भिंगार – सालाबादप्रमाणे भिंगार पंचक्रोशीतील राधानगरी नागरदेवळे येथील श्रद्धास्थान ‘श्री साईबाबा मंदीरचा नववा वर्धापन दिन सोहळा’ निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री साई चरित्र पारायण, सौ. धनश्री शिंदे (सनातन संस्था) यांचे साधना विषयक प्रवचन, हरिपाठ तसेच शुक्रवारी सायंकाळी ७वाजता रामायणाचार्य हभप गोरक्षनाथ दुतारे महाराज यांच्या वाणीतून भजन संध्या कार्यक्रम झाला. साई मंदिराचे संस्थापक, अध्यक्ष महेश राजेंद्र झोडगे, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, शास्त्रीय संगीत विशारद ओंकार देऊळगावकर, मंदिराचे पुजारी देशपांडे गुरुजी, आशुतोष गलांडे, ओंकार आव्हाड, गौरव त्रिमुखे, आदित्य कापरे आदींसह मंडळाचे कार्यकर्ते, सर्व भजनी मंडळ नागरदेवळे व भिंगार तसेच साई भक्तगण उपस्थित होते. भजन संध्येत साई तुझ्या दर्शनाची ओढ लागली, तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे रे…, साई तुझे नाव गोड आदी साईंच्या भजनांनी राधानगरी दुमदुमली. शनिवारी संध्याकाळी ५ वाजता श्री साईंची पालखी मिरवणूक व ग्रामप्रदक्षिणा होणार आहे. तसेच रविवारी सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी साई भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन साई मंदिराचे संस्थापक अध्यक्ष महेश झोडगे यांनी केले आहे