नगररचनासह महापालिकेच्या सर्व विभागाची आयुत यशवंत डांगे यांनी घेतली ‘झाडाझडती’

कर्मचार्‍यांच्या कामकाजाचा घेतला आढावा; बदल्यांबाबत लवकरच निर्णय घेणार; नगररचनातील प्रलंबित फायली तत्काळ निकाली काढण्याचे आदेश

नगर – महानगरपालिकेच्या नगररचना विभागासह इतर विभागात आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी शुक्रवारी अचानक भेट देऊन झाडाझडती घेतली. यावेळी अनेक कर्मचारी जागेवर नसल्याने त्यांना आयुक्तांनी धारेवर धरत
खडेबोल सुनावले. नगररचनासह इतर विभागात अनेक फायली, रेकॉर्ड अस्ताव्यस्त आढळून आले.
यशवंत डांगे यांनी सर्व रेकॉर्ड येत्या आठवडाभरात व्यवस्थित लावण्याच्या, तसेच अनावश्यक व कालबाह्य कागदपत्रे, अर्ज आदी आवश्यकता नसल्यास ते काढून टाकण्याच्या सूचना दिल्या. तसेच, नगररचना विभागातील प्रलंबित फायली तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी प्रभारी अधिकार्‍यांना दिल्या. नगररचना विभागाच्या कामकाजाबाबत व कर्मचार्‍यांची,
अधिकार्‍यांची अनुपस्थिती, फायली, रेकॉर्ड न सापडणे, फायली  प्रलंबित असणे अशा तक्रारी आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे यशवंत डांगे यांनी अचानक विभागात जाऊन तपासणी केली. नगररचना विभागात स्वाती आहिरे यांच्याकडे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार सोपवण्यात आला आहे. ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा आयडी तत्काळ तयार करावा व सहाय्यक संचालक स्नेहल यादव यांच्याकडे प्रलंबित असलेल्या फायली त्यांच्या आयडीवर ट्रान्सफर कराव्यात. सर्व प्रलंबित फायली नियमानुसार मंजूरी देऊन मार्गी लावाव्यात. ज्यात त्रुटी असतील, त्या पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात. येत्या दहा दिवसांत सर्व फायली निकाली निघतील, अशा
प्रकारे नियोजन करावे, असे यशवंत डांगे यांनी सांगितले. तसेच, विभागात असलेल्या सर्व प्रकारच्या फायली, जुने रेकॉर्ड
व्यवस्थित लावावेत. फायली न सापडल्यास संबंधित कर्मचार्‍यावर जबाबदारी निश्चित करून कठोर
कारवाई करण्यात येईल. बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाईन पद्धतीने फायली घेऊन त्याला
नियमानुसार मंजूरी द्यावी. बीपीएमएस प्रणालीत येणार्‍या अडचणींबाबत शासनाच्या संबंधित अधिकार्‍याकडे माहिती देऊन त्या दूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, असेही त्यांनी यावेळी  सांगितले. नगररचना विभागासह इतर
विभागातही यशवंत डांगे यांनी अचानक भेट दिली. कार्यालयीन शिस्त पाळावी, कार्यालयीन वेळेत स्वतःच्या जागेवर थांबून वेळेत कामकाज करावे. हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. विभागातील स्वच्छतेबाबत दक्षता घ्यावी. अस्वच्छता दिसल्यास संबंधित विभाग प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या शनिवारी, रविवारी व सोमवारी महानगरपालिकेचे कामकाज सुरू राहणार आहे. त्यामुळे कर्मचारी,
अधिकार्‍यांनी सुट्टी न घेता वेळेत कार्यालयात उपस्थित रहावे, अशा सूचनाही यशवंत डांगे यांनी दिल्या.

आनंदऋषिजी म.सा. पुण्य स्मृतीदिनानिमित्त आयोजित भगवान महावीर व्याख्यानमालेतील प्रबोधन ठरले प्रभावी

राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री.आनंदऋषिजी
महाराज यांच्या ३३ व्या पुण्य स्मृतीदिन व १२५ व्या
जन्मोत्सवानिमित्त जैन सोशल फेडरेशनने प्रबुध्द
विचारक आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू
केलेली ही भगवान महावीर व्याख्यानमाला गेल्या ३०
वर्षांपासून शहरात वैचारिक प्रबोधन घडवण्याचे मौलिक
कार्य करते आहे.
व्याख्यानमालेचे मुख्य प्रायोजक जयकुंवरबाई
मोतीलाल लोढा यांच्या स्मरणार्थ सौ. मनिषा निखिलेंद्र
लोढा आणि लोढा परिवार हे होते. सौ.मनिषा लोढा,
निखलेंद्र लोढा, सुदर्शन लोढा व सौ. संजना लोढा
यांच्या हस्ते वक्त्यांचे यथोचित सत्कार करण्यात आले.
भगवान महावीर व्याख्यानमाला सुरू झाल्यापासून
वृत्तपत्र प्रसिध्दीची सेवा निष्ठेने करणारे ज्येष्ठ साहित्यिक
पत्रकार मिलिंद चवंडके यांच्या योगदानाचाही गौरव
करण्यात आला. सौ.सरोजताई कटारिया यांचे सुरेख
सूत्रसंचालन व्याख्यानांच्या वैशिष्ट्यांकडे लक्ष वेधणारे
ठरले.
प्रवचनकार प्रा.डॉ.विनोद बाबर (कराड) यांनी
आजच्या व्हॉटसअप, फेसबुक, इन्स्ट्राग्रामच्या जगातील
एकही जण आपल्या अडीअडचणीत – दुःखद प्रसंगात
आपल्या जवळ बसून पाठीवर हात ठेवत आधार देत
नाही की आपण हॉस्पीटलच्या आयसीयूमध्ये उपचार
घेताना आपल्या काळजीने भेटायला येत नाही.
आपल्यासाठी डोळ्यांत पाणी येणारे मोजकेच मित्र आणि
रक्ताचे नातेवाईकच आपले असतात, या वास्तवावर
बोट ठेवले.
युवा वक्ते राहुल गिरी (बीड) यांनी इयत्ता पहिलीय्दुसरीमधील मुले मोबाईल वापरतात ही अभिमानाची
वा कौतुकाची बाब नाही तर मोबाईलमुळे आपली
भावी पिढी विकलांग होणार, हे वास्तव ध्यानी घेऊन
गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन केले.
लोककवी इंद्रजीत भालेराव (परभणी) यांनी
जळगाव जिल्ह्यातील असोदा येथील बहिणाबाई चौधरी
यांनी निरक्षर असूनही केलेल्या कविता जीवनाचे
वास्तव मांडत आत्मचिंतन करायला लावतात. या
आत्मचिंतनातून जीवनातील आनंदाची प्राप्ती निश्चितच
होते, असे सांगितले.
लेखक प्रो.नितीन लाठे (मुंबई) यांनी आपले
आई-वडिलांशी अतुट नाते कायम असले पाहिजे.
त्यांच्याजवळ जाऊन घट्ट मिठी मारता येईल असे
स्नेहबंध आई-वडिलांशी असले पाहिजेत. आजच्या
पिढीने आई-वडिलांसोबतचे कनेशन सुधारण्याची
आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केले.
अतुल शहा (मुंबई) यांनी निसर्गाच्या सान्निध्यात
राहून शुध्द शाकाहार केल्यास कोणताही आजार
आपल्याजवळ फिरकूही शकत नाही, हे ठामपणे आणि
स्वानुभवातून सांगितले. स्वस्थ जीवन आणि रोग
मुक्तिचा संदेश देणार्‍या या व्याख्यानाने श्रोते मंत्रमुग्ध
झाले.
अभिनेत्री आई तुळजाभवानी मालिकेतील
अनुभूतीची भूमिका साकारणार्‍या सौ. गौरी थोरात
(खामगांव) यांनी मुलींनो जीवनातील सुख-शांतीय्समाधान मिळवण्याकरिता स्वतःचे घरदार – गाडी
असलेला मुलगा पहाण्यापेक्षा सात्विकतेचे तेज असलेला
कर्तृत्ववान आणि निर्व्यसनी मुलगा पती म्हणून निवडा,
असे जाहिर आवाहन उपवर युवतींना केले. हे आवाहन
उपवर मुलींना मोलाचे प्रबोधन करणारे ठरले.
शंकर महाराज शेवाळे (पुणे) यांनी तुम्ही-आम्ही
रामराज्य निर्माण करावे म्हणून प्रभू श्रीरामच वाट पहात
आहेत. तीर्थंकरानंतर तीर्थंकर झाले नाहीत. रामदास
स्वामी, ज्ञानेश्वर, तुकोबा, शिवाजी महाराज परत
झाले नाहीत. रामराज्य निर्माण करण्यास प्रभू श्रीराम
परत येणार नाहीत तर त्यांचा आदर्श समोर ठेवून
आपल्यालाच रामराज्य निर्माण करावे लागणार आहे,
असे प्रतिपादन केले.
व्याख्यानमालेचा लाभ शहरासह उपनगरातील
स्त्री-पुरूषांनी घेतला. युवतींची संख्या लक्षणीय होती.
व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी सीमा मुनोत, सपना
कटारीया, सिमरन मुनोत, संतोष गांधी, प्रतिक संचेती
आदींनी परिश्रम घेतले.

अहिल्यानगरमध्ये ३० मार्चला रसिक ग्रुपचा ‘गुढीपाडवा रसिकोत्सव’ सांस्कृतिक सोहळा

दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत नगरकरांना मिळणार मराठी हिंदी गाण्यांची, नृत्य व कॉमेडीची मेजवानी

