नगर – सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम अहिल्यानगरमध्ये
झालेच पाहिजे. यासाठीचा जयंत येलुलकरांचा पुढाकार कौतुकास्पद
आहे. यामुळे आपले नगर शहर पुढे जात सामाजिक बांधलकी जपली
जात आहे. असामान्य काम करणार्यांना रसिक गौरव पुरस्कार
दिल्याने त्यांच्या कार्याला अधिक प्रेरणा व प्रोत्साहन मिळणार आहे.
रसिक ग्रुपच्या उपक्रमांमुळे अहिल्यानगरची वेगळी ओळख निर्माण
झाली आहे. अशा जयंत येलुलकरांमागे सर्वांनी उभे राहावे, असे
प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले.
नुकत्याच गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या रसिकोत्सव सोहळ्यात
विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते रसिक ग्रुपच्या
वतीने देण्यात येणारे विविध पुरस्कारांचे समारंभपूर्वक वितरण
झाले. यंदा पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानचे
खजिनदार महेश सूर्यवंशी यांना धार्मिक, शैक्षणिक व आरोग्य
क्षेत्रातील योगदानाबद्दल स्व.प्रदीप गांधी स्मृती गौरव पुरस्काराने
सन्मानित करण्यात आले.
आ.संग्राम जगताप यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध
करत शहरात मोठ्याप्रमाणात सुरु झालेल्या कामांमुळे शहराच्या
विकासात मोलाची भर घातल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव पुरस्काराने
सन्मान करण्यात आला.
अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी
महत्त्वपूर्ण निर्णय घेत शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी दिलेल्या
योगदानाबद्दल व शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राला चालना देत
रखडलेल्या नाट्य संकुलच्या कामास गती दिल्याबद्दल त्यांचाही
विशेष गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यावेळी राजाभाऊ कोठारी, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, क्रेडाईचे
आशिष पोखरणा, अनिल पोखरणा, अश्विन गांधी, पेमराज बोथरा,
डॉ.प्रकाश कांकरिया, सुनील मुनोत, शशीकांत गुळवे, विजय इंगळे
उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप म्हणाले, जयंत येलुलकर निस्वार्थी भावनेन
उपक्रम राबवून अहिल्यानगरचा ऐतिहासिक वारसा व संस्कृती जपत
आहे. रसिक ग्रुपच्या या उपक्रमांमुळे शहरात नवे चैतन्य आले आहे.
आपापल्या क्षेत्रात काम करत सामाजिक क्षेत्रातही योगदान देणार्यांचे
कौतुक पुरस्काराच्या रूपाने रसिक ग्रुपने केले आहे. या पुरस्कारांनी
माझ्यासह सर्वाना सामाजिक कामासाठी प्रोत्साहन मिळणार आहे
या कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व व्याख्याते
प्रा.मिलिंद जोशी यांचा साहित्य चळवळ वृद्धिंगत करत केलेल्या
उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना गौरव पुरस्कार देण्यात आला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर
यांनी आपले कर्तव्य बजावत अनेक गुन्ह्यांचा शोध लावत गुन्हेगारांवर
वचक ठेवत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी
केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना गौरव पुरस्कार देण्यात आला.
उत्कृष्ट कल्पना शक्तीने मंडप सजावट करणारे गणेश भूतारे
यांचाही गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
सावेडीच्या जॉगिंग पार्क मधील झाडांची निगा राखत तेथील
सौदर्य वाढवून पर्यावरण क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणारे जीवन
खरात यांचाही सुप्रभात ग्रुपच्या वतीने सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविकात जयंत येलूलकर म्हणाले, आपले नगर शहर
सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जावे यासाठी गेल्या २२ वर्षांपासून
ग्रुप हा सांस्कृतिक वारसा जपत काम करत आहे. या कामात
अनेकांची साथ मिळत आहे. नगरमध्ये अनेक हिरे आहेत जे आपल्या
कार्यकर्तृत्ववाने नगरचे नावलौकिक वाढवत आहेत. अशांचा गौरव
करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी रसिक गौरव पुरस्कार देत
आहोत. या वर्षीच्या पुरस्कार्थींनी आपापल्या क्षेत्रात भरोव योगदान
देत अहिल्यानगरचे नाव उंचावले आहे. या पुरस्कार वितरण समारंभांचे
नियोजन ग्रुपचे तेजा पाठक, सुदर्शन कुलकर्णी, निखिल डफळ, समीर
पाठक, प्रशांत अंतापेलू, श्रीकृष्ण बारटक्के, स्नेहल उपाध्ये, प्रसन्न एखे,
बाळकृष्ण गोटीपामुल, तुषार बुगे, मीनाक्षी पाटील, शारदा होशिंग,
ऋषिकेश येलुलकर, ओंकार अंतापेलु आदींनी केले.