की, २८ मार्च रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान राजकुम ारी आयोध्या शर्मा, रा.साई  आनंद अपार्टमेंट, बुरुडगाव रोड) यांचे राहते घराचे कुलूप
अज्ञात चोरटयांनी तोडून घरातील सोने चांदीचे दागीने, दोन मोबाईल व रोख रक्कम चोरुन नेली होती. याबाबत
कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिनेश आहेर यांना दिले होते. त्यानुसार पो.नि. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार, संतोष लोढे, गणेश लोंढे, फुरकान शेख, अमृत आढाव, प्रशांत राठोड, सारीका दरेकर व महादेव भांड यांचे पथक नियुक्त करून
तपास सुरु केला.

आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना, त्यांना हा गुन्हा रवि रामकुमार
सोलंकी, (रा.खुर्जा बुलंद शहर, उत्तरप्रदेश) याने त्याचे साथीदारासह केला.असून ते सध्या साई अपार्टमेंट, घुलेनगर, वडगाव बुद्रुक, ता.हवेली, जि.पुणे येथे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरुन पथकाने घुलेनगर, वडगाव बुद्रुक, ता.हवेली, जि.पुणे येथे जाऊन संशयीत आरोपींचा शोध घेऊन रवि सोलंकी व दुष्यंत धिरेस यादव (वय २३, रा. बरसामई, जि.हाथरस, उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी नक्षत्र
लॉन्स शेजारी दिवसा घरफोडी केल्याची माहिती दिली. त्यांच्याकडे गुन्हयातील मुद्देमालाबाबत विचारपूस केली
असता रवि सोलंकी याने गुन्हयात चोरी केलेले दोन मोबाईल व एक घडयाळ हे त्याची पत्नी हिस ठेवण्यासाठी
दिले व गुन्हयातील सोने हे श्री.सिध्दनाथ ज्वेलर्स, वडगाव बुद्रुक यांना दिले असल्याची माहिती दिली. पथकाने
स्नेहा रमेश सिंह यांच्या कडील दोन मोबाईल व एक घडयाळ व वडगाव बुद्रुक, येथील सोनाराकडून ७७ हजार ४०० रूपये
किंमतीची ८.६०० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड असा एकुण ८६ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस ठाण्यात मुद्देमालासह हजर करण्यात आले.