नगर –
गुढीपाडव्यापासून सुरु होणार्‍या मराठी नव वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी शहरात गेल्या २२ वर्षांपासून
रसिक ग्रुपच्या वतीने ‘गुढीपाडवा रसिकोत्सव’ या  सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन अहिल्यानगरमध्ये केले जात आहे. यावर्षी होणारा मराठी हिंदी गीतांचा ‘रसिकोत्सव’ सोहळा ३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता सावेडीच्या जॉगिंग
पार्कच्या मैदानावर होणार आहे. गायन, नृत्य, लाईव्ह संगीत, चला हवा येऊ द्या कलाकारांचा विनोदी धमाका अशा बहुरंगी मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी नगरकरांना मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून सावेडीच्या जॉगिंग पार्कच्या मैदानावर ३० ते ४० हजार प्रेक्षकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते होणार असून यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आ.संग्राम जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक व ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, विशेष पोलीस महासंचालक दत्तात्रय
कराळे, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह डॉ.
सुजय विखे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, क्रेडाईचे आशिष पोखरणा, अनिल पोखरणा, अश्विन गांधी, श्रीमती छाया
फिरोदिया, आशा फिरोदिया, पेमराज बोथरा, के. के. शेट्टी, राजेश भंडारी, सुनील मुनोत, डॉ.प्रकाश कांकरिया,
डॉ.गोपाल बहुरूपी, शशीकांत गुळवे, माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत, प्रसाद सावंत, विवेक चौधरी
यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ग्रुपच्या वतीने देण्यात येणार्‍या विविध
पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती निखील डफळ यांनी दिली.

यावर्षीच्या रसिकोत्सवाची अधिक माहिती देताना दिपाली देऊतकर म्हणाल्या, यावर्षी होणार्‍या रसिकोत्सव
कार्यक्रमात राज्यात नावाजलेले दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. यामध्ये पार्श्वगायक मंगेश बोरगावकर, युवा
सिंगर चेतन लोखंडे, पार्श्वगायिका अबोली गीर्‍हे, ‘सुर नवा ध्यास नवा’ फेम राधा खुडे, पार्श्वगायिका जुईली
जोगळेकर व पद्मनाथ गायकवाड आदी दिग्गज गायक उपस्थित राहणार आहेत. तसेच नृत्यांगना ‘तुझ्यात
जीव रंगला’ व ‘वहिनी साहेब फेम’ धनश्री काडगावकर आपली नृत्यकला सादर करणार आहे. या बरोबरच
‘चला हवा येऊ द्या’ फेम विनोदी कलाकार कुशल बद्रिके व हेमांगी कवी हे आपल्या विनोदी सादरीकरणातून हास्याचे
कारंजे उडवणार आहेत. असा हा गायन, ठसकेबाज नृत्य व लाईव्ह संगीतचा मिलाफ असलेल्या कार्यक्रमाचे
संगीत संयोजन पुण्याचे नितीन शिंदे यांचे असून निवेदक मिलिंद कुलकर्णी निवेदन करणार आहेत. त्यांना आर.
व्ही. ग्रुप इव्हेंट सहकार्य करत आहेत. सुदर्शन कुलकर्णी म्हणाले, अहिल्यानगरमध्ये गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील सर्वत्र मोठा सांस्कृतिक कार्यक्रम रसिक ग्रुप आयोजित करत आहे. या सोहळ्याने नगरची सांस्कृतिक शहर म्हणून राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. नगरकर वर्षभर या सांस्कृतिक सोहळ्याची वाट पहात असतात. हा कार्यक्रम सायंकाळी
६ वाजता वेळेवर सुरु होणार आहे. सर्व नागरिकांनी या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित रहावे, असे
आवाहन केले. या सोहळ्याची तयारी ग्रुपचे तेजा पाठक, समीर पाठक, प्रसन्न एखे, श्रीकृष्ण बारटक्के, प्रशांत अंतापेल्लू,
ऋषिकेश येलुलकर, शारदा होशिंग, स्नेहल उपाध्ये, मीनाक्षी पाटील, हनीफ शेख, बालकृष्ण गोटीपामुल, कार्तिक नायर,
प्रशांत देशपांडे आदी करत आहेत.

डोंगर-दर्‍यात भटकंती करीत पर्यटकांनी लुटला आनंद

नगर – नगरकरांमध्ये पर्यटनाची संस्कृती रूजविणार्‍या ट्रेककॅम्प संस्थेचा वर्धापनदिन इमामपूर येथील खिरणीचा
महादेव ट्रेकमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांनी निसर्गाशी एकरूप होत पर्यटनाचा आनंद लुटला.
नागरिकांना पर्यटनाची आवड निर्माण व्हावी यासाठी १३ वर्षांपूर्वी विशाल लाहोटी यांनी ट्रेककॅम्प या संस्थेची
स्थापना केली. मात्र, सुरुवातीला पर्यटनाबाबत फारशी उत्सुकता नसल्याने ट्रेकला अल्प प्रतिसाद मिळत असे. त्यानंतर लाहोटी यांनी ट्रेकॅम्पच्या माध्यमातून ‘साद गर्भगिरीला’ हा उपक्रम सुरू केला. त्यास मात्र अबालवृद्धांचा भरभरून प्रतिसाद
मिळत आहे.

