दररोज बिबट्याच्या भीती खाली जगतेय जनता, वनविभागकडे रेस्क्यू टीम आहे का ?

0
72

पालकमंत्री साहेब, वनविभाग काय केडगावची पुनरावृत्ती व्हायची वाट बघतोय का ?

नगर – नगर शहर परीसरासह नगर तालुक्याच्या गावागावात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असताना वन विभागाकडून फक्त पाहणी करून बिबट्यांच्या ठशांचे फोटो काढणे, काही ठिकाणी पिंजरा लावला तर लावणे अशी थातूरमातुर कामे केली जात आहेत. मात्र दररोज बिबट्याच्या भीती खाली वावरणाऱ्या नागरिकांना दिलासा काही मिळत नाही. मागील वर्षी प्रमाणे जर केडगाव सारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर नगरच्या वन विभागाकडे पीआरटी (प्रायमरी रिसपॉन्स टिम) आणि रेस्क्यू टीम आहे का? जर नसेल तर पालकमंत्री साहेब यात लक्ष घालणार का? की केडगावच्या घटनेची  पुनरावृत्ती व्हायची वाट पाहताय? असा सवाल उपस्थित होत आहे.

मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यातच केडगावच्या नागरी वसाहतीमध्ये बिबट्याची मध्यरात्री झालेली एन्ट्री  त्यानंतर परिसरातील नागरिक मध्ये पसरलेली दहशत आपण पाहिलीच असेल .पहिल्यांदाच नगरच्या उपनगरात नागरी वसाहतीमध्ये बिबट्याची झालेली इंट्री केडगाव मधील अनेक नागरिकांना याची कल्पना देखील नव्हती. त्यामुळे सकाळी सकाळी कामासाठी घराबाहेर ज्यावेळेस आपण पडू त्यावेळेस आपण बिबट्यासाठी एक सावज बनू ही त्यांच्या ध्यानीमनी देखील आले नसेल ज्या घराच्या आडोशाला दब धरून बिबट्या बसला होता त्यातील अनेक घरांनी व शेजारीपाजाऱ्यांनी पाहिल्यामुळे याची माहिती परिसरातील नागरिकांना फोन द्वारे कळवल्यामुळे अनेकजण सावध झाले खरे पण ज्यांना याची कल्पना नव्हती ते मात्र बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले.

अनेक नागरिक झाले होते बिबट्याच्या हल्ल्यात जखमी

अनेक नागरिकांवर  या बिबट्याने हल्ला चढवत घायाळ करून सोडले. त्यावेळेस देखील बैल गेला आणि झोपा केला याची प्रचिती केडगावकरांना वनविभाग एक तास उशिरा आल्यानंतर आली. वनविभाग, नागरिक तसेच पोलीस प्रशासनामध्ये थोडी बाचाबाची देखील झाली. प्रशासनाला यावेळी नागरी रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर सकाळी ९ वाजल्यापासून बिबट्याने दहशत माजवत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अनेक नागरिकांना घायाळ केले होते. वन विभागाकडे पिंजरा व बिबट्याला पकडण्यासाठी जाळ्या शिवाय काहीही नव्हतं. त्यानंतर बिबट्याची दहशत पाहता व नागरिकांचा वाढत चालेला रोष यांची दखल घेत नगरच्या वन विभागाने तात्काळ संगमनेरच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले.