नगर – शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या दोन कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून ५ जणांना ताब्यात घेऊन त्याच्याकडील २ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि.५) करण्यात आली. पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारांनी शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या गोवंश जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करणार्या दोन कत्तलखान्यांवर कारवाई केली. या कारवाईत अफवान इस्माईल कुरेशी (वय २७), मुज्जाहिद नुरमोहमंद कुरेशी (वय ३०), आरफाद अश्पाक कुरेशी (सर्व रा. रा.खाटीक गल्ली, शेवगाव), एक विधी संघर्षित बालक, बब्बु अजीज शेख, (वय ५५, रा.दादेगाव रोड, शेवगाव) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३१० किलो गोमांस, २ गायी, १ कालवड, १ वासरू व ४ सुरे असा २ लाख ८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात २ वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद केली.