वर्धापनदिनानिमित्त रविवारी भल्या पहाटे निसग्रप्रेमी छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेल महाराजाजवळ जमले. तेथे सर्वांना सूचना देण्यात आल्या. त्यानंतर सर्वजण दुचाकी, चारचाकीवर नगर तालुयातील इमामपूर गावातून डोंगराच्या
कुशीत वसलेल्या खिरणीच्या महादेव मंदिराजवळ पोहोचले. तेथे सर्वांनी एकत्रितपणे व्यायाम केला. नंतर स्वयंसेवकांच्या
मार्गदर्शनाखाली डोंगरात भटकंती करण्याचा आनंद लुटला. डोंगरात  असणारी विविध वनस्पती, फुले आदींबरोबरच नागरिकांनी सेल्फीचा आनंद घेत मनमुराद  फोटो काढले. गरमागरम कॉफी आणि स्वादिष्ट भेळीचा आनंद घेतल्यानंतर केक कापून संस्थेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. लाहोटी यांनी ट्रेककॅम्प संस्थेचा उद्देश व वाटचालीबाबत
माहिती दिली. नंतर महादेव मंदिरात मनोभावे दर्शन घेऊन सर्वजण नगरकडे परतले.

नगरच्या न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्समधील बी.बी.ए विद्यार्थ्यांचा ‘जेएनपीटी’मध्ये अभ्यास दौरा

नगर – न्यू आर्टस् कॉलेज महाविद्यालयातील बीबीए ( इंटरनॅशनल बिजनेस) हा तीन वर्षे पदवी अभ्यासक्रम राबवला जातो या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधीचे व्यवस्थापन, आयात -निर्यात प्रक्रिया व त्यासाठी लागणारे दस्तऐवज शासकीय मान्यता लायसन्स, परकीय भाषा इत्यादींचा सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते. जागतिकीकरणामुळे व्यापार्‍याला मोठी चालना मिळालेली आहे. त्यामुळे देशातील लोकांचे राहणीमान वाढलेले आहे प्रत्येक देश आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यातच परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक (एफ.डी.,आय), जागतिक व्यापारी धोरण इत्यादी
गोष्टींचा समावेश होतो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यात कस्टम, उत्पादन शुल्क यासारख्या क्षेत्रात रोजगाराचा
फायदा व्हावा म्हणून केंद्र सरकारच्या भारतातील सर्वात मोठे असलेले बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडिया
नवी मुंबई येथे बीबीए (आय.बी) च्या विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीचे नियोजन करण्यात आले होते करण्यात आले होते, अशी
माहिती प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी सांगितले.
बी.बी.ए. विभागातील विद्यार्थी देशात नव्हे तर परदेशात उच्च स्तरावर चांगले काम करत आहेत. संस्थेच्या
आणि महाविद्यालयाच्या खंबीर पाठिंब्यामुळे बी.बी.ए. विभाग जोमाने प्रगती करत आहे. भविष्यात बी.बी. ए.,,(आय.बी) च्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च दर्जाचा रोजगार मिळण्यासाठी विभाग प्रयत्न करणार आहे त्यासाठी भविष्यात जवाहर नेहरू पोर्टल ऑफ इंडिया, नवी मुंबई यांच्याशी सामंजस्य करार करण्याचा विभागाचा मानस आहे, असे बी.बी.ए विभागप्रमुख डॉ. मंगेश वाघमारे यांनी सांगितले. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी मुंबई या औद्योगिक क्षेत्र भेटी दरम्यान प्रथम विद्यार्थ्यांना जेएनपीटी  बाबत प्रेसेंटेशन देण्यात आले. यादरम्यान जेनपीटीचे संजय पाटील व प्रशांत नाखवा यांनी विद्यार्थ्यांना आयात- निर्यात याबाबत बंदरावर जाऊन मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना
भविष्यात स्वतः करियर करण्यासाठी आवड निर्माण झाली.जे.एनपी.टी चे काही कामे आता खाजगी कंपनीकडे देण्यात
आलेले आहेत. विद्यार्थांनी या खाजगी कंपनीच्या संपर्कात रहावे असे आवाहन त्यांनी केले. सदर भेटीचे नियोजन डॉ.
सतीश जगताप आणि डॉ.राहुल थोरात यांनी केले होते. सदर भेटी दरम्यान विभागातील प्रा.अभिजीत सातभाई,
प्रा.नम्रता ठाकर व विद्यार्थांनी सहभाग नोंदवला.

आदिवासी पारधी समाजाच्या बोंबाबोंब आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी आमरण उपोषण चाल

नगर – मौजे लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा
जिल्हा अहिल्यानगर येथील आदिवासी पारधी
समाजाचे अनेक वर्षापासून गायरान जमिनीवरचे
अतिक्रमण न हटवता तिथेच कायमस्वरूपी करून
गायरान जमीन नावावर करण्याच्या मागणीसाठी
आदिवासी पारधी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी
कारल्यासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले
व दुसर्‍या दिवशी सुद्धा आंदोलनाचे दखल घेतली
गेली नाही त्यामुळे चालू करण्यात आले. यावेळी
आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष
अजित भोसले, अध्यक्ष राजेंद्र काळे, छाया भोसले,
संतोष भोसले, अविनाश चव्हाण, मुकेश भोसले,
आसाराम काळे, रामसिंग भोसले, मनमास भोसले,
रेवण भोसले, युवा भोसले, कानू भोसले, तेजस भोसले, नवनाथ भोसले, अविनाश काळे, अक्षय
भोसले, अंकुश काळे आदीसह कुटुंबीय उपस्थित होते.
पुढे नियोजनात म्हटले आहे की, मौजे लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी असून हे गेली ५०
ते ६० वर्षांपासून गायरान जमीन कसुन खात आहे. त्या जमिनीमध्ये कपाशी, आंब्याचे झाडे, बोर
व अनेक झाडे असुन शेती करत आहे व ही गायरान जमीन ९ कुटुंब मिळून कसत आहे. काही
दिवसांपूर्वी तेथील ग्रामसेवक सरपंच यांनी मिळून एक मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सौर प्लांट
केला व दुसरा सौर प्लांट करण्यासाठी तेथील अतिक्रमण काढण्यासाठी व्यंकनाथ येथील ग्रामसेवक
यांनी अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याचे
नोटीस बजावलेले आहे व नोटीस बजावून फार मोठा
अन्याय केलेला असुन ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक
आदिवासी पारधी समाजातील लोकांना वेठीस
धरून अतिक्रमण तात्काळ काढण्यासाठी नोटीसा
दिलेल्या आहे हे नोटीस देऊन आदिवासी कुटुंबांना
बेघर करण्यासाठी षडयंत्र रचले असून तेथील
आदिवासी कुटुंब उघड्यावर पडणार आहे. व हे
अतिक्रमण नियमितकुल करण्यासाठी वेळोवेळी
शासन पत्र दिलेले आहे व त्याचे पीक पाहणी करून
सातबारा नावे नोंद करण्यासाठी वेळोवेळी निवेदन
दिलेले आहे. शासनाच्या नियमानुसार व १९९०
च्या परिपत्रकानुसार गायरान जमिनीवरील केलेले
अतिक्रमण नियमानकुल करून ७/१२ व नावे नोंद करण्याचे पारित केलेले असून परिपत्रक महाराष्ट्र
शासनाचे आपणाकडे आलेले आहे. परंतु त्याची कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे सदरील
प्रकरण प्रलंबित पडलेले आहे. त्यामुळे आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंब व त्यांची घरे व मूलबाळ
उघड्यावर न आणता त्यांना सदरील जमीन वहीतीसाठी देऊन त्यांच्या नावे सातबारा नोंद करावी व
शासनाचा जो प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तातडीने रद्द करण्यात यावी व मौजे लोणी
व्यंकनाथ येथील इतर शासनाची पडीक जमीन वरती प्रकल्प राबविण्यात यावा, या मागणीसाठी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले आहे.

जिल्हा अल्पसंख्यांक सेल प्रमुखपदी मुनव्वर खान

नगर – स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर
संघटनेच्या जिल्हा अल्पसंख्यांक सेल प्रमुखपदी
अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्यूनियर
कॉलेजचे मुनव्वर हुसैन छोटे खान यांची नियुक्ती
करण्यात आली. शिक्षक, शिक्षकेतरांच्या विविध
प्रश्नांवर कार्य करणार्‍या या संघटनेचे जिल्हाध्यक्ष
प्रसाद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खान यांची
नियुक्ती जाहीर करण्यात आली.

स्वाभिमानी शिक्षक संघटना मुख्याध्यापक
सेलचे जिल्हाप्रमुख अमोल क्षीरसागर म्हणाले की,
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्नांवर
कार्य करणार्‍या या संघटनेत शिक्षक वर्ग जोडले जात
आहे. संघटनेच्या माध्यमातून सर्वांना सामावून घेतले
जाणार असून, सर्वांनी संधी उपलब्ध करून देण्यात
येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुनव्वर खान यांनी संघटनेच्या माध्यमातून
शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला
जाणार आहे. तर संघटना वाढीसाठी प्रयत्न करुन
अल्पसंख्यांक शाळेतील विविध प्रश्न व त्याचप्रमाणे
शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम राहणार
असल्याचे त्यांनी सांगितले.

संघटनेचे संस्थापक के. पी. पाटील यांनी खान
यांना नियुक्तीबद्दल पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गवते, जिल्हा
सरचिटणीस सुनील अंगारखे, उपाध्यक्ष उमेश
भोईटे, संघटन प्रमुख किरण डहाणे, राहुल मोरे,
गणेश शिंदे, संगमनेर तालुका अध्यक्ष किशोर कार्ले,
नगर तालुकाध्यक्ष भारत गोल्हार, उपाध्यक्ष विजय
साळवे, महिला आघाडी उपाध्यक्षा रिबीका क्षेत्रे
आदी उपस्थित होते.

संतांचे विचार आजच्या पिढीकरीता एक आदर्श

ह.भ.प. गुलाब महाराज खालकर यांचे प्रतिपादन; श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या ११ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रम

नगर – पारायण केल्याने तसेच त्याचे श्रवण करण्याने माणसाला मोक्ष मिळण्यास मदत होते हरिनामाचा जप फार महत्वाचा
आहे, देवाला हरिनामाची भूक आहे, किर्तनामध्ये देवाबद्दल प्रेम आपुलकी, भक्ती असायला हवी. संतांचे विचार आजच्या
पिढीकरीता एक आदर्श आहेत. आचार, विचार, उच्चारात भगवंतांच्या नामस्मरणाने एक शक्ती निर्माण होत असते. त्यामुळे
आपल्या दैनंदिनीत भगवंतांचे नामस्मरण करावे. श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या  स्थापनेपासून या ठिकाणी होत असलेल्या
विविध कार्यक्रमाने धार्मिकता वाढत आहे. ही समाजाच्या दृष्टीने सकारात्मक बाब  असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. गुलाब महाराज खालकर यांचे केले. नेप्ती येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या ११ वा वर्धापन दिनानिमित्त ह.भ.प.
गुलाब महाराज खालकर यांचे किर्तन झाले. याप्रसंगी नर्मदेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव, ह.भ.प. संजय महाराज महापुरे, संजय जाधव, दत्ता जाधव, माजी नगरसेविका सुवर्णा जाधव, सुरेश जाधव, आदेश जाधव, लक्ष्मी जाधव, आशा जाधव, मंगल जाधव, मिनाताई सत्रे, आनंद सत्रे, कावेरी सत्रे, पुजा सत्रे, हेमंत जाधव, सुरज जाधव, डॉ.अमोल जाधव, प्राजक्ता जाधव, ऋषि जाधव, रवि जाधव, अतुल जाधव, स्नेहल जाधव, अंजली जाधव, कपिल जाधव, मानसी जाधव, राज जाधव, तनया जाधव, विजय जाधव, गणेश महाराज बडे, सावेरी सत्रे आदि उपस्थित होते. याप्रसंगी बाबासाहेब जाधव म्हणाले, गेल्या ११ वर्षांपुर्वी श्री नर्मदेश्वर मंदिराची सर्वांच्या सहकार्याने निर्मिती झाल्याने
पंचक्रोशितील भाविकांची मोठी सोयी झाली आहे. वर्षभर या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असल्याने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होत आहे. तसेच अध्यात्मिक कार्यक्रम आम्ही सतत या ठिकाणी राबवित असतो. परंतु यावेळी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त नामवंत किर्तनकार, प्रवचनकारांची सेवा या ठिकाणी होत असल्याने संतांचे विचार यानिमित्त भाविकांच्या कानी पडत आहे.
सकाळी मंदिरात लघुरुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा, दुपारी किर्तन त्यानंतर महाआरती करण्यात
आली. यावेळी आयोजित महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशितील नागरिकांनी घेतला. नगर शहरातील अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी नेप्ती येथील अपंग शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप
करण्यात आले. या कार्यक्रमास श्री विशाल देवस्थानचे पुजारी संगमनाथ महाराज, ह.भ.प. शेंड महाराज, जि.प.सदस्य माधवराव लामखडे, अरुण होळकर, रामदास फुले, एकनाथ  जपकर, दिलीप होळकर, दादू चौघुले,
भानुदास फुले, सोमनाथ पुंड, देवा होले, वसंत पवार, विलास जपकर, बाळासाहेब बेलेकर, शाहु होले, बाळासाहेब कोल्हे,
तबाजी होळकर, शुभम कोल्हे, कांतीलाल कांडेकर, बंडू जपकर, आनंदा कर्डिले, अंबादास पुंड, सौरभ भुजबळ, अशोक
ठाणगे, जालु भुजबळ, अशोक गवळी, राहुल मुकेश, श्रीधर लोमटे, अरुण नगराळे, भास्कर घोरपडे, हारुक सय्यद, संभाजी कदम, अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, शाम नळकांडे, संजय शेंडगे, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, अनिल बोरुडे, सचिन शिंदे, संपत नलवडे, दत्ता कावरे, संतोष गेनप्पा, विष्णु फुलसौंदर, गणेश बोरुडे, शेखर भुजबळ, अर्जुन बोरुडे, चंद्रकांत गाडळकर, बंटी गुंजाळ, बलभिम  शेळके, दत्ता खैरे, गजानन ससाणे, महेश
भनभने, संतोष चिपाटे, दत्तात्रय गायकवाड, अनंत बोरुडे, मनोज गाडळकर, गारेख  पडोळे, महेंद्र वारुळे, गणेश फुलसौंदर,  सुधीर लांडगे, मगनभाई पटेल, जालिंदर बोरुडे, बाळासाहेब भुजबळ, विक्रम बनकर, रतन कानडे, आकाश नरभवने, के. डी. खानदेशी, अनिल झरप, शिवाजी ससे, पारुनाथ ढोकळे, छबुनाना जाधव, प्रविण ससाणे, शिवाजी जाधव, रघुनाथ चौरे, विशाल पटवेकर, प्रताप भोजणे आदिंसह नेप्ती पंचक्रोशितील ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नर्मदेश्वर मित्र मंडळ, नेप्ती ग्रामस्थ, नंदनवन मित्र मंडळ, वीर हनुमान वारकरी सेवाभावी प्रतिष्ठान आदिंच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

इमामपूर घाट परिसरात पेटलेल्या वनव्यात शेकडो हेटर वनसंपदा झाली जळून खाक

२० तासांनंतर आग विझविण्यात यश, पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या वन्यप्राण्यांना वणव्याचा मोठा फटका

नगर – नगर तालुयातील वनसंपदेला चालू वर्षी वणव्याने मोठा फटका बसला असल्याचे चित्र असतानाच २७ मार्च रोजी
दुपारी २ वाजेच्या सुमारास इमामपूर घाटातील जंगलाला लागलेल्या वणव्यात शेकडो हेटर वनसंपदा जळून खाक झाली आहे. नगर, नेवासा व राहुरी तालुयातील सीमेवर वणवा लागल्याने तिन्ही तालुयातील वनक्षेत्र तसेच आर्मीचे क्षेत्र जळून खाक झाले आहे. तब्बल २० तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर हा वणवा विझविण्यास वन विभाग आणि नागरिकांना यश आले.

नगर, राहुरी व नेवासा तालुयाची सीमा इमामपूर घाट परिसरात आहे. या सीमेवर मोठी वनसंपदा पहावयास मिळते. खोसपुरी, गुंजाळे, इमामपूर, पांढरीपुल या हद्दीतील वनसंपदेला २७ मार्चला लागलेल्या वणव्यात मोठी हानी पोहोचली आहे. आर्मीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे तर वन विभागाच्या क्षेत्रालाही मोठी हानी
बसल्याचे पहावयास मिळाले. दिवसभर वणवा भडकत होता.

रात्री उशिरापर्यंत वणव्याने रौद्ररूप धारण केले होते. नगर, राहुरी, नेवासा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वणवा विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु वाळलेले गवत व झाडांचा पालापाचोळा यामुळे वणव्याने रौद्ररूप
धारण केले त्यातच कडक ऊन यामुळे वणवा विझविण्यासाठी मोठी अडचण येत होती. औषधी वनस्पती तसेच मोठ्या वृक्षांना देखील वणव्याचा फटका बसला आहे. वन्यप्राणी जीवाच्या आकांताने सैरावैरा धावताना पहावयास मिळाले. यापूर्वी तालुयातील गुंडेगाव, नगर व बीड जिल्ह्याच्या हद्दीतील चिचोंडी पाटील परिसर, इमामपूर, बहिरवाडी, गोरक्षनाथ गड, खोसपुरी या गावांसह विविध गावांमध्ये वनसंपदा वणव्यामुळे नष्ट झाली आहे. चालू वर्षी वणवा लागण्याच्या घटनांमध्ये
मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. वन विभागाने जाळ रेषा केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे परंतु काही भागात जाळ रेषाच नसल्याचे नागरिक सांगत आहेत. २७ मार्चला लागलेल्या वनव्यात राहुरी  तालुयातील धुमा डोंगर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर आढळून येतो. तसेच आर्मीचे व वनक्षेत्र देखील मोठे आहे. खिरणीचा महादेव हे धार्मिक स्थळ निसर्गाच्या कुशीतच वसलेले आहे. येथे पर्यटकांची देखील मोठी गर्दी
होत असते. येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना नेहमीच पण होत असते. याच निसर्गसंपदेला लागलेल्या वणव्यामध्ये मोठी हानी झाल्याने नागरिक देखील त्रस्त झाले आहेत. इमामपूर परिसरातील वन्यप्राणी पाण्याच्या शोधात वणवण भटकंती करत
असतानाच लागलेल्या वणव्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इमामपूर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून येथील वन्य प्राण्यांसाठी देखील पाण्याची सोय करण्याची गरज आहे. या परिसरात लागलेल्या वणव्यामुळे हरण, रानडुक्कर, काळवीट, ससा, सरपटणारे साप, सरडा, घोरपड, मोर तसेच विविध जातींचे
पक्षी जीवाच्या आकांताने सैरा वैरा धावत होते.
वणवा विझवण्यासाठी नगर, राहुरी, नेवासा येथील वनाधिकारी व कर्मचारी दुपारपासूनच प्रयत्न करत होते. परंतु रात्री उशिरापर्यंत आग आटोयात आणणे शय झाले नाही.राहुरी तालुका वनपाल राजेंद्र रायकर, वनकर्मचारी बबन जाधव, महादेव शेळके, गोरख मोरे, नेवासा तालुका वनरक्षक राहुल शिसोदे, वन कर्मचारी ज्ञानदेव गाडे, नगर तालुका संजय सरोदे यांच्यासह विविध कर्मचारी वणवा विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. अखेर २८ मार्चला सकाळी ११
च्या सुमारास ही आग आटोयात आली. आग विझवण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी अविनाश तेलोरे रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी होते. वनपाल मनेष जाधव, वनमित्र सनी गायकवाड, रुद्रा टिमकरे, अंकुश मोकाटे, आप्पासाहेब
टिमकरे, संकेत जरे संदीप टिमकरे संकेत टिमकरे दिपक आवारे राम मोकाटे भिमराज मोकाटे यांनीही आग विझविण्यासाठी मदत केली. वणवा लागू नये यासाठी काळजी घ्यावी वणवा लागल्यामुळे वनसंपदेचे तसेच वन्य
प्राण्यांचे अतोनात हाल होत असतात. त्यामुळे वणवा लागू नये यासाठी नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. वनक्षेत्रालगतचे बांध शेतकर्‍यांनी जाळू नये. तसेच वनक्षेत्रात धूम्रपान, स्वयंपाक करू नये. वणवा लागल्यास वणवा
विझवण्यासाठी स्थानिकांनी वनविभागाला मदत करणे गरजेचे आहे. असे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांनी सांगितले

आचार्यश्रींच्या स्मृतीत रक्तदानाचा महायज्ञ अहमदनगर मर्चंट बँक अखंड चालू ठेवणार

नगर – राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांनी मानवता धर्माची शिकवण दिली. रक्तदान हे सुद्धा मानवतेचा धर्म
आहे. एखाद्या व्यक्तीला जीवदान देण्याचे पुण्यकर्म रक्तदानामुळे होऊ शकते. भगवंताला मनुष्याकडे हेच
अपेक्षित असते. साधूसंतही हाच उच्च विचार समाजाला देतात. याच विचारानुसार मर्चंट बँक दरवर्षी आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीदिनी रक्तदान शिबीर आयोजित करते. रक्तदानाचा हा महायज्ञ अखंड, अविरत चालू ठेवण्याचा प्रामाणिक
प्रयत्न भविष्यातही चालू राहील असे प्रतिपादन अहमदनगर मर्चंट बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तीमल मुनोत यांनी केले.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्यस्मृतीनिमित्त अहमदनगर मर्चंट बँके प्रायोजित आणि धार्मिक
परीक्षा बोर्ड, तिलोक आनंद मानव सेवा केंद्र संयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन आनंदधाम भक्तनिवास येथे चेअरमन हस्तीमल मुनोत यांच्या हस्ते झाले. प्रारंभी आचार्यश्रींच्या प्रतिमेस चंदनाचा हार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी अलोकऋषीजी म.सा., अमृतमुनीजी म.सा., धार्मिक परीक्षा बोर्डचे अध्यक्ष नेमीचंद चोपडा (पाली, राजस्थान), पारसमल छाजेड (मुंबई), छवरीलाल कांकरिया (पाली, राजस्थान), माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, महिला बालकल्याण समितीचे उपसभापती मीनाताई चोपडा, मानवसेवा समितीचे डॉ. विजय भंडारी, सह मानदमंत्री सागर गांधी, आनंदराम मुनोत, जनकल्याण रक्त केंद्राचे अध्यक्ष अभय मेस्त्री, मर्चंट बँकेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी व सर्व संचालक आदी उपस्थित होते. यावेळी आ. संग्राम जगताप यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन
रक्तदात्यांचे व मर्चंट बँकेचे कौतुक केले.

गणेश भोसले म्हणाले, धार्मिक परीक्षा बोर्ड हा परिसर आमच्या प्रभागातील असल्याने आमदार संग्राम जगताप  यांच्या सहकार्याने या परिसरात चांगली विकास कामे करण्यात आली आहे. याचा  आम्हाला आनंद आहे. दरवर्षीप्रमाणे मर्चंट बँक रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मोठे योगदान देत आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त मर्चंट बँक दरवर्षी रक्तदान शिबीर घेऊन मानवसेवेचा आदर्श निर्माण करीत आहे. प्रकाश भागानगरे म्हणाले, मर्चंट बँकेने बँकिंग व्यवसाय करताना नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. रक्तदानाचा अखंड महायज्ञ बँकेच्या सेवाभावाची प्रचीती देते. या कार्यासाठी बँकेचा विशेष पुरस्काराने गौरव झाला पाहिजे. आचार्यश्रींचे समाधीस्थळ
स्थळ असलेले आनंदधाम प्रत्येकाने नतमस्तक व्हावे असे तीर्थस्थळ आहे. हा पवित्र परिसर सुशोभित करण्यात आला असून याठिकाणी येणारे सर्व रस्ते प्रशस्त, सुशोभित आणि हरित करण्यात आला आहे.

प्रास्ताविकात डॉ. विजय भंडारी म्हणाले, गेल्या ३२ वर्षांपासून रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत आहे. दरवर्षी आतापर्यंत ३० हजार रक्तदात्यांनी यात योगदान दिले आहे. २३ हजार पुरूष ७ हजार महिलांनी रक्तदान करून आचार्यंश्रींना अभिप्रेत सेवाकार्यात सहभाग नोंदवला आहे. या शिबिराचा सकाळ पासूनच रक्तदात्यांनी प्रतिसाद देत गर्दी केली होती. आनंदऋषीजी ब्लड बँक नगर व पुणे, जनकल्याण रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय रक्तपेढी, मनपा रक्तपेढीच्या टीमने रक्तसंकलनाचे काम पाहिले. यावेळी अनेक वर्ष सेवा देणारे रतिलाल बोरा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिबिर यशस्वी होण्यासाठी रमेश पितळे, गौतम बोरा, डॉ.रसिक मुथा, बँकेचा सर्व स्टाफ आदींनी परिश्रम घेतले. आनंदराम मुनोत यांनी आभार मानले